
Trust & Safety
वाढते जॉब स्कॅम: नोकरी शोधणाऱ्यांना घोटाळेबाज कसे फसवतात
PhonePe Regional|4 min read|27 January, 2025
आजच्या जगात, जिथे नोकरी शोधणाऱ्यांना बऱ्याचदा त्वरित नोकरी मिळवण्याचा दबाव असतो, घोटाळे आणि फसवणूक करणारे या असुरक्षिततेच्या भावनेचा फायदा घेत आहेत आणि लोकांना फसवत आहेत. आज नोकरीत फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये अधिकृत दिसणारे बनावट ई-मेल हँडलर्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर सर्वात जास्त आढळणारे प्रकार आहेत, ज्याचा फायदा घोटाळेबाजांकडून लोकांना फसवून त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी केला जात आहे.रिमोट नोकऱ्यांमधील वाढीसोबत उच्च बेरोजगारी दरामुळे नोकरी घोटाळ्याच्या प्रकरणांची संख्या वाढते आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या ताज्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर 2024चादेशातील सरासरी बेरोजगारीचा दर 7.85% आहे. यामुळे फसवणूक करणाऱ्यांना निष्पाप नोकरी शोधणारे सापडतात ज्यांची नोकरीच्या नितांत गरजेमुळे पिळवणूक केली जाऊ शकते.
बनावट ई-मेल हँडलरमध्ये वाढ
फसवणूक करणाऱ्यांद्वारे वापरल्या जाणाऱ्या सर्वात फसव्या पद्धतींपैकी एक म्हणजे बनावट ई-मेल पत्ते तयार करणे जे कायदेशीर कॉर्पोरेट पत्त्यांसारखेच दिसतात. हे ई-मेल हँडलर अनेकदा एका सुप्रसिद्ध कंपनीच्या नावाची नक्कल करतात, त्यामुळे संशय नसलेल्या नोकरी शोधणाऱ्यांना विश्वास बसतो की ते एका प्रतिष्ठित संस्थेतील भर्तीकर्त्याशी संवाद साधत आहेत.
उदाहरणार्थ, फसवणूक करणारे स्कॅमर [email protected] किंवा [email protected] सारखा ईमेल पत्ता वापरू शकतो, जो वास्तविक कॉर्पोरेट ईमेल पत्त्यासारखाच दिसतो. बऱ्याचदा, अधिकृत कंपनी लोगो, पत्ते आणि औपचारिक संप्रेषणाच्या टोनशी जुळणारी व्यावसायिक भाषा यासह अधिकृत दिसण्यासाठी हे ईमेल तयार केले जातात.
घोटाळेबाजांची आता फसवणूक करण्यासाठी नोकरीच्या अर्जांच्या डोमेननुसार ऑनलाइन मुलाखत चाचण्या तयार करण्यापर्यंत मजल गेली आहे. यामुळे पेमेंटसाठी तपासण्यापूर्वी लोकांना या प्रक्रियेमुळे हे फसवे आणखी खरे वाटतात.
नोकरी शोधणाऱ्याने एकदा ई-मेलला प्रतिसाद दिल्यावर, त्यांना नोकरीची एक रोमांचक ऑफर दिली जाते आणि ऑफर सुरू करण्यापूर्वी त्यांना “प्रोसेसिंग फी” किंवा “प्रशिक्षण शुल्क” भरण्यास सांगितले जाते. स्कॅमर दावा करतात की हे शुल्क पार्श्वभूमी तपासणी, प्रशिक्षण किंवा उपकरणांच्या खर्चासाठी आवश्यक आहे. तथापि, एकदा पैसे भरल्यानंतर, नोकरीची ऑफर नाहीशी होते आणि फसवणूक करणारे पीडिताचे पैसे घेऊन गायब होतात.
ही पद्धत विशेषतः धोकादायक आहे कारण फसवे ई-मेल पत्ते इतके खात्रीशीर दिसतात की अगदी सावध व्यक्ती देखील यांस बळी पडू शकतात. हे नोकरीच्या ऑफरच्या वैधतेची पडताळणी करण्याचे महत्त्व अधोरेखित करते, विशेषत: जे आधी पेमेंटची आगाऊ विनंती करतात.
सोशल मीडिया आणि जॉब प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घोटाळा
अलिकडच्या वर्षांत, घोटाळेबाज देखील त्यांचा पुढील बळी शोधण्यासाठी सोशल मीडिया आणि जॉब प्लॅटफॉर्मकडे वळले आहेत.
फसवणूक करणारे सामान्यत: प्रतिष्ठित कंपनीकडून असल्याचा दावा करून, आकर्षक ऑफरसह नोकरी शोधणाऱ्यांशी संपर्क साधतात. ते संदेशांद्वारे व्यक्तींशी संपर्क साधू शकतात किंवा ग्रुप किंवा इतर प्लॅटफॉर्मवर खोट्या नोकरीच्या सूची पोस्ट करू शकतात जिथे लोक सक्रियपणे रोजगार शोधत आहेत. या सूची अनेकदा उच्च पगाराची पोझिशन्स आणि घरातून काम करण्याचे आश्वासन देतात ज्यासाठी कमी अनुभव किंवा कौशल्ये आवश्यक असतात, जे त्वरित रोजगाराच्या शोधात असलेल्या नोकरी शोधणाऱ्यांना लगेच आकर्षित करतात.
एकदा व्यक्तीने या नोकरीसाठी त्यांचे स्वारस्य व्यक्त केल्यावर, घोटाळेबाज बनावट KYC प्रक्रिया करण्यासाठी पुढे जातो. या प्रक्रिया पूर्णपणे कायदेशीर दिसू शकतात, पुढे विश्वास प्रस्थापित करतात. कथित पडताळणीनंतर, नोकरी शोधणाऱ्याला सांगितले जाते की त्यांची कामासाठी निवड झाली आहे आणि काही कार्ये किंवा असाइनमेंट पूर्ण केल्यानंतर त्यांचा पगार मिळविण्यासाठी त्यांना अपेक्षित आगाऊ रक्कम देण्याची सूचना दिली जाते. स्कॅमर असा दावा करू शकतो की हा “पेमेंट प्रोसेसिंग फी” किंवा बँक खात्याच्या पडताळणीचा भाग आहे. विश्वास संपादन करण्यासाठी ते खात्यात काही रक्कम देखील जमा करू शकतात. पण अखेरीस, ते अदृश्य होतात आणि तुम्ही त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधू शकत नाहीत. या घोटाळ्यांबद्दल सर्वात चिंताजनक गोष्ट म्हणजे ते बऱ्याचदा अत्यंत चांगल्या पद्धतीने प्लॅटफॉर्म तयार करतात , ज्यामुळे त्यांना कायदेशीरपणाचा वरवरचा दिखावा मिळतो. नोकरी शोधणाऱ्यांना खोटे करार, अधिकृत दिसणारी पदे आणि पगाराची आश्वासने मिळू शकतात, पण एकदा पैसे पाठवल्यानंतर घोटाळे करणारे गायब होतात.
धोक्याच्या सूचना ज्या तुम्ही तपासायला हव्या
या फसव्या डावपेचांपासून दूर राहण्यासाठी नोकरीच्या घोटाळ्याची चिन्हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. हे तपासण्यासाठी पुढे काही संकेत दिले आहेत:
- अनपेक्षित जॉब ऑफर: जर तुम्ही नोकरीसाठी अर्ज केला नसेल आणि कोणीतरी तुमच्यापर्यंत अनपेक्षितपणे संपर्क साधत असेल, तर हा घोटाळा असू शकतो.
- पैशाची विनंती: तुम्ही काम सुरू करण्यापूर्वी किंवा तुमचा पगार मिळवण्यापूर्वी कायदेशीर कंपनी तुम्हाला कधीही पैसे देण्यास सांगणार नाही. विशेषत: “प्रशिक्षण शुल्क,” “पार्श्वभूमी तपासणी शुल्क” किंवा “विविध शुल्क” अशा विनंत्या आल्या असल्यास सावध व्हा.
- ऑफर खरी आहे की नाही असे वाटण्याइतपत खूप चांगली आहे: घोटाळेबाज अनेकदा लोकांना अवास्तव आश्वासने देऊन आमिष दाखवतात, जसे की उच्च पगाराच्या नोकऱ्या ज्यासाठी किमान प्रयत्न किंवा पात्रता आवश्यक असते.
- बनावट ईमेल पत्ते: नेहमी ईमेल पत्ते दोनदा तपासा. अधिकृत डोमेनमधील थोड्याफार फरकांकडे लक्ष द्या—जसे अतिरिक्त अक्षरे, संख्या किंवा असामान्य डोमेन नावे.
- त्वरीत कार्य करण्याचा दबाव: जर तुम्हाला विचार करण्यासाठी किंवा संशोधन करण्यासाठी पुरेसा वेळ न देता त्वरित निर्णय घेण्याची घाई केली जात असेल तर तो एक घोटाळा असू शकतो.
- अव्यवसायिक संप्रेषण: घोटाळेबाजाचे व्याकरण खराब असू शकते, भाषा अव्यवसायिक किंवा सामान्य भाषा (जसे की “तुमच्या नावाऐवजी “प्रिय उमेदवार”) वापरू शकतात, जे ऑफर बनावट असल्याचे दर्शवू शकते.
स्वतःचे कसे संरक्षण करायचे
नोकरीच्या घोटाळ्यांना बळी पडण्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी, या टिपांचे अनुसरण करा:
- कंपनीच्या तपशीलासाठी संशोधन करा: कंपनी नेहमी ऑनलाइन पहा आणि त्यांची अधिकृत वेबसाइट सत्यापित करा. नोकरी ऑफरच्या वैधतेची पुष्टी करण्यासाठी अधिकृत संप्रेषण चॅनेलद्वारे थेट त्यांच्याशी संपर्क साधा.
- नोकरीसाठी कधीही पैसे देऊ नका: प्रतिष्ठित नियोक्ते नोकरी किंवा पगार प्रक्रियेच्या बदल्यात पैसे मागणार नाहीत. तुम्हाला पैसे मागितले गेल्यास, ते घोटाळ्याचे स्पष्ट संकेत आहे.
- विश्वसनीय प्लॅटफॉर्म वापरा: सुप्रसिद्ध जॉब बोर्ड आणि करिअर प्लॅटफॉर्मच पहा जिथे कंपन्या खऱ्या नोकरीच्या संधी पोस्ट करतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या ऑफरबद्दल सावधगिरी बाळगा, जेथे वैधता सत्यापित करणे कठीण आहे.
- ईमेल डोमेन तपासा: पूर्ण ईमेल ॲड्रेस पहा आणि तो कंपनीच्या अधिकृत डोमेनवरून आला असल्याची खात्री करा.
- तुमच्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवा: नोकरीच्या ऑफरबद्दल काहीतरी वाईट वाटत असल्यास, सावधगिरी बाळगणे चांगले आहे. कोणत्याही कायदेशीर नोकरीच्या ऑफरसाठी तुम्हाला आगाऊ पैसे पाठवण्याची आवश्यकता नाही.
निष्कर्ष
नोकरीत घोटाळ्याचे नवनवीन प्रकार विकसित होत आहेत आणि फसवणूक करणारे त्यांच्या डावपेचांमध्ये अधिक अत्याधुनिक होत आहेत. अधिकृत कंपनी डोमेन्सची नक्कल करणारे बनावट ईमेल पत्ते आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फसव्या जॉब लिस्ट अविश्वसनीयपणे खात्री वाटणाऱ्या असू शकतात. नोकरी शोधणाऱ्यांनी जागरुक आणि संशयी राहणे आवश्यक आहे, विशेषत: जेव्हा ऑफर खरोखर आहे की नाही असे वाटण्यासाठी खूप चांगल्या वाटतात किंवा त्यासाठी आगाऊ पैसे द्यावे लागतात. कोणत्याही नोकरीच्या ऑफरची वैधता पडताळण्यासाठी नेहमी वेळ काढा आणि या योजनांना बळी पडू नये म्हणून तुमची वित्तीय माहिती सुरक्षित करा. जागरुक राहून आणि सावध राहून, तुम्ही नोकरी शोधण्याचा अनुभव अधिक सुरक्षित करण्याचे सुनिश्चित करू शकता आणि कामासाठी तुमच्या हतबलतेचा गैरफायदा घेऊ पाहणाऱ्या स्कॅमरपासून दूर राहू शकता.
तुम्ही जॉब स्कॅमचे बळी ठरल्यास तुम्ही काय करायला हवे
तुम्हाला PhonePe वर एका जॉब स्कॅमरने फसवले असल्यास, तुम्ही पुढील मार्गांनी ताबडतोब तक्रार दाखल करू शकता:
- PhonePe ॲप: मदत विभागात जा आणि “have an issue with the transaction/व्यवहारात समस्या आहे” पर्यायाच्या अंतर्गत एक समस्या दाखल करा.
- PhonePe ग्राहक सेवा संपर्क क्रमांक: तुम्ही समस्येचा रिपोर्ट करण्यासाठी PhonePe च्या ग्राहक सेवेशी 80–68727374 / 022–68727374 वर फोन करून संपर्क साधू शकता, यानंतर ग्राहक सेवा प्रतिनिधी एक तिकीट दाखल करतील आणि तुमच्या समस्येसाठी मदत करतील.
- वेबफॉर्म सबमिशन: तुम्ही PhonePe चा वेबफॉर्म, https://support.phonepe.com/ वापरून एक तिकीट सुद्धा दाखल करू शकता.
- सोशल मीडिया: तुम्ही PhonePe च्या सोशल मीडिया हँडलद्वारे फसवणुकीच्या घटनांची तक्रार करू शकता.
ट्विटर – https://twitter.com/PhonePeSupport
फेसबुक – https://www.facebook.com/OfficialPhonePe - तक्रार: विद्यमान तक्रारीबाबतचा रिपोर्ट करण्यासाठी, तुम्ही https://grievance.phonepe.com/ वर लॉग इन करू शकता आणि आधी नोंदवलेला तिकीट आयडी शेअर करू शकता.
- सायबर सेल: शेवटी, तुम्ही जवळच्या सायबर क्राइम सेलमध्ये फसवणुकीच्या तक्रारी नोंदवू शकता किंवा https://www.cybercrime.gov.in/ वर ऑनलाइन तक्रार नोंदवू शकता किंवा सायबर क्राइम सेलची हेल्पलाइन 1930 वर संपर्क साधू शकता.
महत्त्वाची सूचना— PhonePe तुम्हाला कधीही गोपनीय किंवा वैयक्तिक तपशील विचारत नाही. ज्या ई-मेल phonepe.com डोमेन वरून आलेल्या नाहीत अशा सर्व PhonePe पासून असल्याचा दावा करणाऱ्या ई-मेल्सकडे दुर्लक्ष करा. तुम्हाला फसवणुकीचा संशय असल्यास, कृपया ताबडतोब अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.