हे दस्तऐवज माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 (“कायदा“) च्या दृष्टीने एक इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आहे, यामध्ये वेळोवेळी केलेल्या सुधारणा, त्याअंतर्गत लागू असलेले नियम आणि कायद्याद्वारे सुधारित केलेल्या विविध कायद्यांमधील इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डशी संबंधित सुधारित तरतुदी आहेत. हे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड कॉम्प्यूटर यंत्रणेद्वारे तयार केले जातो आणि त्याला भौतिक किंवा डिजिटल स्वाक्षरीची आवश्यकता नसते.
कृपया ‘PHONEPE EARN/अर्न’ (खाली दिलेल्या व्याख्येनुसार) मध्ये नोंदणी करण्यापूर्वी, ॲक्सेस करण्यापूर्वी, वापरण्यापूर्वी किंवा सहभागी होण्यापूर्वी या अटी व शर्ती (“अटी”) काळजीपूर्वक वाचा. या अटी PHONEPE EARN/अर्नमध्ये तुमचा ॲक्सेस, सहभाग, वापर नियंत्रित करतात आणि तुम्ही आणि PhonePe प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात कायदेशीर बांधील राहील असा करार तयार करतात, कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय – 2, 5 वा मजला, ए विंग, ब्लॉक ए, सालारपुरिया सॉफ्टझोन, सर्व्हिस रोड, ग्रीन ग्लेन लेआउट, बेलंदूर, बंगळुरू, कर्नाटक – 560103, भारत येथे आहे.
या अटींअंतर्गत ‘PhonePe’ चे सर्व संदर्भ म्हणजे याचा अर्थ समजले जातील आणि त्यात त्याचे सहकारी, सहयोगी, सहाय्यक कंपन्या, समूह कंपन्या, त्यांचे संबंधित अधिकारी, संचालक, कर्मचारी, प्रतिनिधी आणि एजंट यांचा समावेश असेल. तुम्ही या अटी वाचल्या असून त्यांच्याशी तुम्ही सहमत आहात आणि तशी पोचपावती देता, तसेच तुम्ही या अटींशी सहमत नसल्यास किंवा त्यांना बांधील राहण्याची इच्छा नसल्यास, तुम्ही कोणत्याही प्रकारे PHONEPE EARN/अर्न मध्ये ॲक्सेस करणार नाही, त्यात सहभागी होणार नाही किंवा त्याचा वापर करणार नाही. तुम्हाला हेदेखील समजते आहे, की PhonePe प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेली इतर सर्व वेबसाइट धोरणे, सामान्य किंवा उत्पादन विशिष्ट अटी व शर्ती, PhonePe प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत (खाली दिलेल्या व्याख्या) आणि वेळोवेळी दुरुस्त केलेल्या, तुमच्या PhonePe प्लॅटफॉर्मच्या वापर/ॲक्सेसच्या आधारावर तुम्हाला लागू होतील. PhonePe वेबसाइट, PhonePe मोबाईल ॲप्लिकेशन आणि PhonePe द्वारे मालकीचे/होस्ट केलेले/ऑपरेट केलेले/संचालित असलेल्या इतर कोणत्याही डिव्हाइसेस/गुणधर्मांवर (एकत्रितपणे “PhonePe प्लॅटफॉर्म” म्हणून संबोधले जाते) यांवर आम्ही अपडेट केलेली आवृत्ती पोस्ट करून कोणत्याही वेळी या अटींमध्ये सुधारणा करू शकतो. या अटींच्या अपडेट केलेल्या आवृत्त्या पोस्ट केल्यावर लगेच लागू होतील. असे अपडेट/बदल यांसाठी या अटींचे वेळोवेळी पुनरावलोकन करणे ही तुमची जबाबदारी आहे आणि असे अपडेट/बदल हे पोस्ट केल्यानंतरही तुम्ही PhonePe प्लॅटफॉर्मचा सतत वापर सुरू ठेवला तर तुम्ही असे सर्व अपडेट/बदल यांचा स्वीकार करता असे मानले जाईल. तुम्ही प्रस्तावित केलेल्या कोणत्याही अटी व शर्ती ज्या या अटींव्यतिरिक्त आहेत किंवा त्यांच्यापेक्षा विरूद्ध आहेत त्या PhonePe द्वारे स्पष्टपणे नाकारल्या जातात आणि त्यांचा कोणताही प्रभाव असणार नाही किंवा लागू असणार नाहीत. तुम्ही या अटींचे पालन केल्यावर, आम्ही तुम्हाला PHONEPE EARN/अर्न चा ॲक्सेस, वापर, सहभागी होण्यासाठी वैयक्तिक, अनन्य, अहस्तांतरणीय, मर्यादित विशेषाधिकार देतो
.
- व्याख्या
- “PHONEPE EARN/अर्न” चा अर्थ PhonePe प्लॅटफॉर्मवर उपलब्ध वैशिष्ट्ये असा आहे, ज्यामध्ये डिजिटल/ऑनलाइन कार्ये जसे की मोबाइल ॲप रेफरल्स (“रेफरल्स”), ऑनलाइन/डिजिटल सर्वेक्षण (“सर्वेक्षण”) किंवा ऑनलाइन किंवा डिजिटल सहभाग/पूर्ण करण्याची अनुमती देणारी कार्ये सक्षम केली जातात. PhonePe त्याच्या क्लायंटच्या वतीने, जे एकतर स्वत:साठी किंवा तृतीय पक्षासाठी ब्रँडची दृश्यमानता वाढवण्यास, उत्पादने/सेवांचा प्रचार करण्यास किंवा ग्राहक/मार्केट याबाबतच्या अंतर्गत गोष्टी (“भागीदार“) विकसित करण्यास उत्सुक आहेत आणि ते समाधानकारक पूर्ण केल्यावर तुम्ही इलेक्ट्रॉनिक गिफ्ट व्हाउचर (“बक्षीस”) प्राप्त करण्यास पात्र ठरता.
- “पात्र रेफरल” चा अर्थ सर्व पूर्वनिश्चित कृतींची समाधानकारक पूर्तता/पूर्ण करणे असा होईल, आणि हे रेफरल अंतर्गत आवश्यक असेल त्या अनुषंगिक अटी आणि शर्तींसह असू शकते. उदाहरणार्थ, रेफरीच्या डिव्हाइसवर मोबाइल ॲप्लिकेशनची स्थापना पूर्ण करणे आवश्यक असू शकते आणि त्यानंतर रेफरीच्यावतीने विशिष्ट कालावधीत एक किंवा अधिक विशिष्ट क्रिया कराव्या लागतील, जसे की नोंदणी/सदस्यता/उपलब्ध सेवा, कार्याच्या वैशिष्ट्यांच्या आधारे आवश्यक असेल.
- “रेफरी”, रेफरलच्या उद्देशाने, याचा अर्थ असा आहे की ज्याला तुम्ही संदर्भित म्हणजेच रेफर केले आहे आणि रेफरल लिंक आणि त्याच्या सहाय्यक अटी आणि शर्तींमध्ये वर्णन केलेल्या सर्व क्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत.
- “सेटलमेंट” म्हणजे PHONEPE EARN/अर्न अंतर्गत एखाद्या विशिष्ट कार्यासाठी PhonePe द्वारे उपलब्ध करून दिल्याप्रमाणे तुम्हाला केलेले बक्षीस वाटप.
- “सर्वेक्षण” म्हणजे डेटा पॉइंट एकत्रित करण्याच्या मूळ उद्देशाने PhonePe प्लॅटफॉर्मवर भागीदाराने दिलेली प्रश्नावली/पोल फॉरमॅट, ग्राहक वर्तन, प्राधान्ये, आणि त्यांची उत्पादने/सेवा यांच्याशी संबंधित असलेली किंवा नसलेली बाजार/उत्पादन विशिष्ट अंतर्गत गोष्टी होय.
- “आम्ही”, “आपण”, “आमचे” म्हणजे PhonePe.
- “तुम्ही”, “तुमचे”, “स्वतः”, “युजर” चा अर्थ PhonePe चा युजर/ग्राहक असा असेल.
- पात्रता
- PHONEPE EARN/अर्न ॲक्सेस करून/वापरून/सहभाग घेऊन, तुम्ही प्रतिनिधित्व करता, हाती घेतले आणि हमी देता:
- तुमचे वय किमान 18 वर्षे आहे आणि कायदेशीर बंधनकारक करारांमध्ये प्रवेश करण्यास सक्षम आहात.
- नेहमी, तुम्ही PhonePe प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या आणि वेळोवेळी सुधारलेल्या या अटी, इतर सर्व वेबसाइट धोरणे, सामान्य/उत्पादन विशिष्ट अटी आणि नियमांचे पालन कराल.
- तुम्ही कोणत्याही प्रकारे PhonePe ॲक्सेस करण्यापासून प्रतिबंधित किंवा कायदेशीररित्या प्रतिबंधित नाही.
- तुम्ही कोणतीही व्यक्ती/संस्था असल्याचे खोटे भासवत नाही.
- तुम्ही नमूद केलेली सर्व माहिती, दस्तऐवज आणि तपशील खरे आहेत, तुमचे आहेत आणि तुमच्याबद्दल आहेत, ही माहिती नेहमी PhonePe प्लॅटफॉर्मवर अपडेट ठेवली पाहिजे.
- PhonePe, वर नमूद केलेल्या अटींचे कोणतेही चुकीचे प्रतिनिधित्व झाल्यास, PhonePe प्लॅटफॉर्मवरील तुमचे खाते ताबडतोब संपुष्टात आणण्याचा आणि आवश्यक वाटेल त्या इतर कोणत्याही पायऱ्या सुरू करण्याचा अधिकार राखून ठेवते.
- PHONEPE EARN/अर्न ॲक्सेस करून/वापरून/सहभाग घेऊन, तुम्ही प्रतिनिधित्व करता, हाती घेतले आणि हमी देता:
- सर्वेक्षण, संदर्भ आणि बक्षीस यासाठी विशिष्ट तरतुदी
- सर्वेक्षणांच्या संबंधात, तुम्ही याद्वारे समजता आणि सहमत आहात की:
- सर्वेक्षणासाठी तुमचे प्रतिसाद/सबमिशन भागीदाराच्या आणि/किंवा PhonePe च्या अंतर्गत पॅरामीटर्स किंवा गुणवत्ता तपासणी यंत्रणेच्या अधीन आहेत आणि जेथे तुमचे प्रतिसाद/सबमिशन PhonePe च्या किंवा भागीदाराच्या निर्णयानुसार अशा निकषांची पूर्तता करत नाहीत, तेव्हा तुम्ही सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांविरुद्ध बक्षीस प्राप्त करण्यास पात्र असणार नाही.
- PhonePe यासाठी जबाबदार राहणार नाही (a) गमावलेल्या, चुकीच्या दिशानिर्देशित, उशिरा, अपूर्ण, चुकीच्या किंवा न समजण्याजोग्या नोंदी/प्रतिसाद, तुमच्यामुळे किंवा PHONEPE EARN/अर्न शी संबंधित किंवा वापरलेल्या कोणत्याही डिव्हाइसमुळे किंवा प्रोग्रामिंगमुळे किंवा नोंदी/प्रतिसाद प्रक्रियेत उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही तांत्रिक किंवा मानवी त्रुटीमुळे; (b) PHONEPE EARN/अर्न शी संबंधित कोणत्याही सामग्रीमध्ये मुद्रण किंवा टायपोग्राफिकल त्रुटी; (c) ऑपरेशन, ट्रान्समिशन, चोरी, नाश, एंट्रीमध्ये अनधिकृत ॲक्सेस किंवा बदल, किंवा तांत्रिक, नेटवर्क, टेलिफोन, कॉम्प्युटर, हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर, कोणत्याही प्रकारे खराब होणे, किंवा चुकीचे ट्रान्समिशन किंवा तांत्रिक समस्या किंवा इंटरनेट किंवा कोणत्याही वेबसाइटवर वाहतूक कोंडीमुळे कोणतीही ॲक्सेस झालेली माहिती प्राप्त करण्यात अयशस्वी; किंवा (d) PHONEPE EARN/अर्न च्या संबंधात कोणतीही सामग्री डाउनलोड केल्यामुळे तुमच्या कॉम्प्यूटर किंवा मोबाईलला इजा किंवा नुकसान होणे.
- सर्वेक्षणे तुमच्यासाठी गोपनीय/मालकीची माहिती उघड करू शकतात आणि अशी माहिती नेहमीच तिच्या मालकाची एकमेव आणि एक्सक्लुझिव्ह मालमत्ता राहील. या गोपनीय माहितीमध्ये नवीन उत्पादन कल्पना किंवा संकल्पना, पॅकेजिंग संकल्पना, जाहिरात/चित्रपट/टेलिव्हिजन संकल्पना किंवा ट्रेलर आणि मजकूर, व्हिज्युअल प्रतिमा आणि त्यांच्याशी संबंधित ध्वनी यांचा समावेश असू शकतो, परंतु इतकेच मर्यादित नाही. सर्वेक्षणात सहभागी होऊन, तुम्ही सहमत होता की तुम्ही अशी सर्व माहिती गोपनीय ठेवाल आणि ती कोणत्याही तृतीय पक्षाला उघड करणार नाही किंवा कोणत्याही हेतूसाठी त्यांचा वापर करणार नाही. तुम्ही या बंधनाचे उल्लंघन केल्यास, तुमचे बक्षीस जप्त करण्याव्यतिरिक्त आणि तुमचे खाते संपुष्टात आणल्यास, तुम्ही PhonePe आणि/किंवा भागीदाराच्या आर्थिक नुकसानासाठी जबाबदार असाल.
- काही सर्वेक्षणांमध्ये, केवळ तुमच्या संमतीनुसार, तुम्हाला तुमची वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती भागीदारांना सबमिट करण्याची आवश्यकता असू शकते. तुम्हाला अशी माहिती उघड करणे, संग्रहित करणे, स्टोअर करणे, शेअर करणे आणि त्यावर प्रक्रिया करणे यावर काही आक्षेप असल्यास अशा सर्वेक्षणांमध्ये सहभागी न होण्याचा तुम्हाला सक्त सल्ला देण्यात येतो. तुम्ही या संदर्भातले सर्व विवाद PhonePe चा समावेश न करता थेट भागीदारांकडे पाठवण्यास सहमती देता.
- रेफरलच्या संबंधात, तुम्ही याद्वारे समजता आणि सहमत आहात की:
- रेफरलमध्ये सहभागी होण्यासाठी, तुम्हाला रेफरल लिंकमध्ये दिलेल्या सूचनांचे अनुषंगिक अटी आणि शर्तींचे पालन करणे आवश्यक आहे आणि रेफरीला मोबाइल ॲप्लिकेशन संदर्भित करणे आवश्यक आहे. यामध्ये रेफरीची संपर्क माहिती एंटर करणे किंवा सहाय्यक अटी आणि शर्तींअंतर्गत घातलेल्या इतर अटींचे पालन करणेदेखील समाविष्ट असू शकते. असे करताना, तुम्ही पुढे प्रतिनिधित्व करता की रेफरीची संपर्क माहिती/इतर तपशील देण्यासाठी तुमच्याकडे पूर्व संमती आहे.
- रेफरल करणे – रेफरल करण्यासाठी तुम्ही PhonePe प्लॅटफॉर्मचे युजर असणे आवश्यक आहे आणि या अटींच्या आवश्यकतांची पूर्तता करणाऱ्या वास्तविक व्यक्तींचा संदर्भ देऊन (स्वतः व्यतिरिक्त) रेफरलच्या भावनेचा आदर केला पाहिजे. उदाहरणार्थ, तुम्ही PhonePe सह एकापेक्षा जास्त किंवा बनावट खाती तयार करू नये किंवा एकापेक्षा जास्त किंवा बनावट ईमेल पत्ते किंवा ओळख वापरून रेफरलमध्ये भाग घेऊ नये. रेफरल करताना, तुम्ही रेफरीकडून संबंधित संमती घेतल्यानंतर संपूर्ण, वैध, वास्तविक माहिती देणे आवश्यक आहे.
- बक्षिसांच्या संबंधात तुम्ही याद्वारे समजता आणि सहमत आहात की:
- सर्व बक्षिसे लागू कर वगळता आहेत. बक्षिसाचे हस्तांतरण, लिलाव, व्यापार, देवाणघेवाण किंवा विक्री केली जाऊ शकत नाही. तुमचे खाते संपुष्टात आणल्यावर किंवा PHONEPE EARN/अर्न मध्ये सहभागी होण्याचा तुमचा अधिकार, या अटींनुसार उद्धृत केलेल्या कारणांमुळे, तुमच्या कमाई अंतर्गत जमा झालेले सर्व रिडीम न केलेले बक्षीस गमावले जाईल.
- बक्षिसासाठी पात्र होण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि KYC कागदपत्रे PhonePe द्वारे सत्यापित करणे आवश्यक असू शकते.
- प्रत्येक बक्षीस कोणत्याही प्रकारच्या, स्पष्ट किंवा निहित (यासह, मर्यादेशिवाय, विशिष्ट हेतूसाठी व्यापार किंवा योग्यतेची कोणतीही गर्भित वॉरंटी) शिवाय दिले जाईल.
- फक्त PhonePe प्लॅटफॉर्मवर सूचना मिळाल्यावर किंवा PhonePe किंवा भागीदाराकडून लेखी पुष्टी मिळाल्यावर, जशी परिस्थिती असेल तसे, सर्वेक्षण आणि/किंना रेफरल प्रश्न यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर तुम्ही बक्षिसासाठी पात्र असाल.
- बक्षीस पडताळणी/तपास आणि परिणामी विलंब/रद्द करण्याच्या अधीन आहेत. PhonePe बक्षिसाची प्रक्रिया करण्यास नकार देऊ शकते, जर PhonePe ला संपूर्णपणे विवेकबुद्धीनुसार, तुमचा सहभाग फसवा, संशयास्पद, अटींचे उल्लंघन करणारा किंवा PhonePe च्या संभाव्य उत्तरदायित्वाला, भागीदाराला किंवा यांच्यापैकी कुणालाही विश्वास वाटण्यास भाग पाडलेला वाटत असेल, तर PhonePe चा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असेल.
- प्रत्येक पूर्ण केलेल्या सर्वेक्षणासाठी आणि/किंवा पात्र रेफरलसाठी, तुम्हाला PhonePe किंवा भागीदाराद्वारे निर्धारित केलेल्या फॉर्ममध्ये आणि पद्धतीने बक्षीस मिळेल. बक्षिसाच्या सेटलमेंटनंतर, PhonePe किंवा भागीदार, जशी परिस्थिती असेल तसे, असे सर्वेक्षण आणि/किंवा रेफरलच्या संदर्भात कोणतेही उत्तरदायित्व असणार नाही. तुम्ही याद्वारे सहमत आहात की कोणतेही बक्षीस जारी करणे हे कार्य पूर्ण करण्यासाठी वैध आणि पुरेसा विचार आहे.
- PhonePe आणि/किंवा त्याच्या अनुषंगिकांसाठी घेतलेल्या सर्वेक्षणे आणि रेफरल या दोन्हीसाठी एकत्रितपणे, प्रति युजर प्रति आर्थिक वर्ष (“बक्षीस मर्यादा”) INR 9,999/- (भारतीय रुपये नऊ हजार नऊशे नव्व्याण्णव) पर्यंत मर्यादित असेल. एकदा बक्षीस मर्यादा गाठली की, रेफरल्स आणि/किंवा सर्वेक्षणांसाठी पुढील आर्थिक वर्षातील उर्वरित सहभाग तुम्हाला पुढील बक्षिसांसाठी पात्र होणार नाहीत, जोपर्यंत तुमची बक्षीस मर्यादा पुन्हा सेट केली जात नाही. हेदेखील स्पष्ट केले, आहे की रेफरल्सच्या बाबतीत उत्पादन खरेदीची पुनरावृत्ती झाल्यास किंवा रेफरीकडून भागीदाराच्या उत्पादनाविरुद्ध किंवा सेवांचा लाभ घेतल्यास पुढील बक्षिसासाठी पात्र राहणार नाही.
- तुम्ही याद्वारे समजता आणि सहमत आहात की PhonePe द्वारे विहित केलेल्या अटी आणि शर्तींनुसार बक्षीस दिले जात आहेत.
- सर्वेक्षणांच्या संबंधात, तुम्ही याद्वारे समजता आणि सहमत आहात की:
- PHONEPE EARN/अर्न साठी सामान्य तरतुदी
- प्रसिद्धी प्रकाशन: सर्वेक्षण आणि/किंवा रेफरलमध्ये भाग घेऊन, तुम्ही PhonePe ला तुमचे नाव आणि प्रतिमा वापरण्यासाठी अधिकृत करता, जसे की कोणतीही चित्रे, फोटो, लेखन, व्हिडिओ रेकॉर्डिंग, ऑडिओ टेप, डिजिटल प्रतिमा आणि यासारख्या मूर्त गोष्टी असतील. किंवा सर्वेक्षण आणि/किंवा प्रचारात्मक किंवा विपणन हेतूंसाठी संदर्भित केले आहे. हे पुढे स्पष्ट केले आहे की तुम्ही सर्वेक्षण किंवा संदर्भादरम्यान जाणून घेतलेली कोणतीही माहिती कोणत्याही खाजगी किंवा सार्वजनिक मंचावर प्रसारित करणार नाही.
- गोपनीयतेची सूचना: सर्वेक्षण आणि/किंवा रेफरलमधील सहभागासाठी तुम्हाला तुमच्या आणि तुम्ही रेफरल अंतर्गत संदर्भ दिलेल्या व्यक्तींची वैयक्तिक माहिती सबमिट करण्याची आवश्यकता असू शकते/ सर्वेक्षणाअंतर्गत (असल्यास) उल्लेख करा, जसे की नाव, ईमेल पत्ता आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म खाते तपशील इत्यादी. तुम्ही सहमत आहात की तुम्ही, सर्वेक्षण किंवा रेफरी अंतर्गत नमूद केलेल्या व्यक्तींना PhonePe किंवा भागीदाराकडून, जशी परिस्थिती असेल तसे, सर्वेक्षण आणि/किंवा रेफरलमधील तुमच्या सहभागाबाबत म्हणणे प्राप्त होऊ शकते. PHONEPE EARN/अर्न अंतर्गत संकलित केलेली सर्व माहिती या अटींनुसार आणि PhonePe च्या गोपनीयता धोरणासह त्याच्या वेबसाइट धोरणांनुसार हाताळली जाईल.
- टाइमलाइन: सर्वेक्षणाच्या स्वरूपावर (प्राप्त झालेल्या प्रतिसाद/सबमिशनच्या संदर्भात) किंवा रेफरल (रेफरीद्वारे पूर्ण करणे आवश्यक असलेल्या कृतींच्या संदर्भात), PhonePe किंवा भागीदाराने समाधानकारक पूर्ण झाल्यानंतर निष्कर्ष काढण्यासाठी आवश्यक टाइमलाइन एखादे कार्य प्रत्येक केसच्या आधारावर बदलू शकते आणि आपण अशा मूल्यांकन कालावधीत संयम बाळगण्यास सहमत आहात.
- खाते समाप्त करणे आणि रद्द करणे/फेरफार/कार्यांचे निलंबन आणि बक्षीस:
- PhonePe कडे रेफरल, सर्वेक्षण किंवा त्यानंतरचे बक्षीस रद्द करण्याचा किंवा निलंबित करण्याचा, बक्षीस मिळवण्याची तुमची पात्रता संपुष्टात आणण्याचा किंवा तुमचे PhonePe खाते किंवा रेफरीची खाती संपुष्टात आणण्याचा अधिकार राखून ठेवतो, जर तुम्ही किंवा रेफरी: (i) अतिरिक्त बक्षीस तयार करण्यासाठी एकाच व्यक्तीसाठी भिन्न ई-मेल पत्ते आणि मोबाइल क्रमांकांसह एकापेक्षा जास्त PhonePe खाती उघडा; किंवा (ii) स्पॅम किंवा अनपेक्षित ईमेल वापरणाऱ्या व्यक्तींचा संदर्भ घ्या; किंवा (iii) बक्षीस मिळवण्यासाठी खोटी नावे वापरणे, इतर लोकांची तोतयागिरी करणे किंवा अन्यथा PhonePe ला खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती देणे; किंवा (iv) प्रशासन, सुरक्षा, किंवा संदर्भ आणि/किंवा सर्वेक्षणाच्या निष्पक्षतेशी कोणत्याही प्रकारे तडजोड केली किंवा मदत केली; किंवा (v) कोणत्याही लागू कायदा किंवा नियमांनुसार सर्वेक्षण आणि/किंवा रेफरलमध्ये भाग घेण्यास प्रतिबंधित असल्याचे आढळले आहे; किंवा (vi) या अटींचे किंवा सर्वेक्षण आणि/किंवा रेफरल अंतर्गत नमूद केलेल्या इतर कोणत्याही अटींचे उल्लंघन करणे.
- PhonePe सर्वेक्षण आणि/किंवा रेफरल रद्द करू शकते, सुधारू शकते, समाप्त करू शकते किंवा निलंबित करू शकते; (i) व्हायरस, वर्म्स, बग, अनधिकृत मानवी हस्तक्षेप किंवा त्याच्या नियंत्रणाबाहेरील इतर कारणांमुळे सर्वेक्षण आणि/किंवा रेफरलचे प्रशासन आणि सुरक्षा बिघडली असली पाहिजे; किंवा (ii) रेफरल्सच्या बाबतीत सर्वेक्षण किंवा पात्र रेफरल्सच्या बाबतीत नोंदींची संख्या, PhonePe च्या भागीदाराने विशिष्ट सर्वेक्षण किंवा संदर्भातील संदर्भासाठी निर्धारित केलेल्या अपेक्षित थ्रेशोल्ड पूर्तता करणे.
- वरीलपैकी कोणतेही उप कलमाला धक्का लागल्यास, PhonePe, त्याच्या विवेकबुद्धीनुसार आणि शक्य तितक्या प्रमाणात, अशा संदर्भात तुमच्याशी योग्य संवाद साधला जाईल याची खात्री करेल.
- उत्तरदायित्व सोडणे: PHONEPE EARN/अर्न मध्ये सहभागी होऊन, तुम्ही सर्वेक्षण, रेफरल किंवा बक्षिसाशी संबंधित सर्व बाबींसाठी दायित्वातून मुक्त होण्यास आणि निरुपद्रवी राहाल यासाठी PhonePe ठेवण्यास सहमती देता. ही मुक्तता वैयक्तिक दुखापतींसाठी (मृत्यूसह), मालमत्तेची हानी किंवा नुकसान आणि PHONEPE EARN/अर्न अंतर्गत ऑफर केलेल्या फायद्यांचा/बक्षिसांचा दुरुपयोग, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे PHONEPE EARN/अर्न मधील स्वीकृती, ताबा किंवा सहभागाच्या कारणास्तव दायित्वांसाठी आहे.
- अस्वीकरण: PhonePe कधीही आणि तुम्हाला पूर्वसूचना न देता, सर्वेक्षण आणि रेफरलच्या अटी आणि शर्तींमध्ये बदल करू शकते, ज्यामध्ये मर्यादेशिवाय, बक्षिसांची रक्कम बदलणे, बक्षीस रिडीम करण्याच्या पद्धतीमध्ये बदल करणे, व्हाउचरचा कालावधी/समाप्ती, बक्षीसची कमाल रक्कम बदलणे यांचा समावेश आहे. जेणेकरून तुम्ही कमाई करू शकाल इत्यादी.
- नुकसान भरपाई: कोणताही दावा किंवा मागणी, किंवा कोणत्याही तृतीय पक्षाद्वारे केलेल्या वाजवी वकिलांच्या शुल्कासह कृती किंवा अटी, गोपनीयता धोरण, किंवा तुम्ही कोणत्याही कायद्याचे, अटींचे किंवा नियमांचे किंवा अधिकारांचे उल्लंघन केल्यास किंवा त्यातून दंड उद्भवल्यास ( तृतीय पक्षाच्या बौद्धिक संपदा हक्कांच्या उल्लंघनासह) तुम्ही नुकसान भरपाई कराल आणि PhonePe ला यामध्ये उपद्रव देणार नाही.
- फोर्स मेज्युर: फोर्स मेज्युर इव्हेंट म्हणजे PhonePe च्या वाजवी नियंत्रणाबाहेरील कोणतीही घटना आणि त्यात युद्ध, दंगल, आग, पूर, देवाची कृत्ये, स्फोट, संप, लॉकआऊट, मंदी, प्रदीर्घ टंचाई यांचा समावेश असेल परंतु ते यापुरते मर्यादित नाही. ऊर्जा पुरवठा, महामारी, कॉम्प्यूटर हॅकिंग, कॉम्प्यूटर डेटा आणि स्टोरेज डिव्हाइसेसमध्ये अनधिकृत ॲक्सेस, कॉम्प्यूटर क्रॅश होणे, ॲक्ट ऑफ स्टेट, सरकारी, कायदेशीर किंवा नियामक कृती PhonePe ला या अटींनुसार संबंधित कर्तव्ये पार पाडण्यापासून प्रतिबंधित किंवा अडथळा आणतात.
- विवाद, नियमन कायदा आणि अधिकार क्षेत्र: हा करार आणि त्याखालील अधिकार आणि दायित्वे आणि पक्षांचे संबंध आणि या अटींच्या अंतर्गत किंवा संबंधित सर्व बाबी, ज्यामध्ये बांधकाम, वैधता, कार्यप्रदर्शन किंवा समाप्ती समाविष्ट आहे आणि द्वारे शासित केले जातील व हे भारतीय प्रजासत्ताकाच्या कायद्यांनुसार तयार केले गेले आहेत. सौहार्दपूर्ण समझोत्याच्या अधीन राहून आणि पूर्वग्रह न ठेवता, बंगळुरू, कर्नाटकमधील न्यायालयांना तुमच्या PHONEPE EARN/अर्न च्या वापराबाबत आणि त्यात सहभागी होण्याशी संबंधित सर्व बाबींवर प्रयत्न करण्याचे आणि त्यावर निर्णय घेण्याचे विशेष अधिकार असतील.