या अटी व शर्ती PhonePe प्रायव्हेट लिमिटेडद्वारे सक्षम केलेल्या रिचार्ज आणि बिल पेमेंट सेवांच्या वापराचे नियमन करतात, कंपनी कायदा, 1956 अंतर्गत या कंपनीचा समावेश आहे. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय, ऑफिस-2, मजला 4,5,6,7, विंग A, ब्लॉक A, सलारपुरिया सॉफ्टझोन, सर्विस रोड, ग्रीन ग्लेन लेआउट, बेलंदूर, बंगलोर, साउथ बंगलोर, कर्नाटक – 560103, भारत येथे आहे. (यापुढे “PhonePe”/ “आम्ही”/”आम्हाला”/” आमचेे” म्हणून संबोधले जाईल). या संदर्भात PhonePe ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने पेमेंट आणि सेटलमेंट कायदा, 2007 च्या तरतुदींनुसार आणि RBI ने वेळोवेळी जारी केलेल्या नियम आणि निर्देशांनुसार अर्ध बंद PPI जारी करण्यासाठी अधिकृत केले आहे.
तुम्ही PhonePe रिचार्ज आणि बिल पेमेंट वापरणे सुरू ठेवता, तेव्हा तुम्ही https://www.phonepe.com/terms-conditions/ येथे स्थित असलेल्या आणि सर्वसाधारण PhonePe अटी आणि शर्ती ( “सर्वसाधारण अटी”) आणि https://www.phonepe.com/privacy-policy/ येथे उपलब्ध असलेल्या गोपनीयता धोरणासाठी मान्यता देऊन (“युजर”/ “तुम्ही”/ “तुमचे”) या वापर अटींशी (यापुढे “बिल पेमेंटच्या अटी आणि शर्ती”) बांधील असल्याची संमती देता. जेव्हा “युजर”/ “तुम्ही”/”तुमचा” असा संदर्भ आवश्यक असेल तेव्हा त्याचा अर्थ होतो, कोणीही नैसर्गिक किंवा कायदेशीर व्यक्ती जी भारत देशाची रहिवासी आहे, वयाची किमान 18 (अठरा) वर्षे पूर्ण केलेली आहे, अशी व्यक्ती भारतीय करार कायदा, 1872 नुसार करार करण्यास पात्र असते, ही व्यक्ती कर्जबाजारी दिवाळखोर नाही आणि या व्यक्तीने PhonePe ॲपवर नोंदणी हे बिल पेमेंट नियम व अटी स्वीकारून केली आहे.
PhonePe सेवांचा वापर करण्याद्वारे ज्यात PhonePe वर रिचार्ज आणि बिल पेमेंटच्या ऑफरचा समावेश आहे, तुम्ही PhonePe शी करार करता आणि या बिल पेमेंटच्या अटी आणि शर्तीमध्ये ऑफरच्या संदर्भात PhonePe सह येथे संदर्भ दिलेल्या सर्व पॉलिसीसह, यांमुळे तुम्ही बांधील राहाल अशा जबाबदाऱ्या तयार होतात.
यापुढे “व्यापारी/बिलर्स” या संज्ञांमध्ये रिचार्ज आणि बिल पेमेंट श्रेणीच्या उद्देशाने कोणतीही आस्थापने आणि/किंवा संस्था ज्या तुम्हाला युटिलिटी सेवा, पेमेंट सेवा देत आहेत आणि PhonePe वॉलेट, UPI, डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड (‘पेमेंट पर्याय’) ही पेमेंट पद्धत ज्यासाठी स्विकारली जाते अशी ऑनलाइन किंवा ऑफलाइन युटिलिटी खरेदी, ॲग्रीगेटरद्वारे पेमेंट खरेदी किंवा ज्यांना तुम्ही PhonePe ॲप वापरून बिल पेमेंट किंवा रिचार्ज करू शकता असे BBPO यांचा समावेश असेल.
जेव्हा तुम्ही PhonePe ॲपद्वारे किंवा कोणत्याही व्यापारी वेबसाइट/व्यापारी प्लॅटफॉर्म/व्यापारी स्टोअरवर रिचार्ज आणि बिल पेमेंट सेवेचा लाभ घेण्यासाठी PhonePe ॲप वापरून (कोणत्याही पेमेंट पर्यायांसह) व्यवहार करता, तेव्हा हे बिल पेमेंट अटी आणि शर्ती संबंधित व्यापाऱ्यांच्या अटी आणि शर्ती व्यतिरिक्त तुम्हाला लागू होतील.
आम्ही संपूर्णपणे आमच्या विवेकबुद्धीनुसार कोणत्याही वेळी तुम्हाला कोणतीही पूर्व लेखी सूचना न देता या वापर अटींचे काही भाग बदलण्याचा, सुधारित करण्याचा, जोडण्याचा किंवा काढून टाकण्याचा अधिकार राखून ठेवतो. अपडेट/बदल यासाठी या वापर अटींचे वेळोवेळी पुनरावलोकन करणे ही सर्वस्वी तुमची जबाबदारी आहे. बदल पोस्ट केल्यानंतर तुम्ही PhonePe ॲपचा वापर सुरू ठेवलात, तर त्याचा अर्थ असा होईल की तुम्ही अतिरिक्त अटी किंवा या अटींचे काही भाग काढून टाकणे, सुधारणा इत्यादींसह पुनरावृत्ती स्वीकारता आणि त्यासाठी सहमत आहात. जोपर्यंत तुम्ही या वापराच्या अटींचे पालन करत आहात तोपर्यंत आम्ही तुम्हाला PhonePe ॲपचा रिचार्ज आणि बिल पेमेंट ऑफर आणि इतर सेवांचा वापर करण्यासाठी मर्यादित विशेषाधिकार देतो ज्या PhonePe ॲपद्वारे वेळोवेळी पेमेंट, सदस्यत्व, रिचार्ज, युटिलिटी पेमेंट आणि इतर कोणत्याही आवर्ती पेमेंटसाठी ऑफर केल्या जाऊ शकतात.
PhonePe ॲपमध्ये PhonePe रिचार्ज आणि बिल पेमेंट हे फीचर वापरणे सर्व अटी आणि शर्तींशी तुमचा करार दर्शवते. म्हणून, कृपया पुढे जाण्यापूर्वी या अटी काळजीपूर्वक वाचा.
नमूद केल्याप्रमाणे किंवा स्पष्टपणे रिचार्ज आणि बिल पेमेंट अटी आणि शर्ती स्वीकारून, तुम्ही गोपनीयता धोरणासह सर्व PhonePe धोरणांना बांधील राहण्यास सहमती देता आणि संमती देता.
- रिचार्ज आणि बिल पेमेंटसाठी सामान्य अटी
- युजर याची नोंद घेऊ शकतात, की PhonePe हा केवळ पेमेंटचा सेवासुविधा देणारा पक्ष आहे आणि पेमेंटचा पक्ष नाही.
- PhonePe रिचार्ज आणि बिल पेमेंट सेवांची सुविधा देते आणि तुम्हाला मोबाइल पोस्टपेड, प्रीपेड रिचार्ज आणि लँडलाइन फोन बिल पेमेंट, स्ट्रीमिंग सेवा पेमेंटसाठी, DTH आणि सबस्क्रिप्शन पेमेंट, वीज, LPG सारखी अन्य युटिलिटी पेमेंट, क्रेडिट कार्ड पेमेंट, इन्शुरन्स प्रीमियम पेमेंट, ऑनलाइन देणगी, इंटरनेट ब्रॉडबँड आणि डेटा कार्ड बिल पेमेंट, महापालिका कर आणि पाणी कर पेमेंट करणे, शाळा शुल्क पेमेंट करणे, टोल कर रिचार्ज (फास्टटॅग) करणे, लोनची परतफेड करणे आणि PhonePe ने वेळोवेळी दिलेल्या सेवा ज्या मोबाईल ॲपच्या “रिचार्ज आणि बिल पेमेंट” विभागांतर्गत उपलब्ध आहेत त्यासाठी सेवासुविधा देते, a) ॲग्रीगेटर्स ज्यांच्याशी PhonePe चा करार आहे किंवा b) भारत बिल पेमेंट ऑपरेटिंग युनिट (BBPOU) पायाभूत सुविधांद्वारे जेथे व्यापारी बिल पेमेंटसाठी NPCI मध्ये नोंदणीकृत आहे.
- रिचार्ज आणि बिल पेमेंट सेट करणे:
- रिचार्ज किंवा बिल पेमेंट करण्यासाठी तुम्हाला युनिक ग्राहक ओळख/सबस्क्रिप्शन ओळख नंबर किंवा बिल नंबर किंवा नोंदणीकृत मोबाईल नंबर, नोंदणीकृत टेलिफोन नंबर किंवा अशी इतर ओळखपत्रे द्यावी लागतील, हे सर्व पेमेंट/सबस्क्रिप्शन पेमेंट किंवा बिल मूल्य, सबस्क्रिप्शन प्लॅन, पेमेंटची तारीख, थकबाकीची रक्कम आणि व्यापाऱ्यासोबत तुमच्या खात्यात पेमेंट सक्षम करण्यासाठी गरजेची अन्य माहिती मिळवण्यासाठी आवश्यक आहे.
- तुम्ही PhonePe ला तुमच्या खात्याशी संबंधित माहिती व्यापाऱ्यासोबत अॅक्सेस करणे, आणणे, शेअर करणे, वापरणे, रिचार्ज आणि बिले पेमेंट करणे आदी उद्देशांसाठी नियमितपणे अधिकृत करता.
- तुम्हाला हे समजते आहे, की योग्य बिल आणि सबस्क्रिप्शन मूल्य मिळवण्यासाठी माहितीची अचूकता अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यामुळे तुम्ही ओळखकर्त्याची माहिती अचूक आहे याची खात्री करण्यासाठी आणि त्यासाठी जबाबदार असल्याचे कन्फर्म करता.
- तुम्हाला हे समजते आहे, की पेमेंटची रक्कम, रिचार्ज किंवा सबस्क्रिप्शन मूल्य तुम्ही आणि व्यापारी यांच्यातील करार आहे आणि PhonePe वर ही योग्यता पडताळण्याचे कोणतेही बंधन नाही.
- तुम्ही तुमची खाते माहिती अपडेटेड ठेवाल आणि अटी व शर्तींचे नेहमी पालन कराल यासाठी संमती देता. अन्यथा PhonePe ला खाते निलंबित करण्याचा किंवा कोणत्याही सेवा नाकारण्याचा अधिकार आहे.
- तुम्ही सहमत आहात की रिचार्ज आणि बिल पेमेंट सेवा देण्यासाठी युजर ओळखकर्ता डेटा, स्थान/राज्य आणि/किंवा kyc माहिती/ इतर कोणतीही वैयक्तिक माहिती कर/GST उद्देशांसाठी व्यापारी/बिलरसह शेअर करणे आवश्यक आहे.
- तुम्ही तुमच्या खात्याच्या माहितीसह PhonePe चे व्यापारी, तृतीय पक्ष सेवा प्रदाते, ॲग्रीगेटर यांच्यासह संवाद साधण्यासाठी आणि व्यवहारावर प्रक्रिया करण्यासाठी सहमत आहात,
- तुम्ही हे देखील मान्य करता, की PhonePe रिमाइंडर सुविधा किंवा ऑटो पेमेंट सुविधा सेट करू शकते ज्याला तुम्ही स्पष्टपणे संमती देता आणि हे समजता की एकदा रिचार्ज आणि बिल पेसाठी व्यापाऱ्याला दिलेल्या पेमेंटचा रिफंड होणार नाही.
- पेमेंट किंवा विलंबित पेमेंट किंवा व्यापाऱ्याने केलेल्या पेमेंटवर लावलेल्या कोणत्याही दंड/व्याजासाठी कोणत्याही डुप्लिकेट स्थायी सूचनांसाठी तुम्ही जबाबदार असाल. PhonePe फक्त तुमच्यातर्फे व्यापाऱ्यांना पेमेंट करण्याची सेवा देते हे पुन्हा नमूद केले आहे.
- शुल्के:
- ॲक्सेस, तृतीय पक्ष पेमेंट किंवा तृतीय पक्ष पेमेंट सहभागी आणि/किंवा बिलर यांच्याकडून अशा इतर डेटां फीसाठी शुल्क आकारले जाऊ शकते, ज्यासाठी तुम्ही स्पष्टपणे सहमत आहात आणि त्यासाठी PhonePe जबाबदार असणार नाही.
- तुमच्या जबाबदाऱ्या: तुमच्या PhonePe रिचार्ज आणि बिल पेमेंटच्या वापरासंदर्भात, खालील गोष्टींचे पालन करणे तुमची जबाबदारी असेल:
- तुम्ही व्यवहाराच्या इतिहासातून आणि/किंवा व्यवहाराच्या यश किंवा अयशस्वी होण्याच्या सूचनांमधून व्यवहाराची पडताळणी करावी.
- तुमच्या खात्यातून कापून घेतलेल्या किंवा तुमच्या बिल/सबस्क्रिप्शन फीमध्ये जोडल्या जाणार्या रिचार्ज आणि बिल पेमेंट सेवेच्या संबंधात व्यापारी/बिलरद्वारे आकारलेल्या कोणत्याही शुल्कासाठी तुम्ही जबाबदार असाल.
- तुमची नियतकालिक बिले, सबस्क्रिप्शन फी आणि रिचार्ज संपण्याचा कालावधी आणि किंवा तुम्ही घेतलेल्या कोणत्याही युटिलिटी/सेवा किंवा रिकरिंग शुल्क सेवांच्या देय तारखांचा मागोवा ठेवण्यासाठी तुम्ही जबाबदार असाल आणि PhonePe बिलर्सकडून नियतकालिक पुनर्प्राप्ती मिळवण्याशी संबंधित कोणत्याही तांत्रिक समस्येसाठी किंवा बिलांमध्ये कोणत्याही त्रुटी/विसंगतीसाठी जबाबदार असणार नाही.
- तुमचे बिल पेमेंट शेड्यूल करण्यासाठी तुम्ही जबाबदार असाल आणि तुम्हाला समजले आहे की पेमेंट प्राप्तीची वेळ प्रत्येक मर्चंटनुसार बदलू शकते आणि ती फक्त तुमच्या सूचनांवर आधारित आहे की आम्ही पेमेंट करू. व्यवहारास विलंब /रिव्हर्सल किंवा व्यवहार अयशस्वी झाल्यास आम्ही त्यासाठी जबाबदार राहणार नाही.
- युजर त्रुटी:
- जर तुम्ही चुकून चुकीच्या पक्षाला किंवा चुकीच्या बिलरला पेमेंट पाठवले असेल किंवा चुकीच्या रकमेसाठी दुप्पट पेमेंट पाठवले असेल किंवा चुकीच्या रकमेसाठी पेमेंट पाठवले असेल (उदाहरणार्थ, तुमच्याकडून टायपोग्राफिकल त्रुटी झाली असेल) तर तुम्ही ज्या व्यापारी/पक्षाला तुम्ही पेमेंट पाठवले आहे त्यांच्याशी संपर्क साधणे आणि त्यांना रक्कम रिफंड सांगणे हा तुमच्याकडे एकमेव उपाय असेल. PhonePe तुम्हाला प्रतिपूर्ती करणार नाही किंवा तुम्ही चुकून केलेले पेमेंट रिफंड करणार नाही.
- अस्वीकरण:
- तुम्ही यासाठी सहमत आहात, की ऑनलाइन व्यवहारांमुळे उद्भवणाऱ्या सर्व जोखमीची जबाबदारी तुम्ही उचलाल.
- PhonePe आणि तृतीय पक्ष भागीदार हे सेवांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही हमी देत नाहीत, स्पष्ट सांगत नाहीत किंवा नमूद करत नाहीत, यात समावेश आहे पण इतकेच मर्यादित नाही: i) सेवा तुमच्या आवश्यकता पूर्ण करतील; II) सेवा अखंडित, वेळेवर किंवा त्रुटीमुक्त असतील; किंवा III) सेवांच्या संदर्भात तुम्ही मिळवलेली कोणतीही उत्पादने, माहिती किंवा साहित्य तुमच्या गरजा पूर्ण करेल.
- येथे स्पष्टपणे दिल्याशिवाय आणि कायद्याने परवानगी दिलेल्या पूर्ण मर्यादेपर्यंत, वॉलेट फीचर “जसे आहे तसे”, “जसे उपलब्ध आहे” आणि “सर्व दोषांसह” दिले गेले आहे. अशा सर्व हमी, प्रतिनिधित्व, अटी, उपक्रम आणि अटी, मग ते व्यक्त किंवा नमूद केलेल्या असतील, याद्वारे वगळण्यात आले आहेत. PhonePe द्वारे दिलेल्या किंवा सामान्यतः उपलब्ध असलेल्या सेवा आणि इतर माहितीची अचूकता, पूर्णता आणि उपयुक्तता यांचे मूल्यांकन करणे ही तुमची जबाबदारी आहे. आम्ही आमच्या वतीने कोणतीही हमी देण्यासाठी कोणालाही अधिकृत करत नाही आणि तुम्ही अशा कोणत्याही विधानावर अवलंबून राहू नये.
- अन्य अटी:
इतर अटी: युजर नोंदणी, गोपनीयता, युजरच्या जबाबदाऱ्या, नुकसानभरपाई, प्रशासकीय कायदा, बांधिलकी, बौद्धिक संपदा, गुप्तता आणि सामान्य तरतुदी इत्यादी अटींसह इतर सर्व अटी या वापर अटींमध्ये सामान्य अटींच्या संदर्भाने अंतर्भूत केल्या आहेत असे मानले जाते.