Trust & Safety
बनावट ॲप्सपासून सुरक्षित रहा!
PhonePe Regional|3 min read|27 April, 2021
स्मार्टफोन्स आणि डिजिटल सुविधांच्या युगात मोबाईल ॲप्लिकेशन्स हे संवाद, मनोरंजन आणि उत्पादनासाठीची आवश्यक संसाधने बनली आहेत. सुविधा असली तरीही तिच्याबरोबर जोखीम येतेच : लोकप्रिय आणि विश्वसनीय ॲप्सची नक्कल करणारे बनावट ॲप्स तयार करणे. अशा वाईट हेतूने तयार केलेल्या ॲप्समुळे युजरसाठी डेटा चोरी, आर्थिक नुकसान आणि गोपनीयतेवर आक्रमण असे धोके निर्माण होतात. अशी ॲप्स कायदेशीर ॲप्स म्हणून दाखवण्यासाठी फार हुशारीने डिझाईन केलेली असतात. या ब्लॉगद्वारे फसव्या ॲप्लिकेशन्सचे जग, त्यांचे धोके आणि अशा ॲप्सचा बळी न पडण्याचे मार्ग एक्सप्लोअर करण्यात आले आहेत..
बनावट ॲप्स समजून घेणे
बनावट ॲप्स अस्सल ॲप्सच्या डिझाईन आणि कार्यक्षमतेचे अनुकरण करण्यासाठी तयार केली जातात, ज्यामुळे त्यांना मूळ ॲप्सपासून वेगळे करणे कठीण होते. विश्वसनीय ॲप स्टोअरमध्ये अशी ॲप वारंवार दिसत राहिल्याने त्याबद्दल विश्वासही वाटायला लागतो. युजरनी अशी ॲप्स डाऊनलोड केल्याने त्यांची फसवणूक करता यावी यासाठी सायबर गुन्हेगार ही युक्ती वापरतात. यामुळे त्यांची डेटा चोरी, आर्थिक फसवणूक व गोपनीयतेवर आक्रमण असे हानिकारक परिणाम होऊ शकतात.
येथे काही सामान्य पद्धती आहेत ज्याद्वारे बनावट ॲप्सद्वारे फसवणूक होऊ शकते:
- फिशिंग
तुम्ही बनावट ॲप्स डाउनलोड करता तेव्हा ते तुमच्या डिव्हाइसला मालवेअरने संक्रमित करण्यासाठी तुम्ही इनपुट केलेले लॉगिन क्रेडेंशियल वापरू शकते. क्रेडेन्शियल्सचा वापर इतर वाईट हेतूंसाठी देखील केला जाऊ शकतो.
- विशेषाधिकार वाढवणे
स्कॅम करणारे तुमच्या डिव्हाइसवरील विशेषाधिकारांना बायपास करण्यात मदत करण्यासाठी कायदेशीर ॲपच्या नावाखाली बनावट ॲप डिझाईन करू शकतात. याचा परिणाम मुख्य सुरक्षा कार्यांमध्ये हस्तक्षेप होऊ शकतो, याचा सर्वात मोठा धोका युजरना असतो.
- रॅन्समवेअर
काही बनावट ॲप्स डाउनलोड केल्यावर, तुमच्या डिव्हाइसला रॅन्समवेअरची लागण होते ज्यामुळे तुमचा डेटा एन्क्रिप्टेड होतो आणि वाचता येत नाही. तुमच्या डेटाचा ॲक्सेस मिळवण्यासाठी, फसवणूक करणारे तुमच्याकडून पैशांची मागणी करतील.
बनावट ॲप्स कशी ओळखायची
खालील उपायांचे पालन करून तुम्ही बनावट ॲप्सपासून सुरक्षित राहू शकता:
- ॲप सत्यापित करा: सर्वात आधी विकासकाचे नाव कन्फर्म करा. बनावट ॲप्सची नावे सामान्यत: सारखीच असतात परंतु त्यात एक त्रुटी असतेच, ज्यामुळे ते खऱ्या ॲपपासून वेगळे आहे हे ओळखण्यात मदत होईल. लहान टायपो किंवा लोगोमधील बदल तपासा. तुम्ही योग्य ते ॲप डाउनलोड केले आहे याची खात्री करण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटसह ते जुळवून पाहू शकता.
- रेटिंग आणि पुनरावलोकने तपासा: स्थापित ॲप्समध्ये सहसा मोठ्या संख्येने रेटिंग आणि पुनरावलोकने असतात. एखाद्या ॲपची खूप कमी पुनरावलोकने असल्यास किंवा एकसारखे वाटणारी सकारात्मक पुनरावलोकने असामान्यपणे जास्त असल्यास, हे बनावट ॲप असल्याची ही चेतावणी असू शकते.
- परवानग्यांचे विश्लेषण करा: मूलभूत गेम किंवा उपयुक्तता ॲपसाठी आवश्यक नसताना संपर्क, कॅमेरा किंवा मायक्रोफोनसाठी परवानग्या मागणारे ॲप, अशा ॲप्सचा हेतू वाईट असण्याची शक्यता असू शकते.
- स्क्रीनशॉट आणि वर्णन तपासा: खराब व्याकरण, शुद्धलेखनाच्या चुका आणि ॲप वर्णन किंवा स्क्रीनशॉटमधील निम्न गुणवत्तेच्या प्रतिमा बनावट ॲप ओळखण्यात मदत करू शकतात.
- अधिकृत स्रोत: शक्य तेव्हा अधिकृत वेबसाइट किंवा विश्वसनीय ॲप स्टोअरवरून ॲप्स डाउनलोड करा.
स्वतःला सुरक्षित ठेवण्याचे मार्ग
फसव्या ॲप्सपासून तुमचे डिव्हाइस आणि खाजगी डेटा संरक्षित करण्यासाठी या गोष्टी करा:
- तुमचे सॉफ्टवेअर अपडेट ठेवा: तुमच्या डिव्हाइसवरील ऑपरेटिंग सिस्टम आणि ॲप्स अपडेट केल्याची खात्री करा. फसव्या ॲपचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्रुटींपासून बचाव करण्यासाठी अपडेटमध्ये सुरक्षा पॅचचा वारंवार समावेश केला जातो.
- सुरक्षा सॉफ्टवेअर सेट करा: बनावट ॲप्स सारख्या वाईट हेतूचे सॉफ्टवेअर शोधण्यासाठी आणि त्यापासून मुक्त होण्यासाठी, विश्वसनीय अँटीव्हायरस आणि अँटी-मालवेअर सॉफ्टवेअर वापरा.
- टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA): सर्व खात्यांसाठी 2FA चालू करा. असे केल्याने, तुम्ही सुरक्षितता वाढवू शकता आणि हॅकर्सना तुमचा डेटा ॲक्सेस करणे कठीण बनवू शकता.
- लिंक आणि ॲटॅचमेंट्सबाबत सावधगिरी बाळगा: अनोळखी लिंकवर क्लिक करू नका किंवा अपरिचित स्त्रोतांकडून ॲटॅचमेंट उघडू नका.
- विनंत्या सत्यापित करा: संवेदनशील माहिती देण्यापूर्वी नेहमी माहिती सत्यापित करा.
- मोठा, युनिक पासवर्ड वापरा: वेगवेगळ्या खात्यांसाठी वेगवेगळे पासवर्ड वापरा आणि ते नियमितपणे बदला.
तुम्ही बनावट ॲप डाउनलोड केल्यास काय करावे
तुम्ही फसवे ॲप डाउनलोड केले असावे असे तुम्हाला वाटत असल्यास, लगेच कारवाई करा:
- ॲप त्वरित अनइंस्टॉल करा
- तुमच्या कोणत्याही खात्यांला धोका निर्माण झाला आहे असे तुम्हाला वाटत असल्यास तुमचे पासवर्ड बदला
- कोणत्याही संशयास्पद ॲक्टिव्हिटींसाठी तुमच्या बँक आणि ऑनलाइन खात्यांवर लक्ष ठेवा
- सुरक्षा सॉफ्टवेअर वापरून सुरक्षा स्कॅन चालवा
- ॲपची तक्रार करा
थोडक्यात फोनी ॲप्स तुमच्या डेटाला गंभीर धोका निर्माण करतात. तुम्ही जागरूक आणि सतर्क राहून अशा वाईट हेतूंच्या ॲप्सपासून स्वतःचा बचाव करू शकता. तुमची गोपनीयता आणि मनःशांती संरक्षित करण्यासाठी, नवीन ॲप्स डाउनलोड करताना नेहमी सावध रहा आणि तुमच्या डिजिटल सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या.
तुम्ही बनावट ॲपच्या स्कॅमचे बळी असाल तर तुम्ही काय करावे
PhonePe वर बनावट ॲप स्कॅमद्वारे तुमची फसवणूक झाल्यास, तुम्ही खालील प्रकारे समस्या ताबडतोब मांडू शकता:
- PhonePe ॲप: Help/मदत विभागात जा आणि “have an issue with the transaction”/”व्यवहारात समस्या आहे” पर्यायाखाली समस्या मांडा.
- PhonePe कस्टमर केअर नंबर: समस्या मांडण्यासाठी तुम्ही PhonePe कस्टमर केअरला 80–68727374 / 022–68727374 वर कॉल करू शकता, त्यानंतर कस्टमर केअर एजंट तिकीट वाढवेल आणि तुमच्या समस्येसाठी मदत करेल.
- वेबफॉर्म सबमिशन: तुम्ही PhonePe चे वेबफॉर्म वापरून तिकीट देखील वाढवू शकता, https://support.phonepe.com/
- सोशल मीडिया: तुम्ही PhonePe च्या सोशल मीडिया हँडलद्वारे फसव्या घटनांची तक्रार करू शकता
ट्विटर – https://twitter.com/PhonePeSupport
फेसबुक – https://www.facebook.com/OfficialPhonePe - तक्रार: सध्याच्या तक्रारीवर तक्रार नोंदवण्यासाठी, तुम्ही https://grievance.phonepe.com/ वर लॉगिन करू शकता आणि पूर्वी उठवलेला तिकीट आयडी शेअर करू शकता.
- सायबर सेल: शेवटी तुम्ही जवळच्या सायबर क्राइम सेलमध्ये फसवणुकीच्या तक्रारी नोंदवू शकता किंवा https://www.cybercrime.gov.in/ वर ऑनलाइन तक्रार नोंदवू शकता किंवा सायबर क्राइम सेलच्या हेल्पलाइनवर 1930 वर संपर्क साधू शकता.
महत्त्वाचा रिमांइंडर — PhonePe कधीही गोपनीय किंवा वैयक्तिक तपशील विचारत नाही. PhonePe कडून असल्याचा दावा करणाऱ्या व phonepe.com डोमेनच्या नसलेल्या सर्व मेल्सकडे दुर्लक्ष करा. तुम्हाला फसवणुकीचा संशय असल्यास, कृपया ताबडतोब अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.