Milestones
चकाकणारे सर्व सोनेच नसते
PhonePe Regional|3 min read|30 August, 2019
फेब्रुवारी 2018 रोजी NPCI द्वारे UPI व्यवहारांची संख्या प्रकाशित केली गेली आणि या वेळीसुद्धा संख्येतील मोठी वाढ खूप उत्साहवर्धक अशीच होती. भारतातली सर्वात पहिली आणि सर्वात मोठी नॉन-बँकींग UPI ॲप म्हणून दिवसेंदिवस प्राप्त होत असलेल्या यशाने आम्ही खूप भारावून गेले आहोत. गेल्या वर्षभरात व्यवहारात झालेली घातांकीय वाढ प्रत्येकाच्या अपेक्षांच्या सर्व मर्यादा पार करणारी अशीच आहे.
साहजिकपणे, UPI व्यवहारातील प्रचंड वाढीने ग्राहक, गुंतवणुकदार, प्रसारमाध्यमे आणि पेमेंट उद्योगांसारख्या क्षेत्रात याच्या वापरचा कल वाढला आहे. अचानक सगळीकडे UPI च्या नावाचा घोष वाढला आहे व सर्वजण त्याचा वापर करण्यासाठी उत्सुक आहेत. वॉलेट कंपन्यांना UPI सोबत आंतर- कार्यशिलता हवी आहे तर बँकांना नवीन काळानुरुप मोबाइल ॲप लाँच करायच्या आहेत. जागतिक दिग्गज जसे गुगल, ॲमेझॉन व वॉट्सअप भारतात UPI-आधारित पेमेंट सेवा लाँच करत आहेत. एवढेच नाही तर भारत सरकारने सुद्धा पेमेंट ॲप लाँच केली आहे. या सर्व घडामोडींवर असे म्हणणे उचित होईल की, भारतात पेमेंट क्षेत्रात UPI द्वारे चेतावलेली नवप्रवर्तनाची क्रांती चांगली आहे, लोकांना ते आवडते आहे आणि ती इथे प्रस्थापित होते आहे आणि या क्षेत्रात, भारतीय उपभोक्त्यांसाठी आम्ही एक अधिक चांगला पर्याय म्हणून सर्वार्थाने उपलब्ध आहोत.
तथापि, आम्हाला असे सुद्धा वाटते अलिकडील प्रसारमाध्यमांचे लक्ष फक्त UPI व्यवहारांच्या संख्येवर केंद्रीत आहे — ज्यातून संपूर्ण माहिती मिळत नाही. व्यवहारांच्या संख्येसोबतच, UPI च्या एका संतुलीत स्कोअर कार्ड मधे, व्यवहारांची एकूण संख्या, युनिक ग्राहक संख्या तसेच सरासरी व्यवहार मूल्याची (ATV) सूचित संख्या आणि प्रति ग्राहक सरासरी व्यवहार (ATPC) यांचा सुद्धा समावेश असणे आवश्यक आहे.
उपलब्ध सार्वजनिक माहितीच्या आधारावरील एकंदरीत आकडेवारी आपल्याला पुढील माहिती देते.
वरवर पाहिले असता, दिलेल्या तक्त्यातील माहितीत Paytm निश्चितपणे बाजारपेठेत अग्रेसर असल्याचे दिसते. व्यवहारांमधे 40% मार्केट शेअर एक मोठी उपलब्धी आहे. पण त्यांच्या इतर आकडेवारींचे काय? त्याचा डेटा सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही…
पण आमच्या सुदैवाने आम्हाला असे आढळले की, Paytm च्या एकूण 68 मिलियन व्यवहारांवैकी 21 मिलियन व्यवहार हे पैसे ट्रान्फर चे होते जे Paytm च्या ग्राहकांकडून PhonePe ग्राहकांना पैसे पाठविल्याचे (@YBL VPA हँडल सोबत) व्यवहार होते. म्हणून आम्ही त्यांच्या ATV,ATPC इ. बाबतची काही माहिती शोधण्याचा प्रयत्न केला.
आणि पहा आम्हाला काय आढळले!
या आकडेवारीचा संदर्भ घेतला असता असे दिसते की, फक्त 40,000 युनिक ग्राहकांनी प्रत्येकी 500+ व्यवहार फेब्रुवारी महिन्यात Paytm वर केलेत.
पण या Paytm च्या सरासरी व्यवहाराचे मूल्य ₹40 पेक्षा सुद्धा कमी आहे.
याउलट फेब्रुवारी महिन्यात PhonePe वर, 6,000,000 युनिक ग्राहकांनी प्रत्येकी 5 व्यवहार केलेत.
आणि आमचे सरासरी व्यवहार मूल्य ₹1,800 च्या वर आहे.
एटीव्ही (Paytm वर ₹ 40 याच्या विपरीत PhonePe वर ₹1,820) आणि Paytm च्या प्रारंभीच्या उच्च एटीपीसी (525/युजर/महिना) मधील या प्रचंड तफावतीचे एकमेव तर्कसंगत स्पष्टीकरण असे आहे की Paytm व्यवहाराची संख्या लक्षणीय प्रति-व्यवहार कॅशबॅक च्या प्रोत्साहनाद्वारे प्रभावित असल्याचे स्पष्टपणे दिसते जी खूप कमी लोकसंख्येस अपील करते.
वरील उदारहणावरुन आपण तीन निष्कर्ष काढू शकतो:
- Paytm वर अजूनही UPI ची व्यापक प्रमाणात स्वीकृती झालेली नाही : जर 40,000 युनिक ग्राहक, 21 मिलियन व्यवहार करत असतील तर, एका अनुमानाद्वारे Paytm साठी एकूण UPI व्यवहारांचा बेस 40,000 * 68 / 21 = 1.3 ग्राहक असल्याचे ध्वनित करतो.
- ग्राहकांची व्यवहार संख्या विशिष्टतेने UPI वापराचे मामले दर्शवित नाहीत: एका सरासरीत PhonePe ग्राहक प्रति महिना जवळपास 5 व्यवहार करतो, तर Paytm चा तुलनात्मक आकडा 525 आहे. आणि हा आकडा UPI नेटवर्क वरील सामान्य युजर वर्तनाचे अजिबात प्रतिनिधित्व करत नाही.
- Paytm व्यवहारांचे सरासरी मुल्य सरासरीपेक्षा खूप कमी आहे: एका एकंदरीत नेटवर्क पातळीवर, UPI चे एकंदरीत व्यवहार मुल्य रु.1,116 /व्यवहार आहे. Paytm साठी ही संख्या अगदी किरकोळ म्हणजे रु.38 आहे, जो पुष्टी करतो की हे सर्व कॅशबॅक मुळे प्रेरित असलेले कमी ASP व्यवहार आहेत.
या सर्व कारणास्तव, आम्ही असे मानतो की, UPI व्यवहारात सर्वात मोठे असल्याचा Paytm चा दावा एकांगी आणि दिशाभूल करणारा आहे.
बाजारपेठेचा अहवाल तयार करतांना त्यात भारतातील डिजिटल पेमेंटचा वाढलेला विस्तृत वापर विचारात घेणे आवश्यक आहे असे आम्ही मानतो, ज्यात मूलतः युनिक ग्राहकांची जास्त संख्या, आणि एकंदरीत व्यवहार मुल्यांची उच्च संख्या यांचा समावेश करणे आवश्यक आहे. व्यवहारांची एकूण संख्या आणि मुल्य आमच्यासोबत अगदी पारदर्शकपणे सामायिक करण्यासाठी आम्ही NPCI चे आभारी आहोत. वेगाने वाढणाऱ्या डिजिटल पेमेंट व्यवस्थेचे अधिक समग्र चित्रण करण्यासाठी त्यांनी युनिक ग्राहक संख्या प्रकाशित करण्याचा विचार केल्यास ते खूप मदतगार होईल.