Trust & Safety
तृतीय-पक्षाच्या ॲप्स मधून पेमेंट फसवणूक पासून सावध राहा
PhonePe Regional|2 min read|23 April, 2021
युजर्सला फसवून त्यांच्या कडून बँक खात्याचा नंबर, क्रेडिट/डेबिट कार्ड चे तपशील, UPI पिन किंवा OTP प्राप्त करून स्वतःच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करून घेण्यावरील अनेक लेख आणि गोष्टी तुम्ही वाचल्या आणि ऐकल्या असतील.
पण तुम्हाला माहिती आहे, तुम्ही वर नमूद केलेले तपशील दिले नाही तरी फसवणूक होऊ शकते? होय, फसवणूक तृतीय-पक्षाच्या ॲपच्या माध्यमातून सुद्धा होऊ शकते!
या तृतीय-पक्ष ॲप्स काय आहेत आणि फसवणूक करणारे त्याचा कसा वापर करतात?
Screenshare, Anydesk, Teamviewer आणि अशा अनेक स्क्रीन-शेअर करणाऱ्या ॲप्स आहेत. या ॲप्स चा वापर मूलतः इंजिनियर्स द्वारे दूरस्थ लोकेशन वरील फोन वर असलेल्या समस्या सोडवण्यासाठी केला जात होता. या ॲप्स द्वारे युजरच्या फोनवर पूर्ण प्रवेश आणि नियंत्रण केले जाऊ शकते.
फसवणूक करणारे गैरव्यवहाराच्या हेतूने या तृतीय-पक्षाच्या ॲप्सचा वापर तुमच्या फोनवर नियंत्रण मिळवण्यासाठी करतात!
लक्षात ठेवा: PhonePe कधीही तुम्हाला कोणतीही तृतीय-पक्षाची ॲप्स इन्स्टॉल करण्यास सांगत नाही. कोणाच्या विनंतीवर ॲप्स इन्स्टॉल करत नाही. फसवणूक करणाऱ्यांद्वारे त्यांच्या स्वतःच्या लोकेशनवरून तुमच्या फोनवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि तुमचे सेव्ह केलेले कार्ड/खात्याचे तपशील पाहण्यासाठी Anydesk/Teamviewer, इ. सारख्या ॲप्सचा गैरवापर केला जातो. कोणतीही संशयस्पद गतिविधी आढळल्यास support.phonepe.com वर रिपोर्ट करा.
तृतीय-पक्षाच्या ॲप्स वरून पुढीलप्रकारे फसवणूक केली जाते:
- फसवणूक करणारे युजर्स सोबत संपर्क करतात आणि ते PhonePe ॲपवर किंवा एखाद्या PhonePe व्यवहारासोबत येत असलेल्या समस्येचे निवारण करत असल्याची बतावणी करतात.
- ते युजर्सला समस्येचे निवारण ताबडतोब करण्यासाठी Screenshare, Anydesk, Teamviewer, इ. सारख्या स्क्रीन शेअर करणाऱ्या ॲप डाउनलोड करण्यास सांगतात.
- युजरला त्यांचे कार्ड, बँक तपशील, UPI पिन किंवा OTP बाबत विचारण्याऐवजी हे फसवणूक करणारे युजर्सला त्यांचे डेबिट/क्रेडिट कार्ड त्यांच्या फोनच्या कॅमेऱ्यासमोर धरण्यास सांगतात, जेणेकरून PhonePe ची सत्यापन यंत्रणा कार्डचे तपशील योग्यरित्या स्कॅन करू शकेल.
- युजर्सला असे वाटत असते की त्यांची मदत केली जात आहे, पण हे फसवणूक करणारे या संधीचा वापर करून युजरचा कार्ड नंबर, CVV कोड रेकॉर्ड करतात आणि एका SMS च्या माध्यमातून त्यांच्या स्वतःच्या खात्यात पैसे पाठवण्यासाठी OTP पाठवतात.
- लक्षात घ्या, स्क्रीन-शेअरींगॲप तुमच्या फोनवर प्रवेश सक्षम करतात, त्यामुळे युजरच्या फोनवर आलेला OTP फसवणूक करणारे पाहू शकतात आणि त्यांच्या स्वतःच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी त्याचा वापर करतात.
सुरक्षित राहा आणि पेमेंट फसवणूक पासून स्वतःचा बचाव करा.
PhonePe कधीच तुमचे गोपनीय किंवा वैयक्तिक तपशील विचारत नाही. PhonePe प्रतिनिधी असल्याची बतावणी करणाऱ्या कोण्या व्यक्तीने तुम्हाला असे तपशील विचारल्यास, कृपया त्यांना तुम्हाला एक ई-मेल पाठवण्यास सांगा. तसेच फक्त @phonepe.com डोमेन वरून आलेल्या ई-मेल वरच प्रतिसाद द्या.
तुम्हाला PhonePe ग्राहक सहाय्यता नंबर हवा असल्यास त्यासाठी Google, Twitter, FB वर शोध घेऊ नका. PhonePe ग्राहक सहाय्यता सोबत संपर्क साधण्यासाठी support.phonepe.com ही एकमेव अधिकृत वेबसाइट आहे. PhonePe सहाय्यता नंबर असल्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही सत्यापित नसलेल्या मोबाइल नंबर वर कॉल करू नका/त्यास प्रतिसाद देऊ नका.