PhonePe Blogs Main Featured Image

Trust & Safety

SIM स्वॅप फसवणूक पासून सावधान

PhonePe Regional|2 min read|29 August, 2019

URL copied to clipboard

अज्ञात फोन क्रमांकावरून तुमच्या बँकेचे प्रतिनिधी असल्याचा दावा करणारे फोन कॉल. तुम्हाला नुकताच प्राप्त झालेला OTP सामायिक करण्याबद्दल विचारणारा SMS संदेश. यामाध्यमातून फसवणूक करणारे ठग सतत तुमच्या पैशांवर प्रवेश मिळविण्याचा मार्ग शोधत असतात. फसवणूक करणाऱ्यांद्वारे वापरणाऱ्या जाणाऱ्या वेगवेगळ्या मार्गांविषयी माहिती करुन, सावधगिरी बाळगल्यास तुम्ही त्यांच्या द्वारे केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची चिन्हें ओळखू शकता आणि त्यांच्या जाळ्यात अडकणे टाळू शकता.

आम्ही फसवणूक आणि ग्राहक सुरक्षेवरील आमच्या माहितीपर लेखांची मालिका देऊन विविध प्रकारच्या स्कॅम संबंधित माहितीवर प्रकाश पाडत आहोत.

SIM स्वॅप फसवणूक काय आहे?

SIM स्वॅप स्कॅम मध्ये, फसवणूक करणारे तुमचे वैयक्तिक तपशील वापरुन तुमच्या फोन नंबरसाठी नवीन SIM मिळवितात. हे केल्यावर, ते तुमच्या बँक खात्याकडून पेमेंट प्रमाणित करण्यासाठी आवश्यक असलेल्या OTP वर सुद्धा प्रवेश मिळवितात.

याचा सरळसरळ असा अर्थ होतो की फसवणूक करणारे तुमचा OTP वापरुन तुमच्या बँक खात्यातून पैसे चोरण्यास सक्षम होतात .

महत्वाचा रिमाइंडर — PhonePe कधीही गोपनीय किंवा वैयक्तीक तपशील विचारत नाही. PhonePe कडून आल्याचा दावा करणाऱ्या अशा सर्व ई-मेल कडे दुर्लक्ष करा जर त्या phonepe.com डोमेन वरुन आल्या नसतील. तुम्हाला फसवणूकीचा संशय आल्यास, कृपया तत्काळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.

SIM स्वॅप फसवणूक कशी केली जाते?

  1. फसवणूक करणारे तुम्हाला फोन करुन ते तुमच्या मोबाइल ऑपरेटर चे प्रतिनिधी असल्याचा दावा करतात, आणि तुमचे नेटवर्क अपग्रेड करण्यासाठी एक SMS फॉर्वड करण्यास सांगतात. या SMS मध्ये एका नवीन SIM च्या मागचा 20 अंकी नंबर असतो. तसेच ते तुम्हाला तुमचे गोपनीय असलेले बँकेचे तपशील विचारतात
  2. हे SMS तुमच्या वर्तमान SIM ला निष्क्रिय करते आणि एक नकली SIM सक्रिय करते ज्यास फसवणूक करणाऱ्यांनी अवैधरित्या प्राप्त केले असते. तुमचे SIM काम करणे बंद करते आणि सर्व कनेक्टिव्हिटी गमावते.
  3. फसवणूक करणाऱ्यांना तुमचा फोन नंबर आणि SMS मध्ये प्रवेश प्राप्त होतो आणि ते पैसे ट्रान्सफर करण्यासाठी तुमचे बँक तपशील वापरतात.
  4. फसवणुकदारांना पैसे ट्रान्सफर करण्यासाठी एक OTP प्राप्त होतो, आणि ते त्यास आता वाचू शकतात आणि तुमच्या खात्यातील पैसे त्यांच्या स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करु शकतात.

जर तुमच्या फोन ची कनेक्टिव्हिटी कोणत्याही कारणाशिवाय जास्त कालावधीसाठी जात असेल, तर ते काहीतरी गडबड असल्याचे चिन्ह असू शकते. असे झाल्यास कृपया आपल्या मोबाईल ऑपरेटरशी संपर्क साधा.

अशा प्रकारच्या फसवणूकीपासून तुम्ही सुरक्षित कसे राहू शकता यासाठी पुढीलप्रकारे उपाय दिले आहेत:

  • कोणाशीही तुमच्या बँक खात्याचे तपशील (कार्ड नंबर, कालबाह्यता तारीख, पिन) शेअर करू नका.
  • तुम्हाला तुमची बँक किंवा मोबाइल ऑपरेटर कडून असल्याचा दावा करणाऱ्या ई-मेल किंवा SMS प्राप्त झाल्यास, अधिकृत SMS हँडल / ई-मेल पत्त्यावरून ते पाठविले गेले असल्याचे सत्यापित करा.
  • SMS द्वारे किंवा इतर चॅनेल द्वारे प्राप्त होत असलेले OTP किंवा इतर कोणतेही कोड कधीही कोणासोबत शेअर करू नका.
  • तुमच्या खात्यातून केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी ई-मेल आणि SMS अलर्ट साठी सबस्क्राइब करा.
  • तुमच्या बँक व्यवहारांचा इतिहास नियमितपणे तपासा आणि कोणत्याही अनियमिततेसाठी निरीक्षण करा.

आमच्या पुढील लेखासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा!

Watch a video on transacting safely:https://youtu.be/I2GNsUAS0GY

Keep Reading