PhonePe Blogs Main Featured Image

Investments

दीर्घकालीन गंतवणूक सामर्थ्याची बांधणी करणे

PhonePe Regional|2 min read|12 July, 2021

URL copied to clipboard

व्यायाम आणि गुंतवणूकमध्ये काय समानता आहे? तुम्ही जवळून पाहिले तर खूप आहे!

तुमचे 2021 वर्ष जास्त सक्रिय आणि व्यायाम करण्याच्या निश्चय करून सुरू झाले होते का? आमचे सुद्धा असेच झाले होते! पण हा निश्चय करताना आम्हाला असे लक्षात आले की व्यायाम आणि गुंतवणूक यांच्यामध्ये बऱ्याच समान गोष्टी आहेत ज्या आपल्याला हे समजण्यास मदत करतात की एक व्यक्ती स्वप्नातील शरीरयष्टीसाठी प्रयत्न करताना एक यशस्वी गुंतवणूकदार कशी होऊ शकते. तर चला आपण सुरुवात करायची का?

पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, प्रारंभ करा

तुम्हाला माहिती आहे का दरवर्षी नवीन वर्षाचा आरंभ होताना लोक व्यायाम सुरु करण्याचा का निर्णय घेतात? कारण प्रत्येकास हे करायची इच्छा असते, पण फारच कमी ते सुरु करतात. असेच गुंतवणुकीच्या बाबतीत होते. भविष्याकडे दुर्लक्ष करून कोणाचेही कधी भले झाले नाही. म्हणूनच उद्यापासून नव्हे तर आजच गुंतवणूक आणि व्यायाम सुरू करा.

सातत्यता महत्त्वाची आहे

1 जानेवारीला जिममध्ये जाणे आणि त्या नंतर ते थांबवणे याने तुमच्या आरोग्याच्या ध्येय प्राप्तीत काहीच फरक पडणार नाही. नियमितपणे व्यायामासह पुढे जाणे हा तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा एकमात्र मार्ग आहे. त्याचप्रमाणे SIP मार्फत नियमितपणे गुंतवणूक करणे आणि त्याबरोबर सातत्य ठेवणे तुम्हाला दीर्घकालावधीत लक्षणीय संपत्ती निर्माण करण्यात मदत करेल.

सातत्यता महत्त्वपूर्ण का आहे हे पुढील उदाहरणाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे :

तुम्ही मासिक 5,000 रुपयांची SIP सुरु केली आणि ती 20 वर्षे सुरु ठेवण्याचे ठरवले. या गुंतवणूकीवर तुम्हाला 12% रिटर्न मिळाला. 20 वर्षानंतर तुम्ही जवळपास 50 लाखांची संपत्ती निर्माण कराल. हे दर्शविते की प्रत्येक महिन्यात सातत्याने गुंतवणूक केल्यास दीर्घकालावधीत मोठी रक्कम मिळू शकते.

तुमच्यासाठी अनुकूल असलेली दिनचर्या शोधा

जेव्हा तुम्ही नियमितपणे व्यायाम सुरु करता तेव्हा तुम्ही स्वत:साठी सर्वोत्कृष्ट व्यायाम करण्याची पद्धत देखील शोधून पहा. हे स्नायू तयार करण्यासाठी वजन प्रशिक्षण, वजन कमी करण्यासाठी कार्डिओ किंवा मूलभूत सामर्थ्यासाठी पाईलेट असू शकते. तसेच गुंतवणुकीत सुद्धा, तुम्ही तुमच्या ध्येयानुसार तुमची जोखीम प्राधान्ये, ध्येय आणि ज्या कालावधीसाठी तुम्ही गुंतवणूक करणे आवश्यक आहे त्यानुसार अनुरुप फंडांमध्ये तुम्ही गुंतवणूक केली आहे याची खात्री करणे आवश्यक आहे.

तुम्ही अत्यंत अल्प-मुदतीच्या उद्दीष्ट्यासाठी अत्यंत उच्च-जोखमीची गुंतवणूक केली तर काय होईल? तुमची गुंतवणूक बर्‍याच चढउतारांमधून जाईल आणि परिणामी काही तोटा होईल आणि खूप ताणतणाव होईल. परंतु केवळ तुमच्या आवश्यकतेनुसार फंडांमध्ये गुंतवणूक करून हे टाळणे सोपे आहे. गुंतवणुकीचा कालावधी आणि भिन्न जोखीम प्रोफाइलवर आधारित पुढील तक्त्यात एक संक्षिप्त मार्गदर्शन दिले आहे:

कुठल्याही गोष्टीसाठी शॉर्टकट नसतो, पण दीर्घकालीन परिणाम असामान्य असू शकतात

व्यायाम दीर्घकालीन प्रक्रिया आहे. परिणाम दिसण्यासाठी वेळ लागतो पण एकदा तुम्ही तुमच्या लक्ष्याच्या जवळ पोहोचलात की मागे वळून पाहिले जात नाही. तसेच गुंतवणूक करण्यासाठी कोणतेही शॉर्ट-कट नाहीत. तुम्हाला जलद नफा मिळवण्याची इच्छा असेल, तर तुमच्या हाती निराशा लागू शकते पण SIP च्या माध्यमातून दीर्घकाळ गुंतवणूक करणे तुमची गुंतवणूक हळूहळू आणि एका स्थिर रीतीने वाढवण्याचा एक उत्तम मार्ग आहे.

शेवटी, व्यायामाचे फायदे सांगणाऱ्या एका सुविचाराचे उदाहरण घेऊया जे गुंतवणुकीसाठी सुद्धा लागू होते: “आज असे काहीतरी करा ज्याच्यासाठी भविष्य तुमचे आभार मानेल”.

अस्वीकरण: म्युच्युअल फंड गुंतवणूका ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन असतात. कृपया गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेचे माहिती दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.

PhonePe Wealth Broking Private Limited | AMFI — रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर ARN- 187821

Keep Reading