PhonePe Blogs Main Featured Image

Investments

तुमचा गुंतवणूक प्रवास आणि अजय, शेरू आणि बब्बरची कहाणी

PhonePe Regional|2 min read|05 July, 2021

URL copied to clipboard

अजय, शेरू आणि बब्बर कॉलेजमित्र होते. पदवी संपादित केल्यावर योगायोगाने त्या तिघांनाही एकाच कंपनीत नौकरी मिळाली. आणि ते तिघे एकाच वेळी,सारख्याच पोस्टवर रुजु झाल्याने, त्यांचे पगार सुद्धा सारखे होते.

ऑफिसमध्ये पहिल्या आठवड्यात, त्यांनी एका वित्तीय नियोजनाच्या वर्कशॉपमध्ये सहभाग घेतला जिथे त्यांना आर्थिक सल्लागाराने सिस्टेमिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP), काळासोबत श्रीमंत कसे व्हावे,कंपाउंडिंगची शक्ती आणि अशा अनेक संकल्पनांसोबत परिचय करून दिला.

लवकर सुरूवात करा आणि योग्य सुरूवात करा

शेरूला या वर्कशॉपमध्ये सांगितलेल्या सर्व संकल्पना जरी पूर्णपणे समजल्या नाहीत, तरी त्याला एक महत्त्वपूर्ण गोष्ट कळली होती की गुंतवणूक करण्यास लवकर सुरूवात केल्यास कालांतराने श्रीमंत होण्याचा मार्ग सुकर होतो. म्हणून प्रत्येकाने शक्य तितक्या लवकर गुंतवणूक करणे सुरू करायला हवे, मग ती दर महिन्याला केलेली छोटीशी गुंतवणूक का असेना पर करायला हवी. हे समजून शेरूने तत्काळ एक इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये SIP च्या माध्यमातून दर महिन्याला 10,000 रुपयांची गुंतवणूक करणे सुरू केले.

अजय थोडासा संशयी होता म्हणून त्याने वर्कशॉपमधून मिळालेल्या माहितीकडे तेवढे लक्ष दिले नाही आणि नंतर गुंतवणूक सुरू करू असा विचार केला. तथापि, अगदी एका वर्षा नंतर, शेरूने SIP द्वारे बचत करणे किती सोपे आहे आणि पैसे जमा करण्यासाठी हे कशी मदत करेल हे सांगितले. त्याचा चांगला मित्र शेरूचे ऐकून अजयनेही नौकरीत रुजू झाल्यावर बरोब्बर एक वर्षाने 10,000 रुपयांची SIP सुरू केली.

दुसरीकडे बब्बर नेहमीच असा विचार करीत असे की तो लॉटमध्ये सर्वात हुशार आणि स्मार्टआहे. त्याने बरेच पैसे खर्च करून वरचेवर पार्टीचा आनंद घ्यायचा निर्णय घेतला.त्याला गॅझेटचीसुद्धा आवड होती आणि त्याला स्वतःसाठी सर्वोत्कृष्ट गॅझेट खरेदी करण्याची सवय होती.त्यामुळे त्याच्याकडे गुंतवणूकीसाठी थोडे पैसे शिल्लक होते.

पण अशा जीवनशैलीच्या 5 वर्षानंतर आणि जवळजवळ कोणतीही गुंतवणूक न झाल्यावर बब्बरला आपली चूक लक्षात आली आणि त्याने शेरू आणि अजयच्या सारखे इक्विटी फंडामध्ये 10,000 रुपये गुंतवणे चालू केले.

गुंतवणूकीत कालांतराने वाढ झाली

जसजसा वेळ गेला, तसतसे इक्विटी फंडामध्ये त्यांची SIP गुंतवणूक वाढत गेली. त्यांचा महाविद्यालयीन पदवीच्या 20 वर्षानंतरचा (त्यांनी त्यांच्या कामाच्या आयुष्याची 20 वर्षे देखील पूर्ण केली होती) महाविद्यालयीन रियुनियन कार्यक्रमात भाग घेत असताना त्यांनी SIP गुंतवणूकीबद्दल चर्चा केली इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये आणि त्यांनी त्यांच्या गुंतवणूकीच्या मूल्याची तुलना करण्याचा निर्णय घेतला.

त्यांच्या गुंतवणूकीचे मूल्य कसे वाढले ते पुढे दिले आहे:

शेरूच्या संपत्तीत 1.04 कोटी रुपयांची झाली होती.अजय 1कोटीं रुपयांच्या टप्पा गाठण्याच्या जवळ होता.त्याने शेरू बरोबर वेळेवर झालेल्या चर्चेबद्दल धन्यवाद केलेत, ज्यामुळे त्याने SIP सुरू केले. दुसरीकडे बब्बरकडे अवघे 52 लाख रुपये होते. शेरूने जे साध्य केले त्याच्या ते अर्धे आहेत. शेरू आणि अजयच्या तुलनेत बब्बरला स्पष्टपणे गरीब असलेले वाटले.

या कथेपासून घेण्याचा महत्त्वाचा मार्ग: शक्य तितक्या लवकर नियमित गुंतवणूक सुरू करा. आपण अद्याप गुंतवणूक प्रारंभ केली नसल्यास,आताच ती वेळ आता आहे. अन्यथा, आपला सुद्धा बब्बर सारखा शेवट होऊ शकता.

अस्वीकरण:

निफ्टी 50TR निर्देशांकामध्ये SIP जानेवारी 2001 मध्ये सुरू झाली आणि डिसेंबर 2020 पर्यंत चालू राहिली तर वार्षिक परतावा (XIRR) 14.64% मिळाला असता. तथापि, वरील उदाहरणात आम्ही पारंपारिक पद्धतीने 13% प्रति वर्षाचा परतावा वापरला आहे. डेटा स्त्रोत: ICRA Analytics. भूतकाळातील कामगिरी भविष्यात टिकू शकत नाही.

म्युच्युअल फंड बाजारपेठेच्या जोखमीच्या अधीन असतात. कृपया गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेची माहिती दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.

PhonePe Wealth Broking Private Limited | AMFI — रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर ARN- 187821

Keep Reading