Trust & Safety
ऑनलाइन खरेदीत मर्चंट कडून फसवणूकी पासून स्वतःस वाचवा!
PhonePe Regional|2 min read|29 August, 2019
फसवणूक करणारे सतत पैसे मिळविण्याचे नवनवीन मार्ग शोधत असतात. ऑनलाइन शॉपींग करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस होणाऱ्या वाढीसोबत या क्षेत्रात मर्चंट कडून होणाऱ्या फसवणूकीची संख्या सुद्धा वाढते आहे. या ब्लॉग मधे आपण मर्चंट फसवणूकीबाबत आणि त्यापासून सुरक्षित राहण्याबाबत बोलणार आहोत.
आपण सर्वांनी अशा अनेक घटनांबाबत वाचले किंवा ऐकले असेल ज्यात ग्राहकाने ऑनलाइन ऑर्डर केली किंवा पैशाने पेमेंट केले पण ती वस्तू त्यांना कधीही मिळाली नाही. मर्चंट फसवणूकीचे हे एक उदाहरण आहे! फसवणूक करणारे तुमचा पैसा लुटण्यासाठी कोणत्याही मर्यादेपर्यंत जाऊ शकतात. एक मर्चंट/विक्रेता ऑर्डर करण्यासाठी त्याच्याकडे असलेल्या मालाची माहिती देणारी एक खोटी वेबसाइट तयार करतो. कंपनीचा पत्ता, संपर्क नंबर, ऑर्डर रद्द करण्यासाठीची धोरणे, आणि व्यवहार करण्यासाठीचे पेमेंट गेटवे(मार्ग) सर्वकाही बनावट असते.
आता, मर्चंट ला त्याच्या ग्राहकांकडून पेमेंट स्विकारणे सुरु करण्यासाठी एका पेमेंट गेटवे सोबत जोडले जाण्याची आवश्यकता असते. पेमेंट गेटवे किंवा पेमेंट प्रक्रियित करणाऱ्यांनी, व्यापारींना पेमेंट सेवा प्रदान करण्याआधी त्यांची पार्श्वभूमी खोलवर तपासणे अपेक्षित आहे.
प्रक्रियेत पकडले जाणे टाळण्यासाठी व्यापारी NEFT च्या माध्यमातून पैशांचे ट्रान्सफर करण्यासाठी एक वैयक्तिक बँक खाते सेट करतो किंवा मर्चंट QR कोड च्या ऐवजी वैयक्तिक QR कोड वापरतो. अशाप्रकारे व्यापारी एका कायदेशीर पेमेंट गेटवे ची नक्कल करतो. आणि यानंतर त्यास फक्त त्याच्या व्यवसायाचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचार करायचे, आणि ग्राहकांद्वारे व्यवहार केली जायची वाट पाहायचे काम बाकी असते.
टीप: PhonePe वर केवळ नोंदणी केलेले आणि सक्रिय मोबाइल नंबर असलेलेच मर्चंट ऑन-बोर्ड वर असतात. मर्चंट ला कठोर सत्यापन प्रक्रिया, KYC दस्ताऐवज तपासणी आणि अनेक सरप्राइज स्टोर भेटी यातून जावे लागते. केवळ त्यानंतरच तुम्ही PhonePe च्या माध्यमातून पेमेंट स्विकारण्यास सुरुवात करु शकता. अशाप्रकारे PhonePe द्वारे पेमेंट करतांना तुम्ही निश्चिंत असू शकता.
मर्चंट फसवणूकीच्या बहुतेक मामल्यात, ग्राहकांना पेमेंट केले गेल्यावर किंवा उत्पादन वितरणाच्या तारखेचे उलंघन होते तेव्हा काहीतरी चुकीचे घडल्याचे आढळून येते. ते सामान्यतः वेबसाइटच्या ग्राहक साहाय्यता टीम सोबत संपर्क करतात आणि त्यांना समजते की फसव्या व्यापारीने त्यांचा पैसा लुबडला आहे.
तुम्ही अशाप्रकारे होणारी फसवणूक रोखू शकता. यासाठी तुम्हाला पुढील गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्या लागतील.
-सर्व शॉपींग वेबसाइटवर विश्वास ठेऊ नका. वेबसाइटवरुन कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांच्या प्रतिक्रिया, परीक्षणे आणि वेबसाइटचे सोशल मीडिया पृष्ठ (उपलब्ध असल्यास) तपासा.
– फक्त विश्वसनीय शॉपींग वेबसाइट आणि प्लॅटफॉर्मवरुनच खरेदी करा.
-फसव्या वेबसाइटचा रिपोर्ट Google वर द्या
-तुमचे पैसे परत मिळविण्यासाठी तुम्ही फसव्या वेबसाइटवर पेमेंट करण्यासाठी वापर केलेल्या डेबिट/क्रेडिट कार्ड, बँक खाते (BHIM UPI) वर चार्जबॅक दाखल (पैसे परत मागण्याची प्रक्रिया) करा.