हे दस्तऐवज म्हणजे माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000, यात वेळोवेळी केलेल्या सुधारणा आणि त्याखालील लागू असलेले नियम आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 द्वारे सुधारित केलेल्या विविध कायद्यांमधील इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डशी संबंधित सुधारित तरतुदी यानुसार एक इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आहे. हे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड कॉम्प्युटर यंत्रणेद्वारे तयार केले जातो आणि यासाठी कोणत्याही भौतिक किंवा डिजिटल स्वाक्षरीची आवश्यकता नसते.
कृपया PhonePe प्लॅटफॉर्मवर कोणतीही उत्पादने किंवा सेवा (“PhonePe सेवा”) मिळवण्यासाठी तुमचे डेबिट/क्रेडिट कार्ड वापरून पेमेंट करण्यापूर्वी अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचा. या अटी व शर्ती (येथे “डेबिट/क्रेडिट कार्ड पेमेंट्स” किंवा “DCCP” म्हणून संदर्भ) म्हणजे तुम्ही आणि PhonePe प्रायव्हेट लिमिटेड (“PhonePe”/“आम्ही”/“आपण”/’’) यांच्यातील कायदेशीर करार (“करार”) आहे. PhonePe प्रायव्हेट लिमिटेडचे नोंदणीकृत कार्यालय, ऑफिस-2, मजला 4,5,6,7, विंग ए, ब्लॉक ए, सलारपुरिया सॉफ्टझोन, सर्विस रोड, ग्रीन ग्लेन लेआउट, बेलंदूर, बंगलोर, साउथ बंगलोर, कर्नाटक-560103, भारत येथे आहे. तुमची सहमती आहे आणि तुम्ही हे मान्य करता, की तुम्ही खाली दिलेल्या अटी व शर्ती वाचल्या आहेत. जर तुमची या अटी व शर्तींना सहमती नसेल किंवा या अटी व शर्तींना बांधील राहण्याची तुमची इच्छा नसेल, तर तुम्ही सेवा वापरू शकत नाही आणि/किंवा ताबडतोब सेवा समाप्त करू शकता.
आम्ही PhonePe वेबसाईट आणि PhonePe ॲपवर अपडेट झालेली आवृत्ती पोस्ट करून अटी आणि शर्तींमध्ये कधीही सुधारणा करू शकतो. सेवा अटींची अपडेट झालेली आवृत्ती पोस्ट केल्यानंतर त्वरित लागू होईल. अपडेट्स/बदल यासाठी किंवा DCCP वापरताना या वापर अटींचे वेळोवेळी पुनरावलोकन करणे ही सर्वस्वी तुमची जबाबदारी आहे. बदल पोस्ट केल्यानंतर PhonePe प्लॅटफॉर्मवर तुम्ही DCCP चा सतत वापर केला म्हणजे तुम्ही या अटींचे अतिरिक्त अटी किंवा काही भाग काढून टाकणे, सुधारणा इत्यादींसह केलेल्या सुधारणा स्वीकारता आणि मान्य करता. जोपर्यंत तुम्ही वापराच्या अटींचे पालन करत आहात, आम्ही तुम्हाला सेवांचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक, एक्सक्लुझिव्ह नसलेले, ट्रान्सफर होणार नाहीत असे मर्यादित विशेषाधिकार मंजूर करतो.
PhonePe प्लॅटफॉर्मवर DCCP वापरण्यासाठी पुढे जाऊन तुम्ही (“युजर”/ “तुम्ही”/“तुमचे”) सामान्य PhonePe अटी आणि नियम (“सामान्य ToU”) आणि PhonePe “गोपनीयता धोरण” यांना बांधील असण्याची तुमची सहमती देता. PhonePe ॲप्लिकेशनचा वापर करून तुम्ही PhonePe शी करार कराल आणि येथे दिलेल्या संदर्भ अटी व शर्तींद्वारे PhonePe सह तुमची बांधिलकी तयार होईल.
या अटी आणि शर्ती पेमेंट कार्ड नेटवर्क्स (AMERICAN EXPRESS, DINERS CLUB, MASTERCARD, RUPAY, MAESTRO, VISA किंवा इतर कोणतेही पेमेंट कार्ड नेटवर्क जे PhonePe प्लॅटफॉर्मवर पेमेंट करण्यासाठी दिले किंवा वापरले जाऊ शकते) अंतर्गत पेमेंटचे नियमन करतात.
PhonePe ॲपवर किंवा PhonePe व्यापारी/विक्रेत्यांना उत्पादने आणि सेवा यासाठी पेमेंट करता यावे म्हणून PhonePe तुमच्यासाठी डेबिट/क्रेडिट कार्ड पेमेंट सुविधा देते. हे व्यवहार व्यापारी/बिलर्स आणि तुम्ही यांच्यात आहेत आणि आम्ही केवळ मध्यस्थ म्हणून काम करत आहोत. आम्ही तुमच्याकडून पेमेंट गोळा करणे आणि संबंधित व्यापारी/बिलरला अशा पेमेंटचे सेटलमेंट करणे ही प्रक्रिया सोपी करतो. यासाठी तुम्ही आणि व्यापारी/बिलर्स यांच्यातील पेमेंट परिणामकारक व्हावे म्हणून त्यांच्याद्वारे दिलेल्या इंटरनेट पेमेंट गेटवेचा वापर सक्षम करण्यासाठी आणि तुमच्या व्यवहाराच्या संदर्भात क्लिअरिंग, पेमेंट आणि सेटलमेंट सेवा देण्यासाठी, पेमेंट अँड सेटलमेंट यंत्रणा कायदा, 2007, कार्ड असोसिएशन आणि इतर पेमेंट प्रक्रिया यंत्रणा प्रदाते याअंतर्गत स्पष्ट केल्यानुसार आम्ही विविध बँका, पेमेंट यंत्रणा प्रदात्यांशी करार केले आहेत.
तुम्ही दिलेल्या पेमेंट सूचना कार्ड असोसिएशन आणि तुमची कार्ड जारी करणारी बँक/वित्तीय संस्था पेमेंट यंत्रणा प्रदात्याच्या पेमेंट गेटवेद्वारे प्रमाणीकृत, अधिकृत आणि प्रक्रिया केल्या जातात आणि PhonePe अशा प्रमाणीकरण/अधिकृतीकरणामध्ये नियंत्रण, हस्तक्षेप किंवा कोणतीही भूमिका बजावत नाही.
“कार्ड पेमेंट नेटवर्क नियम” हे लिखित नियम, कायदे, प्रकाशन, मार्गदर्शक तत्त्वे, प्रक्रिया, अर्थ आणि कार्ड पेमेंट नेटवर्कद्वारे लादलेल्या आणि स्वीकारलेल्या इतर आवश्यकता (करारानुसार किंवा अन्य) यांचा संदर्भ मांडतात. या कार्ड पेमेंट नेटवर्कमध्ये व्यवहाराची अधिकृतता सक्षम व्हावी यासाठी पायाभूत सुविधा आणि प्रक्रिया आहेत. कार्ड पेमेंट नेटवर्कसाठी तुम्ही त्यांच्याद्वारे तयार केलेल्या सर्व लागू मार्गदर्शक तत्त्वांचे, नियमांचे आणि कायद्यांचे पालन करणे आवश्यक आहे.
पेमेंट यंत्रणा प्रदाते आणि कार्ड असोसिएशनने वेळोवेळी तयार केलेले नियम, मार्गदर्शक तत्त्वे, ठरवलेले मार्ग, सूचना, विनंत्या इत्यादींचे पालन करण्यास तुम्ही संमती देता आणि तुम्ही सहमत असता. तुम्ही हेदेखील मान्य करता, की पेमेंट यंत्रणा प्रदाते, कार्ड असोसिएशन आणि तुमची जारी करणारी बँक/वित्तीय संस्था त्यांच्या स्वत:च्या विवेकबुद्धीनुसार तुमच्या डेबिट/क्रेडिट कार्डवर मर्यादा आणि निर्बंध घालू शकतात आणि PhonePe कडे अशी नियंत्रणे/मर्यादेचे तारतम्य असू शकत नाही आणि म्हणून अशी कोणतीही परिस्थिती नसताना, PhonePe यशस्वी व्यवहार प्रक्रियेची खात्री देऊ शकते आणि म्हणून व्यवहार अयशस्वी झाल्यामुळे तुम्हाला होणार्या कोणत्याही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा परिणामकारक नुकसानासाठी ते जबाबदार असणार नाही.
PhonePe तुमच्या व्यवहारांचे निरीक्षण करेल आणि तुमच्या खात्याचे संरक्षण करेल आणि काही अंतर्गत जोखमांच्या परिणामांवर आधारलेले काही व्यवहार नाकारू शकेल आणि काही व्यवहारांची तक्रार नियामकांना किंवा कायदेशीर अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना करू शकेल आणि असे व्यवहार नेहमीपेक्षा वेगळे किंवा सर्वात जास्त जोखमीचे व्यवहार असल्याचे समजल्यास तुमचे PhonePe खाते तात्पुरते निलंबित करू शकेल.
सुरळीत असलेली सुरक्षित व्यवहार प्रक्रिया सहजतेने व्हावी यासाठी PhonePe तुम्हाला तुमचे कार्ड तपशील – कार्ड नंबर, एक्सपायरी डेट सुरक्षित एन्क्रिप्टेड पेमेंट कार्ड इंडस्ट्री डेटा सिक्युरिटी स्टँडर्ड “PCI-DSS” अनुरूप झोनमध्ये सेव्ह करण्याचा पर्याय देते. तुम्ही अशा स्टोअर कार्ड फीचरचा लाभ घेतला, तर आम्ही तुमचे कार्ड तपशील सेव्ह करू आणि पुढच्या वेळी तुम्ही कोणतेही पेमेंट कराल तेव्हा तुम्ही पेमेंट विनंती करताना सेव्ह केलेले कार्ड पटकन निवडू शकाल आणि तुमची पेमेंट सूचना प्रमाणीकरणासाठी पाठवली जाईल. तुमची OTP, CVV, 3D-सुरक्षित पासवर्ड, ATM पिन यासारखी कार्ड प्रमाणीकरण क्रेडेन्शियल्स कधीही सेव्ह केली जाणार नाहीत, आणि तुम्ही अधिकृत केल्याशिवाय व्यवहार प्रक्रिया करू शकणार नाही.
तुमचा कार्ड डेटा सुरक्षित राहावा. तुमच्या माहितीचे अपघाती नुकसान होऊ नये आणि अनधिकृत ॲक्सेसपासून सुरक्षा प्राप्त व्हावी यासाठी तांत्रिक आणि संस्थात्मक सुरक्षा नियंत्रण आणि प्रोटोकॉल लागू केले जातात. तुम्ही यासाठीही सहमत आहात, की हे स्टँडर्ड्स आणि प्रोटोकॉल अंमलात आणले जातात आणि त्यांचे परीक्षण केले जाते, हे उपाय नेहमीच तृतीय पक्षांद्वारे कोणत्याही अनधिकृत प्रवेशास प्रतिबंध करतील किंवा पराभूत करतील याची हमी आम्ही देऊ शकत नाही आणि तुम्ही ही जोखीम समजून घेता आणि मान्य करता आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या जोखमीवर अशी माहिती देता.
PhonePe प्लॅटफॉर्मवर किंवा त्यावर पेमेंट करण्यासाठी तुमच्या कार्ड जारीकर्ता बँक/वित्तीय संस्थेकडून तुमच्याकडून फी, शुल्क किंवा इतर कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जाऊ शकते. तुम्हाला हे समजते आहे, की PhonePe चे अशा शुल्क किंवा फी यांवर कोणतेही नियंत्रण नसते आणि आम्ही अशा शुल्काची जबाबदारी घेत नाही. तुम्ही तुमच्या कार्ड जारी करणाऱ्या बँक/वित्तीय संस्थेकडे असे शुल्क किंवा फीची तपासणी करणे आवश्यक आहे.
व्यापारी/बिलर्स किंवा PhonePe द्वारे सुरू केलेला कोणताही रिफंड/रिव्हर्सल ऑर्डर पूर्ण न केल्यास किंवा रिटर्न केल्यास स्रोत खात्यात रिफंड दिला जाईल किंवा तुमच्या PhonePe वॉलेट किंवा eGV किंवा तुमच्या परवानगीने इतर कोणत्याही परवानगी असलेल्या आर्थिक इन्स्ट्रुमेंटमध्ये जमा केला जाईल.
तुम्ही जर ‘सदस्यत्वे’ किंवा रिकरिंग पेमेंट मँडेटची निवड केलीत, तर तुम्ही सहमती देता की तुम्ही अधिकृत केलेल्या मँडेटनुसार संबंधित रक्कम अशा कार्डवर आकारली जाईल. तुम्ही यासाठीही सहमत आहात की PhonePe, PhonePe ग्रूप, PhonePe सहयोगी संस्था किंवा असे व्यापारी/बिलर्स तुम्ही अशी सूचना संपुष्टात आणत नाही तोपर्यंत संबंधित रक्कम तुमच्या कार्डवर आकारत राहतील.
अशा प्रकारे सातत्यपूर्ण, नावीन्यपूर्ण आणि सुधारणेचा भाग म्हणून आम्ही काहीवेळा फीचर आणि कार्यक्षमता जोडू किंवा काढून टाकू, आमच्या PhonePe सेवांमध्ये मर्यादा वाढवू किंवा कमी करू, नवीन सेवा ऑफर करणे सुरू करू किंवा PhonePe प्लॅटफॉर्मवर जुन्या सेवा देणे थांबवू. अशी ऑफर तृतीय पक्ष सेवा प्रदाते किंवा व्यवसाय भागीदारांद्वारे PhonePe प्लॅटफॉर्मवरील कोणतीही सेवा किंवा ऑफर बंद केल्यामुळे देखील असू शकते.
येथे स्पष्टपणे नमूद केल्याशिवाय आणि कायद्याने परवानगी दिलेल्या पूर्ण मर्यादेपर्यंत PhonePe सेवा “जशा आहेत तशा”, “जशा उपलब्ध आहेत” आणि “सर्व दोषांसह” दिल्या जातात. अशा सर्व हमी, प्रतिनिधित्व, अटी, अंडरटेकिंग आणि व्यक्त केलेल्या किंवा नमूद केलेल्या अटी यांद्वारे वगळलेल्या आहेत. PhonePe सेवांची अचूकता, पूर्णता आणि उपयुक्तता आणि PhonePe द्वारे दिलेल्या किंवा सामान्यतः उपलब्ध असलेल्या इतर माहितीचे मूल्यांकन करणे ही सर्वस्वी तुमची जबाबदारी आहे. आमच्यातर्फे कोणतीही हमी देण्यासाठी आम्ही कोणालाही अधिकृत करत नाही आणि तुम्ही अशा कोणत्याही विधानावर अवलंबून राहू नये.
RUPAY क्रेडिट कार्ड UPI द्वारे
आम्ही अशी पेमेंट सक्षम करणाऱ्या कार्ड जारीकर्त्यांसाठी, तुम्हाला तुमचे RuPay क्रेडिट कार्ड वापरून UPI द्वारे निवडक व्यापाऱ्यांना पेमेंट करण्यासाठी सक्षम करू शकतो, तुमच्या RuPay क्रेडिट कार्डवर UPI द्वारे पेमेंट सक्षम करण्यासाठी, तुम्हाला तुमचे RuPay क्रेडिट कार्ड PhonePe ॲपवर UPI शी लिंक करणे आणि एक M-PIN सेट करणे आवश्यक आहे. हे स्पष्ट करण्यात आले आहे, की तुम्ही फक्त UPI द्वारे अशा RuPay क्रेडिट कार्डला लिंक करू शकाल जे तुमच्या PhonePe ॲपवर नोंदणीकृत तुमच्या मोबाइल नंबरशी जोडलेले आहे.
M-PIN तयार करण्यासाठी तुम्हाला तुमच्या RuPay क्रेडिट कार्डची एक्सपायरी तारीख आणि शेवटचे सहा (6) अंक एंटर करणे आवश्यक आहे. आम्ही तुमच्या मोबाइल नंबरशी लिंक केलेले RuPay क्रेडिट कार्ड तपशील मिळवू आणि तुमच्याकडे असे RuPay क्रेडिट कार्ड UPI शी लिंक करण्याचा पर्याय असेल. एकदा M-PIN तयार झाल्यानंतर, तुम्ही M-PIN वापरून व्यवहार अधिकृत करू शकाल आणि OTP सोबत तुमच्या RuPay क्रेडिट कार्डचा तपशील एंटर करण्याची आवश्यकता नाही.
VPA वापरून UPI शी लिंक केलेल्या RuPay क्रेडिट कार्ड खात्यात दिलेली कोणतीही रक्कम क्रेडिट कार्ड बिलासाठी देय असेल. याव्यतिरिक्त UPI वापरून RuPay क्रेडिट कार्डद्वारे अधिकृत केलेल्या फॉरवर्ड पेमेंटचे कोणतेही रिफंड मिळाले, तर ते क्रेडिट खात्यात जमा/ॲडजस्ट केले जातील. तुमचे RuPay क्रेडिट कार्ड UPI द्वारे फक्त सक्षम व्यापार्यांना पेमेंट सक्षम करण्यासाठी वापरले जाऊ शकते आणि इतर कोणतेही पेमेंट (व्यक्तींना ट्रान्सफर, बँक खाते ट्रान्सफर यासह, परंतु इतकेच मर्यादित नाही)/रोख पैसे काढण्यासाठी वापरले जाऊ शकत नाही.
UPI द्वारे RuPay क्रेडिट कार्ड वापरून व्यवहार करताना UPI व्यवहारांसाठी लागू असलेल्या व्यवहार मर्यादा लागू होतील. याव्यतिरिक्त जारीकर्त्याने लागू केलेल्या कोणत्याही मर्यादेला अशा मर्यादेपेक्षा प्राधान्य द्यायला हवे (जर जारीकर्त्याने लागू केलेली मर्यादा UPI व्यवहारांसाठी लागू असलेल्या व्यवहार मर्यादेपेक्षा कमी असेल). तुमच्या लिंक केलेल्या RuPay क्रेडिट कार्डमध्ये तुमच्याकडे ‘उपलब्ध/कार्ड मर्यादा बॅलेन्स’ तपासण्याचा पर्याय देखील असेल. तुम्ही हे समजून घेता, की या सुविधेअंतर्गत आम्ही NPCI द्वारे दिल्यानुसार ‘उपलब्ध/कार्ड मर्यादा बॅलेन्स’ डिस्प्ले करू. असे बॅलेन्स तपशील देण्यात कोणत्याही अपयश आले किंवा वेळ लागला, तर आम्ही जबाबदार असणार नाही किंवा अशा माहितीच्या कोणत्याही त्रुटी किंवा चुकीसाठी आम्ही जबाबदार असणार नाही.
तुमच्या RuPay क्रेडिट कार्डवरील UPI वापरून अधिकृत केलेल्या व्यवहारासंबंधित कोणतेही विवाद हे तक्रार विभागात दिलेल्या प्रक्रियेनुसार आणि PhonePe UPI (येथे उपलब्ध: https://www.phonepe.com/terms-conditions/upi/) च्या वापराच्या अटींखालील तक्रार अंतर्गत हाताळले जातील आणि UPI व्यवहारांच्या संदर्भात NPCI ने (वेळोवेळी) नमूद केलेल्या कोणतीही इतर प्रक्रियेनुसार हाताळले जातील. कोणताही रिफंड/रिव्हर्सल UPI व्यवहारांना लागू होणाऱ्या टाइमलाइननुसार असेल.