PhonePe Blogs Main Featured Image

Trust & Safety

Twitter वर फसवणूक होण्यापासून स्वतःचा बचाव करा — बनावट हेल्पलाइन नंबर पासून सावध राहा!

PhonePe Regional|2 min read|19 April, 2021

URL copied to clipboard

Twitter सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून ग्राहकांशी जोडले जाण्याचा आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. तुम्हाला तात्काळ प्रतिसाद मिळतो आणि युजर यावर टाकलेल्या माहितीवर विश्वास ठेवतात

बनावट Twitter खात्यांच्या माध्यमातून फसवणूक च्या मामल्यात अलीकडे वाढ झाली आहे.

फसवणूक करणारे लोक Twitter वर कशाप्रकारे फसवतात ते पुढे पाहा:

– PhonePe ग्राहक मूळ हँडल: https://twitter.com/PhonePe चा वापर करतात आणि ऑफर वटवणे, कॅशबॅकचा लाभ घेणे, पैसे ट्रान्सफर, रिफंड जारी करणे, PhonePe वर त्यांचे बँक खाते लिंक करणे इत्यादीशी संबंधित मामल्यांविषयी ट्विट करतात.

– फसवणूक करणारे काय पोस्ट केले जाते आहे त्याचा माग ठेवतात आणि ताबडतोब प्रतिसाद देतात. बनावट ग्राहक सेवा नंबर देणारे ट्विट करणे आणि त्यांना PhonePe हेल्पलाइन नंबर म्हणून सांगणे हा युजरच्या खात्यातून पैसे चोरण्याचा सर्वात लोकप्रिय मार्ग आहे.

– याबाबतीत अजाण असलेले ग्राहक, या फसव्या लोकांनी दिलेल्या बनावट हेल्पलाइन नंबर वर कॉल करतात आणि न मिळालेला कॅशबॅक किंवा अयशस्वी झालेल्या व्यवहारासाठी रिफंड ची विनंती करतात.

– या मामल्याचे निवारण करण्यासाठी, फसवणूक करणारे ग्राहकांना संवेदनशील माहिती जसे की कार्ड चे तपशील आणि ग्राहकांना त्यांच्या फोनवर प्राप्त झालेल्या OTP चे तपशील शेअर करण्यास सांगतात.

– ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी, या फसव्या व्यक्ती ग्राहकांच्या फोनवर त्यांच्या नंबर वरून कलेक्ट कॉल सुद्धा जारी करू शकतात आणि त्यांना कॅशबॅकची खात्रीपण देतात.

– ग्राहकांनी त्यांच्या कार्ड चे तपशील, OTP शेअर केल्यावर किंवा कलेक्ट कॉल स्वीकारल्यावर, लगेच पैसे ग्राहकाच्या खात्यातून फसविणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात जातात.

महत्त्वाचा रिमाइंडर — PhonePe कधीच गोपनीय किंवा वैयक्तिक तपशीलांसाठी विचारत नाही. तुम्हाला PhonePe चे प्रतिनिधी असल्याचे सांगून कोणाकडूनही अशा तपशीलांसाठी विचारणा झाल्यास, कृपया त्यांना तुम्हाला एक ई-मेल पाठवण्यास सांगा. तसेच फक्त @phonepe.com डोमेन पासून आलेल्या ई-मेल वर प्रतिसाद द्या.

तुम्ही कसे सुरक्षित राहू शकता यासाठी पुढील माहिती पाहा:

विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फक्त आमच्या अधिकृत खात्यांच्या माध्यमातून आमच्याशी संपर्क करा.

Twitter handles: https://twitter.com/PhonePe

https://twitter.com/PhonePeSupport

Facebook खाते: https://www.facebook.com/OfficialPhonePe/

वेबसाइट: support.phonepe.com

तुमच्या कार्ड किंवा खात्याच्या तपशीलांशी तडजोड झाल्यास, पुढील चरणांचा अवलंब करा:

  1. [email protected] वर रिपोर्ट करा.
  2. तुमच्या जवळच्या सायबर-सेल सोबत संपर्क करा आणि पोलिसात तक्रार करा.

Keep Reading