PhonePe Blogs Main Featured Image

Trust & Safety

लोन घोटाळा कसा ओळखायचा आणि त्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा

PhonePe Regional|3 min read|25 July, 2022

URL copied to clipboard

आजच्या जगात सगळ्यांनाच त्यांच्या तत्काळ गरजा भागवण्यासाठी कर्जाची गरज भासते तर काहींना तत्काळ पैसे प्राप्त करून त्याची परतफेड नंतर करता येणे ही सोय उपलब्ध असणे खूप साहाय्यक वाटते, विशेषकरून काही आणीबाणीच्या परिस्थितींमध्ये जसे नौकरी जाणे किंवा वैद्यकीय आणीबाणीच्या स्थितीमध्ये तुम्हाला तत्काळ पैशांची गरज पडू शकते. फसवणूक करणारे लोक गरजू लोकांच्या अशा गरजांचे भांडवल करतात आणि अशा परिस्थितीत कथित विश्वासार्ह कर्ज देण्याच्या बहाण्याने त्यांचे पैसे लुटतात. यालाच लोन घोटाळा असे म्हणतात.

लोन घोटाळा काय आहे?

लोन घोटाळ्यात, फसवणूक करणारे व्यक्तीस कर्ज लवकर आणि सहजपणे मिळवून देण्याची खोटी आशा दाखवतात. ते व्यक्तीच्या गरजेनुसार एक फसवा प्लॅन बनवतात. उदाहरणार्थ, जर एका स्थापित बँकेत कर्ज मिळवण्यासाठी, अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोर तेवढा चांगला नसेल किंवा खूप कमी वेळेत व्यक्तीला मोठ्या रकमेची गरज असल्यास, फसवणूक करणारे ते कसे काही मिनिटांमध्ये व्यक्तीला त्याच्या गरजेनुसार कर्ज मिळवून देऊ शकतात हे खूप हुशारीने पटवून देतात.

लोन घोटाळ्यास भरीस पडल्यास त्याचे दोन प्रमुख परिणाम होतात — एकतर फसवणूक करणारा सिक्युरिटी म्हणून काही आगाऊ रक्कम मागू शकतो, जी कधीही परत केली जात नाही किंवा प्रोसेसिंग फी, लेट फी, व्याज, आणि अशा इतर बऱ्याच खर्चाच्या बहाण्याने तुमच्याकडून एकूण रक्कम काढू शकतो. अशाप्रकारे शेवटी व्यक्तीचे मोठे आर्थिक नुकसान होते.

लोन घोटाळा कसा केला जातो?

लोन घोटाळेबाज कर्जाच्या पूर्ण न झालेल्या गरजेचा फायदा घेतात आणि भोळ्या कर्जदारांना कथितपणे कोणत्याही अटींशिवाय कर्ज ऑफर करून लक्ष्य करतात. ते तुमच्याशी अनेकदा SMS, ई-मेल किंवा फोनद्वारे संपर्क साधतात आणि तुम्हाला ॲप डाउनलोड करण्यास सांगून तुमचे तपशील भरून झटपट कर्ज मंजूरी मिळवण्यास सांगतात.

ॲप डाउनलोड केल्यावर, ते तुमच्या फोनवरील प्रत्येक गोष्टीत प्रवेश मिळवण्याची विनंती करतात — तुमची संपूर्ण संपर्क सूची, फोटो आणि व्हिडिओ इत्यादी. तुम्ही तुमचा आधार, पॅन, पत्ता आणि तुम्हाला आवश्यक असलेली रक्कम यासारखे मूलभूत तपशील भरल्यानंतर लवकरच तुम्हाला तुमच्या खात्यात रोख रक्कम जमा झालेली दिसेल.

ही कर्जे जटिल अटी आणि शर्तींनुसार दिली जातात ज्यांची सुरुवातीच्या टप्प्यात माहिती दिली जात नाही. कमी व्याजदराचे आश्वासन देऊन ते व्यक्तींना फसवतात आणि नंतर दावा करतात की कमी व्याजदर केवळ मर्यादित कालावधीसाठी होता, त्यानंतर व्याज कमालीच्या उच्च दरापर्यंत वाढवले जाते — ज्याचे तपशील ते कर्जाच्या वितरणाच्या वेळी देत नाहीत सोबतच उच्च व्याजदरांसोबतच, फसव्या झटपट कर्ज कंपन्या कर्जाची परतफेड न केल्याबद्दल दररोज मोठ्या प्रमाणावर दंड आकारतात. त्यामध्ये उच्च प्रक्रिया शुल्क आणि इतर दंड जोडले जातात.

काही फसवणूक करणारे भामटे काही कागदपत्रे जसे की — 3 महिन्यांचे बँक स्टेटमेंट, आधार कार्ड आणि PAN इत्यादींची प्रत मागतात, तर काही अशी कोणतीही कागदपत्रे मागत नाहीत. तथापि, दोन्ही प्रकरणांमध्ये, कर्जाची रक्कम काही मिनिटांत वितरित केली जाते. अ‍ॅप्स, कर्ज देण्याच्या बहाण्याने, पीडिताच्या फोनवरून सर्व माहिती मिळवतात ज्याचा वापर फसवणूक करणारे व्यक्तीला अधिक पैसे लुटण्यासाठी किंवा इतर आर्थिक गुन्हे करण्यासाठी करू शकतात.

कर्जाच्या रकमेची परतफेड करण्यासाठी अशा लोन घोटाळ्यात बळी पडलेल्या आणि देऊ केलेले पैसे स्वीकारणाऱ्यांना वसुली एजंटांकडून त्रास दिला जातो आणि गैरवर्तन केले जाते. अश्लील संदेश, अश्लील चित्रे आणि अपमानास्पद मजकूर व्यक्ती तसेच त्याच्या/तिच्या संपर्क यादीतील इतरांना पाठवले जातात.

लोन घोटाळा टाळण्यासाठी लक्षात ठेवायचे धोक्याचे संकेत

पुढे काही धोक्याचे संकेत दिले आहेत जे तुम्हाला लागलीच सांगतील की तुमच्याशी संपर्क साधणारा व्यक्ती एक लोन घोटाळेबाज आहे :

  • कर्जदात्याची संस्था रिझर्व बँक ऑफ इंडिया सोबत नोंदणीकृत नाही आणि कोणत्याही ज्ञात बँक किंवा NBFC सोबत निगडित नाही.
  • ॲपस्टोरवर लोन ॲप सत्यापित नाही, कर्जाच्या नियम व अटींचे तपशील उघड करत नाही, कर्ज मंजूर करण्याआधी तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासत नाही
  • कर्जदाता नोंदणीकृत नाही, त्यांचा वास्तविक ऑफिसचा पत्ता नाही किंवा कायदेशीर वेबसाइट नाही
  • कर्जाचे वितरण करण्याआधी आगाऊ स्वरूपात कर्जाच्या शुल्काची मागणी केली आहे
  • कोणतेही क्रेडिट सत्यापन केले गेले नाही आणि असे सांगितले जाते की कर्ज क्रेडिट मुक्त आहे
  • कर्जदाता खूप कमी व्याज दरावर कर्ज देऊ करेल आणि ते फक्त मर्यादित कालावधीसाठी वैध आहे

लोन घोटाळ्यापासून कसा बचाव करायचा:

  • कधीच कोणाला तुमचे कार्डचे तपशील फोन, ई-मेल किंवा इतर माध्यमातून शेयर करू नका.
  • कर्जदात्याची विश्वासार्हता जाणून घेण्यासाठी नेहमी त्यांचा वास्तविक पत्ता आणि वेबसाइटचे मूल्यंकन करा.
  • तुमचा OTP किंवा इतर कोणतीही वैयक्तिक माहिती कोणाहीसोबत शेयर करू नका.
  • कर्जाची ऑफर समजून घ्या कारण घोटाळे करणारे नेहमीच काहीतरी संशयास्पद लाभ देण्याची लालूच देतात.

महत्त्वाची सूचना — PhonePe द्वारा कधीच गोपनीय किंवा वैयक्तिक तपशील विचारले जात नाही. phonepe.com डोमेन वरून नसलेल्या आणि PhonePe कडून असल्याचा दावा करणाऱ्या सर्व ई-मेलकडे दुर्लक्ष करा. तुम्हाला फसवणुकीचा संशय आल्यास, कृपया आमच्याशी support.phonepe.com वर संपर्क साधा किंवा https://cybercrime.gov.in/ वर पोलिसांकडे तक्रार दाखल करा

Keep Reading