या अटी आणि शर्ती PhonePe द्वारे जारी करण्यात आलेले गिफ्ट कार्ड, सेमी क्लोज्ड प्रीप्रेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (यापुढे “PhonePe गिफ्ट कार्ड” म्हणून संबोधले जाईल) हे PhonePe प्रायव्हेट लिमिटेडद्वारे ऑफर करण्यात येते, या कंपनीचा कंपनी कायदा, 1956 अंतर्गत समावेश असून तिचे नोंदणीकृत कार्यालय, ऑफिस-2, मजला 4,5,6,7, विंग ए, सलारपुरिया सॉफ्टझोन, सर्विस रोज, ग्रीन ग्लेन लेआउट, बेलंदूर, बंगलोर, दक्षिण बंगलोर, कर्नाटक-560103, भारत येथे आहे. या संदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेने अधिकृतता क्रमांक: 98/2016 दिनांक 9 डिसेंबर 2016 अंतर्गत PhonePe ला अधिकृत केले आहे.
गिफ्ट कार्ड खरेदी करून किंवा वापरून, तुम्ही या अटी व शर्तींना सहमती देत आहात आणि त्या स्वीकारत आहात.
- खरेदी:
फक्त 10,000 रुपये मूल्यांपर्यंतचे गिफ्ट कार्ड खरेदी केले जाऊ शकते. व्यवसाय नियम किंवा फसवणूक प्रतिबंध नियम यांवर आधारित, PhonePe गिफ्ट कार्डची कमाल रक्कम मर्यादित करू शकते. तुम्ही गिफ्ट-बक्षीस, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड वापरून PhonePe गिफ्ट कार्ड खरेदी करू शकता. वॉलेट किंवा गिफ्ट कार्ड बॅलेन्स वापरून गिफ्ट कार्ड खरेदी करता येत नाही. साधारणपणे गिफ्ट कार्ड तातडीने डिलिव्हर केली जातात. परंतु कधीकधी सिस्टममधील समस्यांमुळे डिलिव्हरीसाठी 24 तासांपर्यंत वेळ लागू शकतो. - मर्यादा:
कोणत्याही न वापरलेल्या गिफ्ट कार्ड बॅलेन्ससह गिफ्ट कार्ड जारी केल्याच्या तारखेपासून एका वर्षांत एक्सपायर होते. गिफ्ट कार्ड रीलोड केली जाऊ शकत नाहीत, पुन्हा विकली जाऊ शकत नाहीत, मूल्यासाठी ट्रान्सफर केली जाऊ शकत नाहीत किंवा रोख रकमेसाठी रिडीम केली जाऊ शकत नाहीत. न वापरलेला गिफ्ट कार्ड बॅलेन्स दुसऱ्या PhonePe खात्यात ट्रान्सफर केला जाऊ शकत नाही. PhonePe द्वारे कोणत्याही गिफ्ट कार्ड किंवा गिफ्ट कार्डच्या बॅलेन्सवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. - वटवणी (रिडम्प्शन):
गिफ्ट कार्ड केवळ PhonePe प्लॅटफॉर्मवरील पात्र व्यापाऱ्यांवरील व्यवहारांसाठी वटवले किंवा रिडीम केले जाऊ शकते. खरेदीची रक्कम युजरच्या गिफ्ट कार्ड बॅलेन्समधून वजा केली जाते. कोणताही न वापरलेला गिफ्ट कार्ड बॅलेन्स युजरच्या PhonePe खात्याशी संबंधित राहील आणि लवकरात लवकर एक्सपायरी तारखेच्या क्रमाने खरेदीसाठी लागू केला जाईल. युजरच्या गिफ्ट कार्ड बॅलेन्सपेक्षा खरेदीची रक्कम जास्त होत असेल, तर उर्वरित रक्कम इतर कोणत्याही उपलब्ध इन्स्ट्रुमेंट्ससह पेमेंट करणे आवश्यक आहे. गिफ्ट कार्ड वटवण्यासाठी युजरला कोणतीही फी किंवा शुल्क लागू नाही. - फसवणूक:
गिफ्ट कार्ड हरवले, चोरीला गेले, नष्ट झाले किंवा परवानगीशिवाय वापरले तर त्यासाठी PhonePe जबाबदार असणार नाही. जर फसवणूक करून मिळवलेले गिफ्ट कार्ड रिडीम केले गेले आणि/किंवा PhonePe प्लॅटफॉर्मवर खरेदी करण्यासाठी वापरले गेले तर PhonePe ला ग्राहकांची खाती बंद करण्याचा आणि पेमेंटच्या पर्यायी पद्धतींमधून पेमेंट घेण्याचा अधिकार असेल. PhonePe फसवणूक प्रतिबंधक धोरणांमध्ये गिफ्ट कार्ड्सची खरेदी आणि PhonePe प्लॅटफॉर्मवरील रिडेंप्शन या दोन्ही गोष्टींचा समावेश असेल. फसवणूक प्रतिबंधक धोरणांद्वारे संशयास्पद मानले जाणारे व्यवहार PhonePe द्वारे नाकारले जाऊ शकतात. PhonePe फसवणूक करून मिळवलेली/खरेदी केलेली गिफ्ट कार्ड रद्द करण्याचा आणि आमच्या फसवणूक प्रतिबंधक यंत्रणांना योग्य वाटेल त्याप्रमाणे संशयास्पद खात्यांवर निर्बंध घालण्याचा अधिकार राखून ठेवते. - प्री-पेड इन्स्ट्रुमेंट:
तुम्ही यासाठी सहमत आहात आणि तुम्हाला हे समजते, की गिफ्ट कार्ड हे RBI नियमांच्या अधीन असलेले प्री-पेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट आहे. RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, PhonePe प्रायव्हेट लिमिटेडला गिफ्ट कार्डच्या खरेदीदाराचे/रिडीम करणाऱ्याचे KYC तपशील आणि/किंवा गिफ्ट कार्डच्या खरेदीशी संबंधित कोणतीही माहिती आणि/किंवा गिफ्ट कार्डचा वापर करून केलेल्या व्यवहाराबाबत RBI किंवा अशा कायद्याने घालून दिलेल्या प्राधिकरणांसोबत शेअर करणे आवश्यक असू शकते. PhonePe प्रायव्हेट लिमिटेड अशा कोणत्याही माहितीसाठी गिफ्ट कार्डच्या खरेदीदार/रिडीम करणाऱ्याशी संपर्क साधू शकते.
PhonePe बक्षीस उपक्रम
PhonePe अशा युजरना वेळोवेळी बक्षीस स्वरूपात प्रोत्साहन देऊ शकते, युजरना जसे योग्य वाटेल तसे ते रिडीम करू शकतात.
PhonePe वापरासाठी सहमती देऊन PhonePe सेवांचे युजर खालील अटी व शर्तींना सहमती देतात:
- PhonePe ने वेळोवेळी ठरवल्यानुसार अंतर्गत धोरणांसह त्याच्या युजरना पुरस्कार देण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.
- कॅशबॅक पुरस्कारांसाठी कॅशबॅक पुरस्कार आणि वापरासाठी लागू होणार्या सर्व PhonePe अटी आणि शर्ती लागू राहतील (संदर्भ: PhonePe अटी आणि नियमांमध्ये ‘कॅशबॅक/वॉलेट बॅलेन्स मर्यादा’).
- PhonePe ला संशयास्पद किंवा फसव्या ॲक्टिव्हिटी आढळल्यास PhonePe वेळोवेळी, कोणतीही सूचना/इशारा न देता, युजरच्या खात्यातून (पूर्तता होण्याच्या आधी किंवा नंतर) बक्षीस परत घेण्याचा अधिकार राखून ठेवते.
- PhonePe द्वारे बक्षीस जारी केल्यानंतर युजरने अशा बक्षिसाचा (जसे की बक्षीस स्क्रॅच करणे) दावा करणे आवश्यक आहे. स्क्रॅच कार्ड दिल्यापासून/तरतूद केल्यापासून तीस (30) कॅलेंडर दिवसांच्या आत युजरने दावा केला नाही तर अशा युजरचे कोणतेही बक्षीस जप्त/रद्द केला जाईल.
- बक्षिसाची कोणत्याही प्रकारे हमी दिली जात नाही.
- तुम्ही बक्षीस जिंकले तर बक्षिसाची रक्कम तुमच्या PhonePe खात्यात PhonePe गिफ्ट व्हाउचर म्हणून जमा केली जाईल.
- PhonePe तुमची वैयक्तिक माहिती तुमच्याकडून अतिरिक्त संमतीशिवाय किंवा तुम्हाला भरपाई न देता प्रचारात्मक उद्देश्यांसाठी वापरू शकते.
- ही ऑफर तामिळनाडू राज्यात (तामिळनाडू बक्षीस योजना (प्रतिबंध) कायदा 1979 मुळे) आणि कायद्याने प्रतिबंधित आहे अशा राज्यांमध्ये उपलब्ध नाही.
- कोणत्याही ऑफरमध्ये ग्राहकांचा सहभाग हा प्रत्येक ऑफरशी संबंधित संपूर्ण अटी व शर्तींसाठीची त्यांची समज आणि संमती दर्शवतो.
पुरस्कार (कॅशबॅक) मर्यादा
तुम्ही कॅशबॅकसाठी पात्र असल्यास तुम्ही PhonePe गिफ्ट व्हाउचर प्रमाणेच प्राप्त करण्यास सहमती दर्शवता.
PhonePe गिफ्ट व्हाउचर 1 वर्षासाठी वैध असेल आणि प्रति गिफ्ट व्हाउचर रु. 10,000 च्या कमाल मर्यादेच्या अधीन आहे. PhonePe आपल्या विवेकबुद्धीनुसार, आपल्या व्हाउचरची वैधता कालावधी वाढविण्याचा अधिकार राखून ठेवते.
PhonePe एकूण लागू मर्यादेत अतिरिक्त रकमेची मर्यादा लादण्याचा अधिकार राखून ठेवते.
PhonePe ने वेळोवेळी ठरवलेल्या अंतर्गत धोरणानुसार ऑफर आणि संबंधित लाभ देण्याचा अधिकार PhonePe राखून ठेवते.
माझ्या व्यवहाराचा रिफंड/रद्द केल्यास काय होते?
व्यवहार रद्द झाला तरी व्यवहारावर दिलेला कॅशबॅक गिफ्ट व्हाउचर बॅलेन्स म्हणून राहील आणि तुमच्या बँक खात्यातून काढता येणार नाही. यानंतरही PhonePe (रिचार्ज, बिल पेमेंट इ.) वरील वापर सुरू ठेवता येतो.
कॅशबॅकपेक्षा कमी परत केलेली रक्कम पेमेंट करताना वापरलेल्या निधीच्या स्त्रोतामध्ये परत जमा केली जाईल.
कॅशबॅक गिफ्ट व्हाउचर रिचार्ज, बिल पेमेंट आणि PhonePe पार्टनर प्लॅटफॉर्म/स्टोअरवर पेमेंटसाठी वापरले जाऊ शकते.
कॅशबॅक गिफ्ट व्हाउचर कोणत्याही लिंक केलेल्या बँक खात्यातून काढता येत नाही किंवा इतर ग्राहकांना ट्रान्सफर करता येत नाही.
युजर PhonePe वर वितरित केलेल्या सर्व ऑफरमधून प्रति आर्थिक वर्षात (म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च) कमाल रु. 9,999 पर्यंत कमवू शकतो.
ई-व्हाउचर कोड दिसत नसल्यास आणि स्क्रीनवर त्रुटी संदेश दिसल्यास काय होते?
तांत्रिक त्रुटीमुळे ई-व्हाउचर कोड दिसत नसल्यामुळे ऑफरचा लाभ घेता आला नाही अशी शक्यता आहे. कुपया काळजी करू नका. फक्त ग्राहक सेवा केंद्रावर कॉल करा आणि स्क्रीन शॉट शेअर करून किंवा ते वाचून त्रुटी संदेश तपशील शेअर करा. एक सुधारित कोड दिला जाईल किंवा तुम्हाला पर्यायी कूपन/समान मूल्याची ऑफर दिली जाईल.