PhonePe Blogs Main Featured Image

Design

लाखों भारतीयांसाठी पेमेंटचा अनुभव सोपा बनवला आहे

PhonePe Regional|2 min read|23 April, 2021

URL copied to clipboard

PhonePe ने अलीकडेच 2.50 कोटी युजर्सचा मैलाचा दगड पार केला आणि UPI व्यवहार वरील सर्वात मोठा प्लेयर म्हणूनसुद्धा समोर आले. 10 कोटीपेक्षा जास्त महिन्याच्या सक्रीय युजर्ससोबत, आता आम्ही देशातील सर्वात मोठ्या व्यवहार करणाऱ्या युजरबेसपैकी एक आहोत. आणि आम्ही मोठा प्रवास पार केला आहे, आणि देशातील 500 शहरांमध्ये अभिमानाने लाखों युजर्सला सेवा देत आहोत.

व्यवहार करण्यासाठी ग्राहक दररोज आम्हाला का वापरतात याबाबत सांगायचे झाल्यास उत्तम तांत्रिक क्षमता, एका सोप्या आणि अंतर्ज्ञानी उत्पादनाची उपलब्धता, आणि नवीन उत्पादने आणि वैशिष्ट्यांची भर, तसेच ग्राहकांचा अनुभव हा आमचा मुख्य आधार आहे. आम्ही आता फक्त ग्राहकांचे समाधानच नाही तर त्यांचा अ‍ॅपवरील प्रत्येक पेमेंटचा अनुभव हा आनंददायक बनविण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नरत आहोत. आम्ही हे कसे करतो ते येथे आहे!

भारतात डिजिटल पेमेंटची स्वीकार्यता

देशभरात आम्हाला पेमेंट पर्याय म्हणून मोठ्या प्रमाणात स्वीकारले गेले आहे. आमच्या स्वीकार्यते बद्दल आणि विशाल युजरबेस याची खरी साक्ष देत आहे, आमच्या युजरबेसपैकी जवळपास 80% ग्राहक टियर 2, 3 शहरे आणि त्यापेक्षा लहान गावांतील आहेत. आणि अशा लहान शहरे आणि गावांमध्ये डिजिटल पेमेंटची विश्वास, सुरक्षा, सुरक्षितता आणि विश्वसनीयता याबाबत अद्याप कमी माहिती आहे.

आमच्या ग्राहकांशी संवाद साधताना आम्हाला हे जाणवले की आमचे बरेच युजर पहिल्यांदाच इंटरनेट वापरणारे देखील आहेत आणि आमचे काम त्यांना केवळ पेमेंट सहजतेने करण्यास मदत करणे नव्हे तर डिजिटल जाणकार बनण्याच्या दिशेतील त्यांच्या प्रवासात त्यांचा हात धरून शिकवण्याचे देखील होते.

ही अंतर्दृष्टी लक्षात घेऊन आम्ही अशी सिस्टम आणि प्रक्रिया बनवण्याच्या कार्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली ज्याने आम्हाला युजर विभाग, स्थाने, डिव्हाइसेस आणि पेमेंट श्रेण्यांमध्ये युजरच्या वर्तणूकीच्या पॅटर्नची खोलवर समज दिली. या प्रयत्नांच्या माध्यमातून, आम्ही आमच्या अ‍ॅपवरील आनंददायक आणि निराशा दोन्ही अनुभवांना योगदान देणाऱ्या महत्त्वपूर्ण बाबी देखील ओळखल्या. त्यानंतर आमच्या सखोल संशोधनादरम्यान समोर आलेल्या संघर्षाच्या मुद्यांचे निवारण करण्यासाठी आम्ही एक तंत्रज्ञान आणि डेटा-प्रथम दृष्टिकोन स्वीकारला.

आमची अ‍ॅप तुमची भाषा बोलते

आमचे अनेक ग्राहक अ‍ॅप त्यांच्या मातृभाषेत वापरणे पसंत करतात. यांस लक्षात ठेवून, आम्ही मदत आणि सहाय्यता सेवा 8 भारतीय भाषांमध्ये प्रदान करतो. प्रादेशिक भाषेच्या टेलिफोनिक सहाय्यतेशिवाय, आम्ही आता अ‍ॅपसाठी, मदत विभाग आणि चॅट सहाय्यतासाठी इतर भाषा निवडण्याचा सुद्धा पर्याय देतो. आमच्या भाषांतरचा प्रयत्नांना भरघोस प्रतिसाद मिळतो आहे आणि जास्तीत जास्त ग्राहक त्यांना सोयीच्या असलेल्या भाषेत अ‍ॅप वापरण्याची निवड करत आहेत

आम्ही मदतीसाठी तत्पर आहोत!

बरेच लोक डिजिटल पेमेंटचा वापर करण्यास संकोच करतात कारण त्यांना VPA तयार करणे, आपला BHIM UPI पिन सेट करणे, बँक खाती जोडणे इत्यादी मूलभूत गोष्टींचा समावेश असलेल्या UPI पेमेंटच्या विविध बाबींविषयी माहिती नसते. त्यासाठी आम्ही समजण्यास सोपे मदतपर लेख आणि शैक्षणिक व्हिडिओ अनेक भाषांमध्ये तयार केले आहेत ज्यामुळे ग्राहकांना सहजपणे ऑन-बोर्डिंग करता येते. अ‍ॅपवरील युजर्सना मदत करण्यासाठी आम्ही सतत अधिक प्रतिमा आणि दृश्य माध्यमे जोडत आहोत. आम्ही प्रोडक्ट आणि बिझनेस टीमबरोबर भागीदारी देखील केली आहे आणि आमचा ग्राहक सहाय्यता वरील संपर्क दर कमी करण्यावर सातत्याने कार्य करीत आहोत, जो आजच्या काळात खूपच प्रभावित करणारा 0.5% पेक्षा खाली आहे.

ऑटोमेशनसह त्वरित समस्येचे निराकरण

आम्ही 90% ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण त्वरित प्रदान करतो आणि ही संख्या अधिक चांगली होण्यासाठी कार्य करत आहोत. ग्राहकांना त्यांच्या पेमेंटच्या समस्यांचा अ‍ॅपवर सहजपणे माग घेण्यासाठी आणि त्वरित प्रतिसाद मिळवण्यासाठी आम्ही आमच्या ग्राहक सहाय्यता सिस्टम स्वयंचलित केले आहेत. यामुळे ग्राहकांना त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ग्राहक सहाय्यता कार्यकारीकडे जाण्याची प्रतीक्षा करावी लागत नाही. ग्राहकांच्या समस्येचे निवारण करताना आम्ही संपूर्ण पारदर्शकता राखली आहे याचीही आम्ही खातरजमा केली आहे. आज, जवळपास 80% समस्यांचे समस्यांचे निवारण स्वयंचलित पोर्टल अनुभव आणि फोन IVR द्वारे सुधारित समाधान स्कोअरसह केले जाते आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही यात आणखी सुधार करू शकतो. आम्ही खात्री करतो आहोत की ग्राहकांना काही अडचणी येत असतील तर त्यांना काही तासात आमच्याकडून प्रतिसाद मिळतील.

भविष्यातील उद्दिष्ट्ये

आम्ही आमच्या ग्राहकांकडून दररोज शिकत आहोत. चांगला पेमेंट अनुभव देण्यासाठी आम्ही निरंतर अभिप्रायांना समाविष्ट करत आहोत जो भारतातील आमच्या सर्व युजर्ससाठी सर्वोत्तम पेमेंट अनुभव देईल.

Keep Reading