हे दस्तऐवज म्हणजे माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000, यात वेळोवेळी केलेल्या सुधारणा आणि त्याखालील लागू असलेले नियम आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 द्वारे सुधारित केलेल्या विविध कायद्यांमधील इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डशी संबंधित सुधारित तरतुदी यानुसार एक इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आहे. हे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड कॉम्प्युटर यंत्रणेद्वारे तयार केले जाते आणि यासाठी कोणत्याही भौतिक किंवा डिजिटल स्वाक्षरीची आवश्यकता नसते.
कृपया या अटी आणि शर्ती वाचा – PhonePe चेकआउट (खालील व्याख्येनुसार) मध्ये ॲक्सेस करण्यापूर्वी किंवा वापरण्यापूर्वी PhonePe चेकआउट (“अटी”) काळजीपूर्वक वाचा. या अटी तुम्ही आणि PhonePe प्रायव्हेट लिमिटेड (“PhonePe”) यांच्यातील बंधनकारक कायदेशीर करार आहे. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय हे, ऑफिस-2, 4,5,6,7, विंग ए, ब्लॉक ए, सलारपुरिया सॉफ्टझोन, सर्विस रोड, ग्रीन ग्लेन लेआउट, बेलंदूर, बंगलोर, साउथ बंगलोर, कर्नाटक – 560103, भारत येथे आहे. तुम्ही सहमती देता आणि मान्य करता की तुम्ही खाली दिलेल्या अटी वाचल्या आहेत. जर तुम्ही या अटींशी सहमत नसाल किंवा तुम्हाला या अटींशी बांधील राहायचे नसेल, तर तुम्ही PhonePe चेकआउटचा लाभ न घेणे/वापरणे निवडू शकता.
“तुम्ही”, “तुमचे” – जे युजर PhonePe चेकआउटचा लाभ घेत/ॲक्सेस करत आहेत अशा कोणत्याही नोंदणीकृत युजरला PhonePe हे संदर्भित करते.
PhonePe ने एक सॉफ्टवेअर/प्लॅटफॉर्म विकसित केला आहे ज्याच्याद्वारे तुम्हाला PhonePe (यापुढे “PhonePe क्लायंट” म्हणून संदर्भित) च्या ठरावीक व्यापारी/क्लायंटच्या क्लायंट प्लॅटफॉर्मवर (खालील व्याख्येनुसार) तुमचा चेकआउट प्रवास पूर्ण करण्याचा पर्याय दिला जाईल. या सेवेचा एक भाग म्हणून, क्लायंट प्लॅटफॉर्मवर तुमचा उत्पादन/सेवा चेकआउट प्रवास पूर्ण करण्यासाठी तुम्हाला PhonePe द्वारे (PhonePe क्लायंटच्या वेबसाइट/मोबाइल ॲप्लिकेशन/इतर प्लॅटफॉर्मच्या चेकआउट पेजवर (यापुढे “क्लायंट प्लॅटफॉर्म” म्हणून संदर्भित) एक पर्याय दिला जाईल (ज्यात समाविष्ट असू शकते, परंतु इतकेच मर्यादित नाही, (i) शिपिंग पद्धत कन्फर्म करणे आणि कूपन जोडणे (लागू असल्यास); (ii) प्राप्तकर्त्याचे नाव, डिलिव्हरीचा पत्ता आणि संबंधित फोन नंबर कन्फर्म करणे/जोडणे (यापुढे एकत्रितपणे “पत्ता” म्हणून संदर्भित); आणि (iii) पेमेंट करणे). या परिच्छेदामध्ये वर्णन केलेल्या सेवेला या अटींनुसार PhonePe चेकआउट म्हणून संबोधले जात आहे.
PhonePe चेकआउट सेवेचा लाभ घेण्यासाठी, तुम्हाला क्लायंट प्लॅटफॉर्मवर दिलेल्या बटण/टॅबवर क्लिक/टॅप करावे लागेल जे तुमच्या चेकआउट प्रवासादरम्यान डिस्प्ले केले जाईल. क्लिक/टॅप केल्यानंतर तुम्हाला PhonePe मोबाइल ॲप्लिकेशन/प्लॅटफॉर्म/मोबाइल साइट/वेबसाइट (किंवा PhonePe द्वारे वेळोवेळी विस्तारित केले जाणारे इतर कोणतेही प्लॅटफॉर्म) वर पुन्हा निर्देशित केले जाईल, ज्याला यापुढे “PhonePe प्लॅटफॉर्म” म्हणून संबोधले जाईल. याद्वारे हे स्पष्ट केले जाते की बटण/टॅबवर प्रदर्शित होणारी व्याख्या/शब्दावली आणि युजर प्रवाह (या अटींमध्ये प्रदान केल्यानुसार PhonePe चेकआउट सेवेचा लाभ घेण्यासाठी) तुम्हाला या संदर्भात कोणतीही सूचना न देता PhonePe द्वारे सुधारले जाऊ शकते.
PhonePe वेबसाइट आणि/किंवा PhonePe च्या मोबाईल ॲप्लिकेशनवर अपडेट झालेली आवृत्ती पोस्ट करून PhonePe कधीही या अटींमध्ये सुधारणा करू शकते. या अटींची अपडेटेड आवृत्ती पोस्ट केल्यावर लगेच लागू होईल. असे काही अपडेट/बदल असतील, तर या अटींचे वेळोवेळी पुनरावलोकन करणे ही सर्वस्वी तुमची जबाबदारी आहे. बदल पोस्ट केल्यानंतरही तुम्ही PhonePe चेकआउटचा वापर करत असाल, तर ती तुमची स्वीकृती आहे आणि अशा पुनरावृत्ती/बदलांना सहमती असते.
सामान्य नियम आणि अटी
- तुम्ही PhonePe चेकआउटचा लाभ घेण्यासाठी/वापरण्यासाठी पुढे जाण्यासाठी PhonePe ला तुम्हाला तुमची क्रेडेंशियल (OTP आणि/किंवा PhonePe योग्य वाटेल अशा कोणत्याही पद्धतीद्वारे) प्रमाणित करण्याची आवश्यकता असू शकते. यापुढे जोपर्यंत क्लायंट प्लॅटफॉर्म आणि/किंवा PhonePe प्लॅटफॉर्मवर तुमच्या लॉगिन तपशील/खाते/क्रेडेन्शियल्ससह लॉगिन केले जाते तोपर्यंत PhonePe चेकआउटचा लाभ घेणारा युजर तुम्ही आहात असे मानले जाईल.
- यशस्वी प्रमाणीकरणानंतर (आवश्यक असल्यास), तुम्हाला PhonePe चेकआउटच्या वापरासंदर्भात PhonePe प्लॅटफॉर्मवर ॲक्सेस दिला जाईल.
- PhonePe चेकआउटच्या संदर्भात PhonePe तुमचा कार्ट तपशील(निवडलेले उत्पादन/सेवा, प्रमाण, किंमत, एकूण रक्कम, डिलिव्हरी शुल्क यांसह परंतु इतके मर्यादित नाही) फेच करेल, ज्या PhonePe क्लायंटकडून तुम्ही असे उत्पादन/सेवा मिळवू इच्छित आहात त्यांच्याकडून असा कार्ट तपशील मिळवेल. तुम्ही याद्वारे PhonePe संबंधित PhonePe क्लायंटकडून असा डेटा (या परिच्छेदात दिल्याप्रमाणे) प्राप्त करण्यास आणि त्यावर प्रक्रिया करण्यास संमती देता.
- तुम्हला याद्वारे हे समजते आहे आणि तुम्ही यासाठी सहमत आहात, की PhonePe द्वारे संबंधित PhonePe क्लायंटकडून आणलेल्या आणि PhonePe प्लॅटफॉर्मवर डिस्प्ले केलेल्या सर्व डेटाचे पुनरावलोकन करणे आणि तो कन्फर्म करणे (खरेदी सुरू ठेवण्यापूर्वी/पूर्ण करण्यापूर्वी) ही तुमची जबाबदारी असेल.
- PhonePe क्लायंटकडून PhonePe द्वारे मिळवलेल्या अशा डेटाव्यतिरिक्त,
PhonePe, जेथे शक्य असेल तेथे, PhonePe प्लॅटफॉर्मवर, तुम्ही जोडलेला पत्ता पॉप्युलेट/डिस्प्ले करेल जो संबंधित उत्पादन/सेवा खरेदी/उपलब्ध करताना तुमच्याद्वारे वापरला/कन्फर्म केला/दिला जाऊ शकतो. तुमच्याकडे डिलिव्हरीचा पत्ता म्हणून कोणताही पर्यायी पत्ता जोडण्याचा पर्यायदेखील असेल.
- तुम्ही याद्वारे समजता की कार्ट तपशील (किंमत, उत्पादन उपलब्धता, वितरण शुल्क यासह, परंतु इतकेच मर्यादित नाही) तुम्ही निवडलेल्या वितरण पत्त्यावर आधारित बदलू शकतात. तुम्ही पेमेंटसह पुढे जाण्यापूर्वी त्याचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करण्यास सहमती देता.
- तुम्हला पुढे हेही समजते आहे, की PhonePe चेकआउटद्वारे PhonePe तुम्हाला संबंधित PhonePe क्लायंटकडून मिळवू/खरेदी करू इच्छित असलेल्या उत्पादन/सेवांसाठी तुमचा चेकआउट प्रवास पूर्ण करण्यासाठी तुम्हाला फक्त सक्षम/सेवासुविधा देत आहे. तसेच तुम्हाला हेदेखील समजले आहे की उत्पादन/सेवेची पूर्तता/विक्रीनंतरची सेवा ही PhonePe क्लायंटची एकमेव जबाबदारी असेल.
- तुम्हाला हे समजते आहे आणि तुम्ही सहमत आहात की अशी उत्पादन/सेवे संदर्भातील/संबंधित कोणताही विवाद/समस्या, ज्यामध्ये गुणवत्ता, व्यापार, कमतरता, डिलिव्हरी झाली नाही, उत्पादन/सेवा यांच्या डिलिव्हरीमध्ये विलंब लागला तर यासंबंधीचे सर्व विवाद थेट तुम्ही आणि PhonePe क्लायंट यांच्यात सोडवले जातील आणि PhonePe ला अशा कोणत्याही परिस्थितीत अशा विवाद/समस्यांमध्ये पक्षकार बनवले जाणार नाही. याशिवाय, अशा उत्पादनांची/सेवेची खरेदी (रिफंड/रिफंड कालावधीसह, परंतु इतकेच मर्यादित नाही) संबंधित PhonePe क्लायंटच्या अटी आणि शर्तींद्वारे नियंत्रित केली जाईल. तुम्हाला याद्वारे असे उत्पादन/सेवा खरेदी/उपलब्ध करण्यासाठी पुढे जाण्यापूर्वी PhonePe क्लायंटने दिलेल्या/लागू केलेल्या अटी आणि नियमांचे पुनरावलोकन करण्याचा यथायोग्य सल्ला देण्यात येत आहे.
- तुम्हाला हे समजते आहे आणि तुम्ही सहमत आहात की PhonePe, तुमच्याद्वारे उत्पादन/सेवा खरेदीच्या संदर्भात, तुम्ही PhonePe चेकआउटवर (विशिष्ट खरेदीच्या संदर्भात) दिलेला केलेला/कन्फर्म केलेला डेटा संबंधित PhonePe क्लायंटसोबत शेअर करेल जिथून तुम्ही उत्पादन/सेवा खरेदी करत आहात/उपलब्ध करत आहात. तुम्ही सहमत आहात की, असा डेटा एकदा का PhonePe द्वारे शेअर केला गेला की, PhonePe कोणत्याही परिस्थितीत, PhonePe क्लायंटद्वारे अशा डेटाच्या वापर/प्रक्रियेच्या संदर्भात PhonePe जबाबदार राहणार नाही. याव्यतिरिक्त, तुम्ही याद्वारे PhonePe चेकआउटवर तुम्ही दिलेला कोणताही डेटा PhonePe स्टोअर करण्यास/ठेवण्यास आणि त्यावर प्रक्रिया करण्यास सहमती देता.
- PhonePe चेकआउटचा एक भाग म्हणून, PhonePe तुमच्यासाठी उत्पादन/सेवा खरेदी/उपलब्ध करण्याच्या संदर्भात पेमेंटची सुविधा देखील देईल. तुम्ही निवडलेल्या पेमेंट इन्स्ट्रुमेंट/पद्धतीवर अवलंबून, PhonePe प्लॅटफॉर्मवर प्रदान केलेल्या संबंधित अटी आणि नियम (संबंधित पेमेंट इन्स्ट्रुमेंट/पद्धतीला लागू) लागू होतील. अशा अटी व शर्ती येथे संदर्भाद्वारे अंतर्भूत मानल्या जातील.
- PhonePe चेकआउटच्या संदर्भात तुम्हाला काही ऑफर (PhonePe/PhonePe क्लायंट/कोणत्याही तृतीय पक्षाद्वारे) एक्स्टेंड करून दिल्या जाऊ शकतात. तुम्ही सहमत आहात, की अशा ऑफरमध्ये सहभागी होणे तुम्ही संबंधित ऑफरच्या अटी व शर्तींना सहमती दर्शविल्याच्या अधीन आहे. तुम्ही सहमत आहात की अशा ऑफरच्या संदर्भात कोणताही विवाद/समस्या केवळ तुम्ही आणि अशा ऑफरचा विस्तार करणार्या पक्षादरम्यान हाताळल्या जातील.
संकीर्ण
- तुम्ही PhonePe, त्याचे सहयोगी, कर्मचारी, संचालक, अधिकारी, एजंट आणि प्रतिनिधी यांना तुमच्या PhonePe चेकआउटच्या वापर/अॅक्सेसच्या संबंधात उद्भवू शकणारे किंवा PhonePe क्लायंटकडून उत्पादन/सेवांचा खरेदी/लाभ घेण्याद्वारे उद्भवणाऱ्या कोणतेही आणि सर्व नुकसान, हानि, कार्यवाही, दावे आणि दायित्वांपासून (कायदेशीर खर्चासह) नुकसान भरपाईपासून सुरक्षित/निरपराध ठेवण्यास सहमती देता.
नफा किंवा महसूल गमावणे, व्यवसायात व्यत्यय, व्यवसायाच्या संधींचे नुकसान, डेटा गमावणे किंवा इतर आर्थिक हितसंबंधांचे नुकसान, मग ते करारात, निष्काळजीपणा, छेडछाडमुळे असो किंवा अन्यथा, वापरण्यात आलेली माहिती, करारामध्ये देण्यात आलेली अक्षमता, गैरसमज आणि गैरसमजामुळे होणारे नुकसान किंवा अन्य गोष्टी यांसह कोणत्याही परिस्थितीत PhonePe कोणत्याही अप्रत्यक्ष, परिणामी, आनुषंगिक, विशेष किंवा दंडात्मक हानीसाठी जबाबदार असणार नाही.
- या अटी कायदे तत्त्वांच्या विरोधाचा आदर न करता भारतीय कायद्यांद्वारे नियंत्रित केल्या जातील. या अटींच्या संबंधात तुम्ही आणि PhonePe मधील कोणताही दावा किंवा वाद जो संपूर्णपणे किंवा काही प्रमाणात उद्भवला असेल तर त्याचा निर्णय बंगलोर येथील सक्षम अधिकारक्षेत्राच्या न्यायालयाद्वारे घेतला जाईल.
- PhonePe या अटींनुसार उपलब्ध केलेल्या अशा PhonePe चेकआउट सेवांच्या अचूकतेबद्दल आणि वास्तविकतेबद्दल, व्यक्त झालेल्या किंवा नमूद केलेल्या सर्व वॉरंटी नाकारते.
- PhonePe वापराच्या अटी आणि PhonePe गोपनीयता धोरण या अटींमध्ये संदर्भाद्वारे अंतर्भूत केले आहे असे मानले जाईल.