
Trust & Safety
मनी म्युल बनू नका: या आर्थिक घोटाळ्यापासून बचाव करण्यासाठी सुरक्षा गाइड
PhonePe Regional|4 min read|01 March, 2025
जर कोणी तुम्हाला आठवड्याला फक्त ₹500 देण्याचे आश्वासन दिले आणि काम इतकेच असले की, तुम्ही तुमच्या बँक खात्यात पैसे स्वीकारायचे आणि पुढे पाठवायचे? ऐकायला हे खूप चांगले वाटत आहे ना? पण हीच एक मोठी आर्थिक फसवणूक आहे आणि सामान्य लोकांना लक्ष्य करणाऱ्या घोटाळ्यांपैकी एक आहे.
फसवणूक करणारे म्युल खाते वापरून बेकायदेशीर व्यवहार करतात किंवा आर्थिक अफरातफरी करतात, जेणेकरून खरे अपराधी स्वतः या व्यवहारात थेट सामील असणार नाहीत. या ब्लॉगमध्ये आपण म्युल खाते म्हणजे काय, ते कसे काम करते आणि ते लोक आणि कंपन्यांसाठी का धोकादायक आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
मनी म्युल म्हणजे काय?
मनी म्युल म्हणजे असे लोक जे एखाद्या घोटाळ्याचा किंवा बेकायदेशीर कृतीचा भाग म्हणून एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे हस्तांतरित करतात. मनी म्युलला त्याच्या खात्यावर पैसे प्राप्त होतात आणि नंतर ते पुढील खात्यात ट्रान्सफर करावे लागतात, बहुतेक वेळा काही मोबदल्यासाठी किंवा खोट्या आश्वासनासाठी असे सामान्यतः केले जाते. काही लोक जाणूनबुजून या प्रकारात सहभागी होतात, तर बरेच जण फसवले जातात आणि त्यांना कळतही नाही की ते गुन्ह्यात सामील आहेत.
कल्पना करा: तुम्हाला फायनान्स असिस्टंट पदासाठी एक खरी वाटणारी नोकरीची ऑफर मिळते. काम सोपे वाटते – एका कंपनीला आंतरराष्ट्रीय पेमेंट्स प्रक्रिया करण्यास मदत करायची. पण तुम्हाला याची कल्पनाही नसते की, तुम्ही मनी म्युल बनले आहात आणि एका मोठ्या मनी लॉन्डरिंग ऑपरेशनचा भाग बनला आहात.
म्युल अकाउंट्स सहसा मनी लॉन्डरिंग योजनांमध्ये वापरली जातात, जिथे चोरलेले पैसे अनेक खात्यांमधून फिरवले जातात, जेणेकरून त्यांच्या मूळ स्रोताचा माग काढणे कठीण होईल. यामुळे कायद्याच्या यंत्रणांना गुन्हेगारी व्यवहार शोधणे अवघड होते. ही खाती फिशिंग स्कीम, लॉटरी फसवणूक आणि गुंतवणूक फसवणुकीसाठी देखील वापरली जाऊ शकतात, जिथे लोकांना फसवून त्यांच्याकडून या खात्यांमध्ये पैसे पाठवायला लावले जाते.
फसवणूक करणारे त्यांचे नेटवर्क कसे तयार करतात?
मनी म्युल नेटवर्क्स म्हणजे अशा यंत्रणा असतात जिथे गुन्हेगार सावधपणे व्यवहारांचे नियोजन करतात, बळी आणि म्युल्स यांच्यात पैसे फिरवत राहतात आणि स्वतःची ओळख गुप्त ठेवतात. या संपूर्ण फसवणुकीच्या जाळ्याच्या केंद्रस्थानी असतात “म्युल कंट्रोलर्स” किंवा “भरती करणारे”, जे या गुंतागुंतीच्या फसवणुकीचे समन्वयक असतात.
म्युल कंट्रोलर्स कसे काम करतात?
- भरती प्रक्रिया: हे ठग थेट संपर्क साधून किंवा “झटपट पैसे कमवा”सारख्या जाहिरातींद्वारे किंवा बनावट नोकरीच्या संधींद्वारे, किंवा सोशल मीडियाचा वापर करून संभाव्य म्युल्स शोधतात. यापैकी बहुतांश संधी प्रथमदर्शी खऱ्या आणि आकर्षक वाटतात, पण त्यांचा खरा उद्देश व्यक्तींना फसवून मनी म्युल बनवणे असतो.
- पैसे गोळा करणे: म्युल खाते तयार झाल्यानंतर, फसवणूक, घोटाळे किंवा चोरीच्या क्रेडिट कार्डांद्वारे मिळवलेले पैसे त्या खात्यात जमा केले जातात. हे पैसे वायर ट्रान्सफर किंवा ऑनलाईन पेमेंट पद्धतींद्वारे म्युलच्या खात्यात पाठवले जाऊ शकतात.
- पैसे फिरवणे: फसवणूक करणारा व्यक्ती म्युलला ते पैसे दुसऱ्या खात्यात किंवा क्रिप्टोकरन्सी वॉलेटमध्ये पाठवण्याचे निर्देश देतो, आणि हे अनेकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर केले जाते. काही प्रकरणांमध्ये, म्युलला ती रक्कम दुसऱ्या चलनात रूपांतरित करायला किंवा वस्तू खरेदी करून ठराविक ठिकाणी पाठवायला सांगितले जाते.
- पुरावे मिटवणे: पैसा अनेक म्युल खात्यांमधून फिरवून, गुन्हेगार तपास यंत्रणांसाठी त्याच्या मूळ स्त्रोताचा मागोवा घेणे कठीण बनवते. यामागील उद्दिष्ट म्हणजे आर्थिक व्यवहारांचे गुंतागुंतीचे जाळे तयार करणे, जेणेकरून पैशाचा खरा स्रोत आणि शेवटचे टोक शोधणे कठीण जाते.

फसवणूक करणारे म्युल्सची भरती कशी करतात?
फसवणूक करणारे सहसा आर्थिकदृष्ट्या असुरक्षित असलेल्या किंवा सहज पैसे कमवू इच्छिणाऱ्या लोकांना लक्ष्य करतात. फसवण्याचे सर्वसामान्य प्रकार असे असतात:
- बनावट नोकरीच्या ऑफर: फसवणूक करणारे बनावट नोकऱ्यांची विशेषतः वर्क-फ्रॉम-होम किंवा रिमोट जॉबच्या जाहिराती करतात. या नोकऱ्यांमध्ये सहज पैसे कमावण्याचे आश्वासन दिले जाते किंवा कमी परिश्रम घेऊन कमिशन-आधारित उत्पन्न मिळेल असे सांगितले जाते. एकदा का नोकरी स्वीकारली की, पैसे मिळवणे आणि हस्तांतरित करण्यासाठी बँक खाते उघडण्यास सांगितले जाते.
- गुंतवणूक आणि लॉटरी फसवणुकी: फसवणूक करणारे लोकांना असा विश्वास देतात की त्यांनी लॉटरी जिंकली आहे किंवा त्यांना एक फायदेशीर गुंतवणूक संधी मिळाली आहे. नंतर त्यांना पैसे मिळवण्यासाठी एक नवीन बँक खाते तयार करण्यास सांगितले जाते.जे नंतर फसवणुकीसाठी वापरले जाते.
- आकस्मिक परिस्थिती: काही फसवणूक करणारे भीती आणि घाई-गडबडीचा गैरफायदा घेतात. ते असे सांगतात की लोकांची उधारी बाकी आहे आणि जर त्यांनी सहकार्य करून निधी ट्रान्सफर केला नाही, तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील.
मनी म्युल बनण्याचे धोके आणि परिणाम
काही लोक स्वेच्छेने मनी म्युल बनतात, तर अनेकजण नकळत या फसवणुकीत अडकतात. मात्र, हेतू काहीही असो, म्युल खात्यांशी संबंधित असणे गंभीर परिणामांना कारणीभूत ठरू शकते:
1. कायदेशीर परिणाम
- मनी लाँडरिंग आणि फसवणुकीसाठी गुन्हेगारी आरोप
- संभाव्य तुरुंगवास
- बँक खाते बंद होणे आणि आर्थिक सेवांवर निर्बंध
2. आर्थिक नुकसान
- वैयक्तिक निधी गमावण्याची शक्यता
- कायदेशीर बाबींसाठी होणारा खर्च
- संभाव्य दंड आणि शिक्षा
- क्रेडिट रेटिंगवर दीर्घकालीन परिणाम
मनी म्युल घोटाळ्यांपासून बचाव कसा करावा?
अनोळखी लोकांसोबत ऑनलाइन संवाद साधणे टाळा.
- अनोळखी व्यक्तींशी संवाद टाळा
- इतरांच्या वतीने बँक खाते उघडू नका.
- आपले डेबिट कार्ड, पासबुक किंवा मोबाईल बँकिंग ॲपचा पासवर्ड कोणालाही देऊ नका.
- मोबाईल बँकिंगचा पासवर्ड नियमितपणे बदला.
- अशा नोकरीच्या ऑफर स्वीकारू नका ज्या तुमच्याकडून अनोळखी खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास सांगतात.
- कोणालाही तुमचे खाते पैसे प्राप्त करण्यासाठी किंवा ट्रान्सफर करण्यासाठी वापरू देऊ नका.
- अशा बक्षिसाची ऑफर स्वीकारू नका जिथे काही रक्कम दुसरीकडे पाठवण्याची अट आहे.
- OTP, CVV, पासवर्ड यासारखी लॉगिन माहिती कोणाशीही शेअर करू नका.
- अवास्तव ऑफर, स्वस्त सौदे आणि मोठ्या सवलतींपासून सावध राहा.
- तुमच्या खात्यातील व्यवहार नियमितपणे तपासा आणि काही संशयास्पद आढळल्यास त्वरित बँकेला कळवा.
- बँकांकडून मिळणाऱ्या SMS, ई-मेल आणि IVR संदेशांचे अनुसरण करा आणि नवीन अपडेट्स बद्दल सतर्क राहा.
जर तुम्हाला मनी म्युल घोटाळ्याचा तुम्ही भाग असल्याचा संशय आला, तर PhonePe वर तक्रार कशी नोंदवावी?
जर तुम्ही PhonePe वर फसवणुकीचे शिकार झाल्यास, त्वरित खालीलप्रमाणे तक्रार नोंदवा:
- PhonePe ॲप: मदत विभागात जा आणि “have an issue with the transaction/व्यवहारात समस्या आहे” पर्यायाच्या अंतर्गत एक समस्या दाखल करा.
- PhonePe ग्राहक सेवा संपर्क क्रमांक: तुम्ही समस्येचा रिपोर्ट करण्यासाठी PhonePe च्या ग्राहक सेवेशी 80–68727374 / 022–68727374 वर फोन करून संपर्क साधू शकता, यानंतर ग्राहक सेवा प्रतिनिधी एक तिकीट दाखल करतील आणि तुमच्या समस्येसाठी मदत करतील.
- वेबफॉर्म सबमिशन: तुम्ही PhonePe चा वेबफॉर्म, https://support.phonepe.com/ वापरून एक तिकीट सुद्धा दाखल करू शकता.
- सोशल मीडिया: तुम्ही PhonePe च्या सोशल मीडिया हँडलद्वारे फसवणुकीच्या घटनांची तक्रार करू शकता.
ट्विटर – https://twitter.com/PhonePeSupport
फेसबुक – https://www.facebook.com/OfficialPhonePe - तक्रार: विद्यमान तक्रारीबाबतचा रिपोर्ट करण्यासाठी, तुम्ही https://grievance.phonepe.com/ वर लॉग इन करू शकता आणि आधी नोंदवलेला तिकीट आयडी शेअर करू शकता.
- सायबर सेल: शेवटी, तुम्ही जवळच्या सायबर क्राइम सेलमध्ये फसवणुकीच्या तक्रारी नोंदवू शकता किंवा https://www.cybercrime.gov.in/ वर ऑनलाइन तक्रार नोंदवू शकता किंवा सायबर क्राइम सेलची हेल्पलाइन 1930 वर संपर्क साधू शकता.
- DOT: जर डिजिटल गुन्हा घडलेला नसेल, पण तुम्हाला त्याचा संशय येत असेल, तरीही त्याची तक्रार नक्की नोंदवा. दूरसंचार विभागाने संचार साथी पोर्टल (sancharsaathi.gov.in) वर “चक्षू” नावाची सुविधा सुरू केली आहे, याठिकाणी तुम्ही संशयास्पद संदेश, कॉल्स आणि व्हॉट्सॲप अकाउंट्स विषयीची तक्रार नोंदवू शकता.
महत्त्वाची सूचना— PhonePe तुम्हाला कधीही गोपनीय किंवा वैयक्तिक तपशील विचारत नाही. ज्या ई-मेल phonepe.com डोमेन वरून आलेल्या नाहीत अशा सर्व PhonePe पासून असल्याचा दावा करणाऱ्या ई-मेल्सकडे दुर्लक्ष करा. तुम्हाला फसवणुकीचा संशय असल्यास, कृपया ताबडतोब अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.