Trust & Safety
लॉटरी घोटाळा समजून घेणे, ओळखणे आणि टाळणे
PhonePe Regional|3 min read|18 December, 2023
तुम्हाला लॉटरीमध्ये जॅकपॉट लागला आहे, असा दावा करणारा एखादा ई-मेल किंवा फोन कॉल तुम्हाला आला तर किती आनंद होईल ना! गंमत अशी आहे, की तुम्ही लॉटरी घेतली होती की नाही हाच मुख्य प्रश्न असेल. पण यात ट्विस्ट असा आहे, की : तुमचंच बक्षीस मिळवण्यासाठी ते तुमच्याच खिशातले पैसे टाका असं सांगतील. जसे तुम्हाला एखाद्या दुकानात बंपर बक्षीसाची ऑफर देऊ करतात पण ती तुम्हाला फुकट मिळणार नाहीये, त्यासाठी तुम्हाला आगाऊ पैसे द्यावे लागतात!
लॉटरी घोटाळा म्हणजे काय?
लॉटरी घोटाळा हा फसवणुकीचा एक प्रकार आहे, याची सुरुवात अनपेक्षित ई-मेल नोटिफिकेशन, फोन कॉल किंवा पत्राने होते. यामध्ये तुम्ही लॉटरी तिकिटात मोठी रक्कम जिंकली आहे असं सांगितलं जातं आणि एखाद्या विशिष्ट फोन नंबरवर किंवा एजंटच्या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधण्यास सांगितले जाते. खरा उद्देश फसवणूक करण्याचा असतो. एजंटशी संपर्क साधल्यानंतर, तुम्हाला लॉटरीचे बक्षीस मिळविण्यासाठी प्रक्रिया शुल्क भरण्यास सांगितले जाईल.
धोक्याचे संकेत
संभाव्य घोटाळा ओळखण्यात मदत करतील असे हे काही धोक्याचे संकेत आहेत, यामुळे तुम्हाला सावध राहण्यास आणि परिस्थिती टाळण्यास मदत होते:
- अनपेक्षित नोटिफिकेशन: तुम्ही कोणतीही लॉटरी घेतलेली नाही पण तरीही असे नोटिफिकेशन आल्यास सावध व्हा. तुम्ही न घेतलेल्या लॉटरीबद्दल तुम्हाला लॉटरी जिंकल्याचे नोटिफिकेशन फसवणुकीचा संकेत आहे. तुम्ही स्वतःहून लॉटरी खरेदी करता तेव्हाच तुम्ही कायदेशीररित्या लॉटरी जिंकू शकता.
- आगाऊ पेमेंट्स: खऱ्या लॉटरीमध्ये विजेत्यांना आगाऊ शुल्क भरण्यास सांगितले जात नाही. तुम्ही खरोखर लॉटरी जिंकली असेल, तर बक्षीस मिळवण्यासाठी तुम्हाला पैसे भरण्याची गरज नसते. परंतु तुम्ही जिंकला आहात पण आधी तुम्हाला पैसे भरावे लागतील असं कुणी सांगत असेल तर हा तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत असल्याचा संकेत आहे.
- विश्वास बसणार नाही इतके चांगले : चांगली दिसणारी प्रत्येक गोष्ट खरी असेलच असे नाही. उत्साहित होऊन कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नीट तपासून घ्या.
- खूप घाई दाखवणे: कुणी तुमच्यावर ताबडतोब कृती करण्यासाठी दबाव टाकत असेल तर सावध रहा. घोटाळेबाज अनेकदा व्यक्तींना जास्त विचार करण्यास किंवा सल्ला घेण्यापासून रोखण्यासाठी घाई करतात.
- न जुळणारी संपर्क माहिती: तुम्हाला देण्यात आलेले संपर्क तपशील कथित लॉटरी आयोजकाच्या अधिकृत माहितीशी जुळत आहेत की नाही ते तपासा. कायदेशीर लॉटरीमध्ये एकसारखी आणि अचूक माहिती असते.
- व्याकरणातील त्रुटी: अधिकृत संवाद प्रकारात खराब व्याकरण आणि शुद्धलेखनाकडे लक्ष द्या. अस्सल संस्था साधारणपणे त्यांच्या पत्रव्यवहारात व्यावसायिक मानक राखतात.
- निनावी पेमेंट पद्धती: जर फसवणूक करणारे गिफ्टकार्ड किंवा वायर ट्रान्सफर सारख्या अपारंपरिक किंवा शोध घेता येणार नाही अशा पद्धतींद्वारे पेमेंटचा आग्रह धरत असतील, तर निश्चितपणे ही फसवणूक आहे. खऱ्या संस्था सुरक्षित आणि पारदर्शक पेमेंट पद्धती वापरतात.
- अधिकृत वेबसाइट नाही: अधिकृत वेबसाइटचा नसणे हा धोक्याचा संकेत आहे. प्रस्थापित लॉटरींमध्ये सामान्यत: माहिती देण्यासाठी आणि त्यांची वैधता पडताळून पाहण्यासाठी प्रोफेशनल ऑनलाइन उपस्थिती असते.
- तक्रारी तपासा: लॉटरी संस्थेशी संबंधित घोटाळे किंवा तक्रारींसाठी ऑनलाइन शोध घ्या. जर इतरांची फसवणूक केली गेली असेल, तर तुमचीही फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे.
- अनावश्यक वैयक्तिक माहिती: जर त्यांनी तुमच्या बँकेचे तपशील किंवा क्रेडिट कार्ड नंबर यासारखी अनावश्यक वैयक्तिक माहिती विचारली तर सावध व्हा. कायदेशीर लॉटरींना बक्षिसे देण्यासाठी विस्तृत वैयक्तिक माहितीची आवश्यकता नसते.
तुम्ही लॉटरी घोटाळ्याचे बळी असाल तर तक्रार कशी करावी:
- तुम्ही लॉटरी घोटाळ्याला बळी पडल्याचा तुम्हाला संशय असल्यास, संभाव्य नुकसान कमी करण्यासाठी आणि पुढील नुकसान टाळण्यासाठी त्वरित कारवाई करणे महत्त्वाचे आहे. पुढे काही उपाय दिले आहेत त्यांचा तुम्ही विचार करावा:
- PhonePe ॲप: मदत विभागात जा आणि ‘Others/इतर’ अंतर्गत एक समस्या दाखल करा. ‘Account Security & Reporting Fraudulent Activity’ निवडा आणि घटनेचा रिपोर्ट करण्यासाठी सर्वात योग्य असलेला पर्याय निवडा.
- PhonePe कस्टमर केअर नंबर: समस्या मांडण्यासाठी तुम्ही PhonePe ग्राहक सेवेला 80–68727374/022–68727374 वर कॉल करू शकता, त्यानंतर ग्राहक साहाय्यता एजंट तिकीट तयार करतील आणि तुमच्या समस्येमध्ये मदत करतील.
- वेबफॉर्म सबमिशन: तुम्ही PhonePe चे https://support.phonepe.com/ वेबफॉर्म वापरून तिकीटही तयार करू शकता,
- सोशल मीडिया: तुम्ही PhonePe च्या सोशल मीडिया हँडलद्वारे फसवणुकीच्या घटनांची तक्रार करू शकता
- ट्विटर / Twitter- https://twitter.com/PhonePeSupport
- सबुक/Facebook – https://www.facebook.com/OfficialPhonePe
- तक्रार: सध्याच्या तक्रारीवर कम्प्लेंट नोंदवण्यासाठी, तुम्ही https://grievance.phonepe.com/ वर लॉगिन करू शकता आणि पूर्वी तयार केलेला तिकीट आयडी शेअर करू शकता.
- Cyber cell: सायबर सेल: शेवटी, तुम्ही जवळच्या सायबर क्राइम सेलमध्ये फसवणुकीच्या तक्रारी नोंदवू शकता किंवा https://www.cybercrime.gov.in वर ऑनलाइन तक्रार नोंदवू शकता किंवा सायबर क्राइम सेलच्या हेल्पलाइनवर 1930 वर संपर्क साधू शकता.
महत्त्वाची सूचना — PhonePe कधीही गोपनीय किंवा वैयक्तिक तपशील विचारत नाही. Phonepe.com या डोमेनकडून नसलेल्या परंतु PhonePe कडून असल्याचा दावा करणाऱ्या सर्व ई-मेल्सकडे दुर्लक्ष करा, तुम्हाला फसवणुकीचा संशय असल्यास कृपया ताबडतोब अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.