PhonePe Blogs Main Featured Image

Trust & Safety

SMS स्पूफिंग किंवा तोतयागिरीचे संकेत जे तुम्ही लक्षात ठेवायला हवेत

PhonePe Regional|3 min read|25 July, 2023

URL copied to clipboard

आपण राहात असलेले सध्याचे जग सातत्याने बदलणारे आहे. आपल्या आयुष्याचा प्रत्येक पैलू आता डिजिटल झाला आहे. दैनंदिन किराणासामान आणि ताज्या खाद्यपदार्थांची डिलिव्हरी हे तर अगदी काही मिनिटांचे काम झाले आहे आणि इतर व्यवहार जसे पेमेंट करणे, बँकिंग हे काही क्लिकच्या अंतरावर आहेत. तथापि, ही डिजिटल सुविधा त्यासोबत काही जोखीम सुद्धा घेऊन येते ज्याच्याबाबत आपण सावध असणे गरजेचे आहे जेणेकरून आपण फसवणुकीचे बळी होणार नाही

फसवणूक करणारे साध्याभोळ्या लोकांची फसवणूक करून त्यांचे कष्टाचे पैसे लुबाडण्याचे नवनवीन मार्ग शोधत असतात. SMS स्पूफिंग किंवा तोतयागिरी हा सर्वात अलीकडे निदर्शनास आलेला फसवणुकीचा नमुना आहे ज्याद्वारे फसवणूक करणारा तुमच्या UPI खात्यावर ताबा मिळवू शकतो.

SMS स्पूफिंग किंवा तोतयागिरी काय आहे?

जेव्हा तुम्ही कोणत्याही UPI ॲपवर एक खाते तयार करता, तेव्हा ते SMS च्या मदतीने प्रमाणित केले जाते. प्रमाणीकरणानंतर, तुमच्या डिव्हाइसोबत UPI खाते लिंक केले जाते. यांस डिव्हाइसचे बाइंडिंग म्हणतात. फसवणूक करणारे यानंतर डिव्हाइस बाइंडिंग मेसेज फॉरवर्ड करण्यासाठी SMS फॉरवर्ड करणाऱ्या ॲप्सचा वापर करून त्यांच्या जाळ्यात अडकलेल्या लोकांचे UPI खाते ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात. ते हे अनेक मार्गांनी करतात — अलीकडे निरीक्षणास आलेली एक सामान्य पद्धत आहे — तुमच्या डिव्हाइसवर मालवेअर पाठवणे जी बाइंडिंग मेसेज व्हर्च्युअल मोबाइल नंबरवर फॉरवर्ड करते.

SMS स्पूफिंग किंवा तोतयागिरी फसवणूक कशी केली जाते

  1. फसवणूक करणारे लोकांना फसवण्यासाठी हॉस्पिटल, कुरिअर, रेस्टॉरंट इत्यादींच्या नावाने तयार केलेल्या WhatsApp खात्यांद्वारे फसव्या फाइल्स पाठवतात.
  2. फसलेल्या व्यक्तीने एकदा का करप्ट लिंकवर क्लिक केले की, मालवेअर त्यांच्या डिव्हाइसवर हार्डकोड केला जातो ज्यामुळे त्यांच्या बँकेच्या रजिस्टर्ड नंबरवर SMS फॉरवर्ड केले जातात, अशा फसवणुकीच्या प्रकरणात व्हर्च्युअल मोबाइल नंबर असतात.
  3. त्यानंतर फसवणूक करणारा UPI रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू करतो. फसवलेल्या व्यक्तीस डिव्हाइस बाइंडिंग SMS पाठविला जातो, जो रजिस्ट्रेशन सुरू करण्यासाठी एका फसव्या ॲप्लिकेशन द्वारे बँकेकडे पाठविला जातो.
  4. फसवणूक करणारा नंतर व्हर्च्युअल नंबरद्वारे UPI रजिस्ट्रेशन प्रमाणित करतो, फसवलेल्या पीडिताच्या UPI खात्याचे स्वतःच्या फोनवर बाइंडिंग करतो.
  5. व्यवहार करण्यासाठी, फसवणूक करणारा ‘MPIN’ काढण्यासाठी आणि अनधिकृत UPI व्यवहार करण्यासाठी सोशल इंजिनिअरिंग युक्त्या वापरतो.

म्हणूनच, तुमचे खाते आणि पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही कधीही कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करणार नाही याची खात्री करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

सुरक्षेचा विचार केल्यास, PhonePe ने तुम्हाला कव्हर केले आहे, कोणत्याही व्यवहारात बिघाड न होता दररोज करोडो व्यवहार सक्षम केले आहेत. तिहेरी-स्तर सुरक्षा समाविष्ट आहे:

  1. लॉगिन पासवर्ड: ॲपसाठी सुरक्षिततेचा पहिला स्तर म्हणजे लॉगिन पासवर्ड आहे.
  2. PhonePe ॲप लॉक: PhonePe ॲप वापरणे सुरू करण्यासाठी, तुम्हाला तुमचा फिंगरप्रिंट आयडी, फेस आयडी किंवा नंबर लॉक वापरून ते अनलॉक करावे लागेल.
  3. UPI पिन: PhonePe वरील प्रत्येक पेमेंटसाठी, मग ते 1 रुपयाचे असो किंवा 1 लाख रुपयाचे, UPI पिनशिवाय कोणतेही पेमेंट जाऊ शकत नाही.

PhonePe, अशाप्रकारे, सर्व पेमेंट सुरक्षित करण्यासाठी सर्व ती काळजी घेते.

SMS स्पूफिंग फसवणूक कशी टाळायची

  • संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका, त्यासोबत येणारे मालवेअर तुमच्या फोनवरील ॲप्सचा ताबा घेऊ शकतात.
  • PhonePe अधिकार्‍यांसह, क्रेडिट/डेबिट कार्ड नंबर, कार्ड एक्सपायरी डेट, CVV, OTP इत्यादी गोपनीय माहिती कधीही शेअर करू नका.
  • शेवटी, तक्रार करा आणि ब्लॉक करा. या नंबरचा रिपोर्ट करणे आणि ब्लॉक करणे उत्तम आहे.

फसवणूक करणाऱ्याने तुमच्या UPI खात्याचे रजिस्ट्रेशन सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास तुम्ही काय करावे

PhonePe ॲपवर एखाद्या स्कॅमरद्वारे तुमची फसवणूक झाल्यास, तुम्ही पुढील मार्गांनी त्वरित समस्या मांडू शकता:

  1. PhonePe ग्राहक साहाय्यता नंबर: समस्या मांडण्यासाठी तुम्ही PhonePe ग्राहक साहाय्यताकडे 80–68727374 / 022–68727374 वर कॉल करू शकता, त्यानंतर ग्राहक साहाय्यता एजंट तिकीट तयार करतील आणि तुमच्या समस्येसाठी तुम्हाला मदत करतील.
  2. वेबफॉर्म सबमिशन: तुम्ही PhonePe चे वेबफॉर्म, https://support.phonepe.com/ वापरून सुद्धा तिकीट तयार करू शकता आणि ““I have not initiated registration of UPI payments on PhonePe (मी PhonePe वर UPI पेमेंटचे रजिस्ट्रेशन सुरू केले नाही” हा पर्याय निवडा.
  3. सोशल मीडिया: तुम्ही PhonePe च्या सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून फसव्या घटनांची तक्रार करू शकता
  4. तक्रार: विद्यमान तक्रारीवर तक्रार नोंदवण्यासाठी, तुम्ही https://grievance.phonepe.com/ वर लॉगिन करू शकता आणि पूर्वी दाखल केलेला तिकीट आयडी शेअर करू शकता.
  5. सायबर सेल: शेवटी, तुम्ही जवळच्या सायबर क्राइम सेलमध्ये फसवणुकीच्या तक्रारी नोंदवू शकता किंवा https://www.cybercrime.gov.in/ वर ऑनलाइन तक्रार नोंदवू शकता किंवा सायबर क्राइम सेलच्या हेल्पलाइनवर 1930 वर संपर्क साधू शकता.

महत्त्वाचा रिमाइंडर — PhonePe कधीही गोपनीय किंवा वैयक्तिक तपशील विचारत नाही. PhonePe कडून असल्याचा दावा करणाऱ्या सर्व मेल्सकडे दुर्लक्ष करा जर त्या phonepe.com डोमेनच्या नसतील. तुम्हाला फसवणुकीचा संशय आल्यास, कृपया ताबडतोब अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.

Keep Reading