PhonePe Blogs Main Featured Image

Trust & Safety

पेमेंट फसवणूक प्रकार आणि त्यापासून सुरक्षित राहण्याचे सर्वोत्तम उपाय

PhonePe Regional|4 min read|11 May, 2021

URL copied to clipboard

पेमेंट फसवणूक प्रकार आणि त्यापासून सुरक्षित राहण्याचे सर्वोत्तम उपाय

आपल्या आर्थिक व्यवहारांचे पेमेंट करण्यासाठी डिजिटल पेमेंट माध्यमांच्या वापरासोबत आपले आयुष्य खरेच खूप सोपे झाले आहे. पेमेंट ॲप द्वारे पैसे पाठवणे, सर्व बिलांचे पेमेंट, रिचार्ज, ऑनलाइन खरेदी तसेच स्थानिक किराणा स्टोर वर तात्काळ पेमेंट हे सर्व करता येत असल्यामुळे आता आपल्या जवळ रोख पैसे नसले तरी काही काळजी वाटत नाही आणि आपण आता आपल्याकडे रोख रकम न ठेवण्यास चांगलेच सरावले आहोत.

डिजिटल पेमेंट माध्यमांच्या वापरात झालेल्या मोठ्या वाढीसोबत, काही फसवणूक करणारे लोक तुम्हाला खोट्या व्यवहारात अडकवून लुटण्याच्या नवनवीन क्लुप्त्या सातत्याने शोधत असतात.

फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध PhonePe द्वारे केले जाणारे प्रतिबंधात्मक उपक्रम, फसवणूक चे प्रकार आणि तुम्ही कसे सुरक्षित राहू शकता याबाबत अधिक माहिती पुढे दिली आहे.

PhonePe चे फसवणूक करणांऱ्या विरुद्धचे प्रतिबंधात्मक उपक्रम

PhonePe वर व्यवहारांचा तुमचा अनुभव अतिशय सुरक्षित आणि विश्वसनीय करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो. फसवणाऱ्या व्यक्तींना दूर ठेवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि जोखीम व फसवणूक रोखण्यासाठी मजबूत उपाय या दोन्हीचा योग्य संयोजनात आम्ही उपयोग करतो.

PhonePe खाते आणि व्यवहार सुरक्षा: प्लॅटफॉर्म सुरक्षित आणि विश्वसनीय ठेवण्यासाठी, आम्ही सर्व खात्यांना आणि खात्यातून होणाऱ्या व्यवहारांना सत्यापित करतो. हे सत्यापन विविध टप्प्यांवर केले जाते. एका नवीन युजरने PhonePe वर रजिस्टर केल्यावर, त्यांचा नंबर OTP च्या माध्यमातून सत्यापित केला जातो, तसेच सर्व UPI व्यवहारांसाठी एक MPIN/पासवर्ड सेट करावा लागतो आणि नवीन डिव्हाइस मधून केलेले कोणतेही लॉगिन एका OTP सत्यापनाद्वारे प्रमाणित केले जाते.

तसेच आम्ही संशयास्पद प्रकारच्या आणि उच्च जोखीम सूचित करणाऱ्या व्यवहारांना प्लॅटफॉर्ममध्ये प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करतो.

जोखीम तपास: आमची जोखीम तपासणारी टीम वेगवेगळ्या चॅनल्सद्वारे रिपोर्ट केलेल्या फसवणूकीच्या घटनांची हाताळणी करते आणि ग्राहक, विक्रेते, पार्टनर आणि बाह्य एजंसींना मदत करते. तसेच ही टीम फसव्या व्यवहारांना पकडण्याद्वारे फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध निश्चित संरक्षण देण्याचे काम सुद्धा करते.

फसवणूक रोखण्यासाठी तांत्रिक क्षमता: सर्व फसवणूकीच्या व्यवहारांचे तपशील मिळवण्याची खात्री करण्यासाठी आम्ही IP, लोकेशन समन्वय इत्यादी सारखे वास्तविक वेळेचे सिग्नल्स मिळवतो. तसेच आम्ही संशयास्पद युजर्सची चेतावणी देण्यासाठी युजर गतिविधी, डिव्हाइस आणि साधने यासारखी ऐतिहासिक माहिती सुद्धा ठेवतो.

कायदा अनुपालन संस्थांसोबत भागीदारी: आम्ही देशभरातील वेगवेगळ्या कायदा अनुपालन संस्थांच्या सायबर-गुन्हा शाखांसोबत सहयोगाने काम करतो. फसवणूकीच्या तक्रारी दाखल झाल्यावर आम्ही त्यांना संबंधित माहिती प्रदान करणे, अशा व्यवहारांना प्रतिबंधित करणे आणि फसवणूक करणाऱ्या युजर्सला PhonePe प्लॅटफॉर्मवर प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करणे याद्वारे मदत करतो. तसेच आम्ही सर्व ओळखल्या गेलेल्या फसवणूक करणाऱ्या युजर्सचा नकारात्मक डेटाबेस देखील ठेवतो.

फसवणूक होणे रोखण्यासाठी काय करावे आणि काय नाही:

  • कार्ड नंबर, एक्सपायरी दिनांक, पिन, OTP, इत्यादी सारखे गोपनीय तपशील कोणालाही देऊ नका. PhonePe प्रतिनिधी असल्याची बतावणी करून तुमच्याकडे कोणी अशा तपशीलांची विचारणा केल्यास, कृपया त्यांना तुम्हाला एक ई-मेल पाठवण्यास सांगा. फक्त @phonepe.com डोमेन वरून आलेल्या ई-मेल्सला प्रतिसाद द्या.
  • नेहमी लक्षात ठेवा PhonePe वर पैसे प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कधीच ‘पेमेंट’ करण्याची किंवा तुमचा UPI पिन टाकण्याची आवश्यकता नाही.
  • Screenshare, Anydesk, Teamviewer सारख्या तृतीय पक्षाच्या ॲप डाउनलोड किंवा इन्स्टॉल करू नका.
  • PhonePe ग्राहक सहाय्यता नंबरसाठी Google, Twitter, FB इत्यादी वर शोध घेऊ नका. PhonePe ग्राहक सहाय्यता सोबत संपर्क साधण्यासाठी https://phonepe.com/en/contact_us.html हे एकमेव अधिकृत संकेतस्थळ आहे.
  • विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरील केवळ आमच्या अधिकृत खात्यावरून आमच्याशी संपर्क करा.

Twitter हँडल: https://twitter.com/PhonePe

https://twitter.com/PhonePeSupport

Facebook खाते: https://www.facebook.com/OfficialPhonePe/

वेबसाइट: support.phonepe.com

  • PhonePe सहाय्यता असल्याचा दावा करणाऱ्या असत्यापित मोबाइल नंबरवर कधीही कॉल करू/प्रतिसाद देऊ नका.

तुम्हाला एखाद्या फसवणूक करणाऱ्याने संपर्क केल्यास तुम्ही काय करावे?

  • तुमच्या जवळच्या सायबर-सेल गुन्हा शाखा कडे ताबडतोब यांचा रिपोर्ट करा आणि पोलिसांना संबंधित तपशील (फोन नंबर, व्यवहार तपशील, कार्ड नंबर, बँक नंबर, बँक खाते इ.) देऊन FIR दाखल करा.
  • तुमच्या PhonePe ॲप वर लॉगिन करा आणि ‘मदत’ विभागात जा. तुम्ही फसवणूक च्या घटनेचा रिपोर्ट ‘Account security issue/ Report fraudulent activity’ अंतर्गत करू शकता.

पुढे फसवणूकीचे विविध प्रकार उदाहरणांसह दिले आहेत:

पैशांच्या विनंती द्वारे फसवणूक : ‘विनंती’ फिचर द्वारे लोक तुम्हाला पेमेंट विनंती पाठवू शकतात. आणि तुम्ही लोकांना फक्त ‘पेमेंट करा’ बटनावर क्लिक करून आणि UPI पिन टाकून पैसे पाठवू शकता. फसवणूक करणारे या फिचरचा गैरवापर करतात आणि ‘पैसे प्राप्त करण्यासाठी तुमचा UPI पिन टाका, “पेमेंट यशस्वी झाले रु. Xxx” प्राप्त झाले’ या प्रकारच्या मॅसेज सोबत नकली पेमेंट विनंती पाठवतात.

पैशांची विनंती करण्याद्वारे फसवणूक, याबाबत अधिक माहिती इथे वाचा.

पैसे प्राप्त करण्यासाठी QR कोड स्कॅन करून फसवणूक: फसवणूक करणारे Whatsapp सारख्या मल्टीमीडिया ॲपवर QR कोड शेअर करतात आणि पैसे प्राप्त करण्यासाठी तुम्हाला हा कोड स्कॅन करण्यास सांगतात. लक्षात ठेवा असे कोणतेही फिचर नाही जे तुम्हाला पैसे प्राप्त करण्यासाठी QR कोड स्कॅन करण्यास सांगते. कृपया अशा विनंतीवर कुठलीही क्रिया करू नका तसेच पाठवणाऱ्याचा नंबर आणि इतर तपशीलांचा रिपोर्ट करा.

तृतीय-पक्ष ॲपच्या माध्यमातून पेमेंट फसवणूक: आजकाल बरेच युजर्स त्यांना व्यवहारात येणाऱ्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी सोशल मीडिया चॅनलचा वापर करतात. फसवणूक करणारे अशा युजर्सला फोन करतात किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क करतात आणि ते कंपनीचे प्रतिनिधी असल्याची बतावणी करतात. ते युजर्सला Screenshare, Anydesk, Teamviewer, इ. सारख्या स्क्रीन शेअर करणाऱ्या ॲप डाउनलोड करण्यास सांगतात आणि युजर्सला त्यांचे डेबिट/क्रेडिट कार्ड त्यांच्या फोनच्या कॅमेऱ्यासमोर धरण्यास सांगतात, जेणेकरून PhonePe ची सत्यापन यंत्रणा कार्डचे तपशील योग्यरित्या स्कॅन करू शकेल. एकदा त्यांना कार्ड चे तपशील मिळाले की ते फोनवरून OTP SMS प्राप्त करतात आणि त्यांच्या स्वतःच्या खात्यात तुमचे पैसे ट्रान्सफर करून घेतात.

तृतीय-पक्ष ॲपच्या माध्यमातून पेमेंट फसवणूक, याबाबत अधिक माहिती इथे वाचा.

Twitter वर फसवणूक: फसवणूक करणारे भामटे, युजर्स PhonePe ग्राहक सहाय्यता PhonePe customer care handle वर काय पोस्ट करत आहेत (कॅशबॅकचा लाभ घेणे, पैसे ट्रान्सफर,इ. बाबतचे ट्विट) त्याचा माग ठेवतात आणि ताबडतोब प्रतिसाद देतात. बनावट ग्राहक सेवा नंबर देणारे ट्विट करणे आणि त्यांना PhonePe हेल्पलाइन नंबर म्हणून सांगणे हा युजर्सला फसवण्याचा एक लोकप्रिय मार्ग आहे. याबाबत अजाण असलेले ग्राहक, या फसव्या लोकांनी दिलेल्या बनावट हेल्पलाइन नंबर वर कॉल करतात, कार्ड नंबर आणि OTP सारखी संवेदनशील माहिती शेअर करतात.

Twitter वर फसवणूक, बाबत अधिक माहिती इथे वाचा.

डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा टॉप-अप फसवणूक: अशा मामल्यांमध्ये फसवणूक करणारे तुम्हाला कॉल करतात आणि ते तुमच्या बँकेचे चे प्रतिनिधी असल्याचा, RBI, इ-कॉमर्स साइट, किंवा अगदी एका लॉटरी स्कीम कडून बोलत असल्याचा दावा करतात आणि तुम्हाला तुमचा 16 अंकी कार्ड नंबर आणि CVV शेअर करण्यास सांगतात, आणि तुम्हाला OTP सोबत एक SMS प्राप्त होतो. फसवणूक करणारे तुम्हाला पुन्हा कॉल करतात आणि सत्यापनाच्या उद्देशासाठी तुम्हाला हा OTP देण्यास सांगतात. एकदा तुम्ही त्यांना ही माहिती दिल्यावर फसवणूक करणाऱ्याचे वॉलेट तुमच्या खात्यातील पैशांनी टॉप-अप केले जाते.

टॉप-अप फसवणूक, याबाबत अधिक माहिती इथे वाचा.

सोशल इंजिनियरींग फसवणूक: फसवणूक करणारे जेव्हा तुमच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून तुमचा विश्वास संपादित करतात आणि तुमची फसवणूक करतात तेव्हा त्यास सोशल इंजिनियरींग फसवणूक असे म्हणतात. फसवणूक करणारे तुम्हाला फोन करुन, ते तुमच्या बँकेचे ग्राहक सहाय्यता प्रतिनिधी असल्याचा दावा करतात. तुम्ही सोशल मीडिया वर शेअर केलेल्या तपशीलांचा (जन्मतारीख, लोकेशन, इ.) वापर करुन ते तुमचा विश्वास संपादित करतात आणि तुम्हाला संवेदनशील माहिती जसे बँक खाते/कार्ड चे तपशील शेअर करण्यास सांगतात.फसवणूक करणारे नंतर व्यवहार पूर्ण करण्यासाठी तुम्हाला OTP प्रदान करण्यास सांगतात आणि तुमचे डेबिट कार्ड वापरून त्यांच्या वॉलेटचे टॉप-अप करतात.

सोशल इंजिनियरींगच्या माध्यमातून फसवणूक याबाबत अधिक माहिती इथे वाचा.

सिम स्वॅप फसवणूक: या प्रकारच्या फसवणूक मध्ये फसवणूक करणारे तुम्हाला फोन करुन ते तुमच्या मोबाइल ऑपरेटरचे प्रतिनिधी असल्याचा दावा करतात,आणि तुमचे नेटवर्क अपग्रेड करण्यासाठी एक SMS फॉर्वड करण्यास सांगतात. या SMS मध्ये एका नवीन सिम च्या मागचा 20 अंकी नंबर असतो. हा SMS तुमचे वर्तमान सिम निष्क्रिय करतो आणि डुप्लिकेट सिम सक्रिय करतो.

सिम स्वॅप फसवणूक, याबाबत अधिक माहिती इथे वाचा.

Keep Reading