PhonePe Blogs Main Featured Image

Trust & Safety

चुकीचे पैशांचे ट्रान्सफर किंवा प्रलंबित स्थितीतील UPI पेमेंट कसे रिव्हर्स करावे

PhonePe Regional|3 min read|13 June, 2023

URL copied to clipboard

तुम्ही चुकून एखाद्या दुसऱ्याच व्यक्तीला पैसे ट्रान्सफर केले आहेत किंवा तुमचे पेमेंट प्रलंबित स्थितीत दिसत आहेत, अशा वेळी ते पेमेंट रिव्हर्स कसे करायचे याचा कधी विचार केला आहे का? चुकून दुसऱ्याच व्यक्तीला पैसे ट्रान्सफर करणे हे कुणाच्याही हातून होऊ शकतं. तुम्ही फोन नंबरचे आकडे चुकीचे टाकले असतील, चुकीचा UPI आयडी लिहिला असेल किंवा पैसे ट्रान्सफर करण्यासाठी चुकून दुसऱ्याच व्यक्तीच्या चॅटवर क्लिक केलं असे कधी कधी होऊ शकते पण पैसे गेल्यानंतरच आपण चुकीच्या व्यक्तीला पैसे ट्रान्सफर केले आहे हे लक्षात येतं! अशा प्रकरणांमध्ये किंवा तुमचे पेमेंट प्रलंबित स्थितीत असेल, तर काय करायचे याबाबतची माहिती या ब्लॉगमध्ये दिली आहे.

चुकीचे पैसे ट्रान्सफर करणे म्हणजे काय?

जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीला पैसे पाठवायचे असतात आणि तुम्ही चुकून दुसऱ्याच व्यक्तीला पैसे ट्रान्सफर करता तेव्हा त्याला अयोग्य किंवा चुकीचे पैसे ट्रान्सफर करणे असे म्हणतात.

जेव्हा असे चुकीचे पैसे ट्रान्सफर होतात तेव्हा काय करावे

UPI थेट प्राप्तकर्त्याच्या खात्यात पैसे जमा करत असल्याने पैसे रिव्हर्स ट्रान्सफर करणे थोडे कठीण असते. बँक आम्हाला UPI पेमेंट रद्द करण्याची किंवा रिव्हर्स करण्याची परवानगी देत नाही. पैसे रिव्हर्स करण्यासाठी प्राप्तकर्त्याने बँकेला फंड ट्रान्सफर करण्याची संमती देणे अनिवार्य आहे.

प्राप्तकर्ता जर कुटुंबातील सदस्य किंवा मित्र-मैत्रिणींपैकी कुणी असेल, तर पैसे परत मिळवणं सोपं असतं. तरीही तुम्ही चुकीने पैसे ट्रान्सफर केले असतील किंवा पपैसे परत मिळवू शकत नसाल, तर तुम्ही या गोष्टी करायला हव्यात:

  1. तुमच्या बँकेशी थेट संपर्क साधा आणि पेमेंटच्या युनिक ट्रॅन्झॅक्शन रेफरन्स (UTR) नंबरसह चुकीची क्रेडिट चार्जबॅक ची विनंती करा.
  2. तुम्ही ज्या व्यक्तीला तुमच्या बँकेत खाते ठेवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने पैसे ट्रान्सफर केले असतील, तर तुमची बँक तुमच्या वतीने त्यांच्याशी थेट संपर्क साधू शकते आणि तुमचे पैसे रिव्हर्स करण्याची विनंती करू शकते.
  3. जर तुम्ही चुकीने पैसे ट्रान्सफर केलेल्या व्यक्तीचे दुसऱ्या बँकेत खाते असेल, तर तुमची बँक केवळ सुविधा देणारी संस्था म्हणून कृती करू शकते आणि त्या बँकेचे तपशील तुम्हाला देऊ शकते. तुम्हाला अन्य मदतीसाठी त्या शाखेला भेट देऊन तेथील मॅनेजरशी बोलावे लागेल.
  4. प्राप्तकर्त्याची सहमती असेल तरच पैसे रिव्हर्स करता येतात. त्यांनी संमती दिली तर 7 दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात.
  5. प्राप्तकर्ता जर तुमच्या विनंतीला प्रतिसाद देऊ शकला नाही किंवा बँकेला तुमची रक्कम जमा करता आली नाही, तर तुम्ही NPCI पोर्टलवर (https://npci.org.in/) तक्रार नोंदवू शकता.
  6. ही पक्रिया फॉलो केल्यानंतर 30 दिवसांमध्ये तुमच्या तक्रारीचे निराकरण झाले नाही, तर तुम्ही बँकेच्या लोकपालांशी संपर्क साधून हे प्रकरण त्यांच्यापर्यंत नेऊ शकता.

प्रलंबित व्यवहार म्हणजे काय?

प्रलंबित व्यवहार म्हणजे साधारणपणे पैसे वजा झाल्यावर प्रलंबित स्थितीत जाणारे पेमेंट होय. हे एकापेक्षा जास्त प्रकारे घडू शकते. — तुम्ही पेमेंट करता आणि तुमच्याकडून व्यवहार पूर्ण होतो परंतु प्राप्तकर्त्याला पैसे मिळत नाहीत, पेमेंट प्रलंबित स्थितीत राहते किंवा तुमचा व्यवहार रद्द होतो परंतु तुम्हाला वजा झालेले पैसे परत मिळत नाहीत.

तुमचे पेमेंट प्रलंबित स्थितीत असेल तर काय करावे

  1. कृपया धीर धरा. या प्रकरणात, तुमचे पैसे सुखरूप आणि सुरक्षित आहेत आणि तुम्हाला पैसे लवकरच परत मिळतील.
  2. PhonePe ॲपवर समस्येची तक्रार करा म्हणजे आम्ही याबाबतच्या प्रगतीचा माग घेऊ शकतो.
  3. तुमच्या बँकेने पेमेंटची अंतिम स्थिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला 48 तास वाट पाहावी लागेल. तुमच्याकडून पेमेंट यशस्वी झाल्यास, रक्कम प्राप्तकर्त्याच्या खात्यात जमा केली जाईल.
  4. पेमेंट झाले नाही, तर पेमेंट तारखेपासून 3–5 व्यावसायिक दिवसांच्या आत रक्कम तुमच्या खात्यात परत केली जाईल.
  5. तक्रार लवकरात लवकर सोडवण्यात यावी यासाठी तुम्ही नेहमीच तुमच्या बँकेशी संपर्क साधू शकता आणि व्यवहाराच्या UTR नंबरचा हवाला देऊन तक्रार करू शकता.
  6. निर्धारित वेळ पूर्ण झाल्यानंतर तुम्ही नेहमी ही बाब PhonePe ॲपवर वाढवू शकता. जेणेकरून आम्ही समस्येचे निराकरण करण्यात आणि व्यवहारावर योग्य कारवाई करण्यास मदत करू शकू.

महत्त्वाची सूचना: PhonePe कधीही गोपनीय किंवा वैयक्तिक तपशील विचारत नाही. phonepe.com डोमेनचे ई-मेल नसतील तर PhonePe कडून असल्याचा दावा करणाऱ्या सर्व मेल्सकडे दुर्लक्ष करा. तुम्हाला फसवणुकीचा संशय असल्यास कृपया तुमच्या बँकेशी त्वरित संपर्क साधा.

खरे ग्राहक प्रतिनिधी तुम्हाला तुमचे संपूर्ण क्रेडिट/डेबिट कार्ड तपशील किंवा OTP शेअर करण्यास सांगणार नाही. ते तुमच्याशी फक्त अधिकृत लँडलाइन नंबरवरून संपर्क साधतील, मोबाईल नंबरवरून नाही. तुमच्‍या बँकेच्‍या अधिकृत डोमेनवरून जर ई-मेल आले नसतील तर त्या ई-मेलकडे दुर्लक्ष केले पाहिजे. सोशल इंजिनिअरिंग फसवणुकी पासून सावध रहा.

एखादी समस्या मांडण्यासाठी, तुमच्या PhonePe ॲपवर लॉगिन करा आणि ‘मदत’ वर जा. तुम्ही ‘खाते सुरक्षा समस्या/फसवणुकीच्या ॲक्टिव्हिटींची तक्रार करा’ अंतर्गत फसवणुकीच्या घटनेची तक्रार करू शकता. याबरोबरच तुम्ही support.phonepe.com वर लॉगिन करू शकता किंवा Twitter द्वारे संपर्कात राहू शकता.

Keep Reading